20 June Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात जमा झालेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, विशेष व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आजचा दिवस हा जगभरातील निर्वासितांच्या परिस्थितीविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक शरणार्थी दिनाच्या स्वरुपात साजरा करण्यात येतो.याची सुरवात सयुक्त राष्ट्राने सन २००० पासून केली व सन २००१ पासून दरवर्षी २० जून या दिवशी हा दिवस साजरा केला जातो.
मित्रांनो, आजच्या दिवशी ब्रिटीश कालीन भारतात सर्वात मोठी घटना घडली होती. ब्रिटीश सरकारने भारता देशांत व्यापार करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या रेल्वे करिता महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी विक्टोरिया टर्मिनस नावाच्या रेल्वे स्थानकाची स्थापना केली होती. त्याला आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असे म्हटलं जाते. सन २० जून १८७७ साली मुंबई येथील हे रेल्वे स्थानक सर्वसामन्य लोकांकरिता सुरु करण्यात आलं.
ब्रिटीश गॉथिक शैलीमध्ये बनवण्यात आलेल्या या स्टेशनची निर्मिती इंग्रज अभियंता फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स(Frederick William Stevens) यांनी केली होती. व्हिक्टोरियन गॉथिक शैली आणि पारंपारिक भारतीय आर्किटेक्चरची झलक पाहता, सन 2004 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये या स्थानकाचा समावेश करण्यात आला. ही आपल्या भारतासाठी खूप अभिमानाची बाब आहे. मुंबई येथील हे स्टेशन भारतातील सर्वात वर्दळीचे स्टेशन बनले आहे. दररोज लाखो प्रवासी या रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात.
जाणून घ्या २० जून रोजी येणारे दिनविशेष – 20 June Today Historical Events in Marathi
२० जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 June Historical Event
- इ.स. १८३७ साली इंग्लंडच्या राणी पदी व्हिक्टोरिया (Queen Victoria) विराजमान झाल्या.
- इ.स. १८८७ साली इंग्रज अभियंता फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स (Frederick William Stevens) यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (विक्टोरिया) रेल्वे स्टेशनची निर्मिती पूर्ण करून ते लोकांसाठी सुरु करण्यात आले.
- इ.स. १८९९ साली केंब्रिज विद्यापीठाच्या ‘ट्रायपॉस’ या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा वर्गात प्रथम क्रमांक आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.
- सन १९६० साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना करण्यात आली.
- सन १९२१ साली लोकमान्य टिळक यांनी पुरस्कारिलेले राष्ट्रीय शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
- सन २००१ साली पाकिस्तान देशाचे सेना प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनले.
- सन २०१४ साली प्रसिद्ध कवी केदारनाथ सिंह यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला.
२० जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 20 June Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८५६ साली प्रसिद्ध ब्रिटीश व्यापारी व राजकारणी सर एडवर्ड अल्बर्ट ससून(Edward Albert Sassoon) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८६९ साली प्रसिद्ध भारतीय व्यापारी व किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्मदिन.
- इ.स. १८७६ साली भारतीय तेलगु भाषिक चित्रपट क्षेत्राच्या इतिहासातील प्रसिद्ध पहिले गीतकार चांदला केसावदासू यांचा जन्मदिन.
- सन १९१५ साली ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक टेरेंस यंग (Terence Young)यांचा जन्मदिन.
- सन १९३९ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू व गोलंदाज तसचं, राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत भिकाजी देसाई यांचा जन्मदिन.
- सन १९५२ साली पद्मश्री पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कादंबरीकार आणि कवी विक्रम सेठ यांचा जन्मदिन.
- सन १९५४ साली इंग्लंड देशाच्या क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार एलन लैंब(Allan Lamb) यांचा जन्मदिन.
- सन १९७२ साली माजी भारतीय क्रिकेटपटू पारस म्हाम्ब्रे यांचा जन्मदिन.
- सन १९७६ साली प्रसिद्ध भारतीय महिला कसोटी व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देविका पळशीकर यांचा जन्मदिन.
२० जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 20 June Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १६६८ साली जर्मन देशांतील अग्रणी संस्कृत अभ्यासक व धर्मप्रसारक हेनरिक रोथ(Henrik Roth) यांचे निधन.
- सन १९३० साली ब्रिटीश कालीन रामपूर रियासतचे नवाब हमीद अली खान बहादूर यांचे निधन.
- सन १९७२ साली प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्रा. कोट्टरलाकोटा रंगधामा राव यांचे निधन.
- सन १९९७ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी शायरीचे जनक वासुदेव वामन तथा ’भाऊसाहेब’ पाटणकर ऊर्फ ‘जिंदादिल’ यांचे निधन.
- सन २००७ साली सुप्रसिद्ध भारतीय बंगाली चित्रपट अभिनेत्री अनिता गुहा यांचे निधन.
- सन २००८ साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट आणि रंगमंच अभिनेते आणि गायक चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचे निधन.
- सन २००९ साली पाकिस्तान देशाचे कीटकशास्त्रज्ञ, प्राध्यापक, अभिनेते आणि उद्योजक दतुक रहमान अन्वर सय्यद यांचे निधन.
- सन २०१० साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू गुंडीबाईल रामा सुंदराम यांचे निधन.