18 June Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यामतून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्तीचे जन्मदिन, निधन आणि त्यांच्या शोध कार्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आजच्या दिवशी भारताच्या इतिहास काळात घडलेली सर्वात मोठी घटना म्हणजे गोवा मुक्ती संग्राम च लढा. सन १९४७ साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा भारतात काही ठिकाणी विदेशी शासन तसचं, सुरु होत. त्यावेळी गोवा प्रांतावर पोर्तुगीज लोकांचे शासन होते. सन १९४६ साली इंग्रज सरकारने जेंव्हा भारत सोडून जाण्याचा निर्णय दर्शविला तेव्हा भारतीय स्वातंत्र्य सैनिकांना असे वाटत होत की, पोर्तुगीज सुद्धा इंग्रजांसोबत आपला देश सोडून जातील. परंतु, स्वातंत्र्य सेनानी राममनोहर लोहिया यांना यावर विश्वास नव्हता.
म्हणून, त्यांनी सन १८ जून १९४६ साली गोव्याला जाऊन पोर्तुगीज सरकार विरुद्ध आपले आंदोलन सुरु केले. त्यांच्या या आंदोलनांमध्ये त्यांना तेथील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यांचा हा लढा असाच सुरु राहिला कालांतराने सन १९६१ साली गोवा प्रांताला स्वातंत्र्य मिळाले.
जाणून घ्या १८ जून रोजी येणारे दिनविशेष – 18 June Today Historical Events in Marathi
१८ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 June Historical Event
- इ.स. १५७६ साली मुघल शासक अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात हळदी घाटीच्या युद्धाला सुरुवात झाली.
- सन १९४६ साली गोवा मुक्ती लढ्याचे प्रमुख डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्यातील मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
- सन १९८१ साली मुख्य करून जनावरांमध्ये आढळणाऱ्या लाळ्या-खुरकत या रोगावरील पहिली जनुकीय लास विकसित करण्यात आली.
- सन १९८३ साली अमेरिकन अंतराळवीर आणि भौतिकशास्त्रज्ञ सॅली क्रिस्टन राइड(Sally Kristen Ride) या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महीला ठरल्या.
- सन १९८७ साली एम. एस. स्वामिनाथन यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कार (वल्ड फूड) मिळाला.
- सन २००९ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी विशेष उपग्रह पाठविला.
१८ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 18 June Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८१७ साली राजपूत नेपाळ शासक तसचं, नेपाळचे पहिले पंतप्रधान व राणा राजवंशाचे संस्थापक जङ्गबहादुर राणा यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८७ साली थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, शिक्षक, राजनीतिज्ञ, तसचं, बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री डॉ.अनुग्रह नारायण सिन्हा यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९९ साली भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि भारतातील समाज सुधारणावादी चळवळीचे नेते तसचं, महात्मा गांधी यांचे अनुयायी दादा धर्माधिकारी यांचा जन्मदिन.
- सन १९३१ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचा जन्मदिन.
- सन १९३१ साली ब्राझील देशाचे समाजशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि राजकारणी तसचं, ब्राझील देशाचे माजी राष्ट्रपती फर्नांडो हेन्रिक कार्डोसो(Fernando Henrique Cardoso) यांचा जन्मदिन.
- सन १९३४ साली भारतीय वंशीय संगणक वैज्ञानिक, बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थान, संगणक विज्ञान विभागाचे माजी प्राध्यापक ई.वी. कृष्णमूर्ती यांचा जन्मदिन.
- सन १९८६ साली फ्रेंच व्यावसायिक टेनिसपटू रिचर्ड गॅब्रिएल सायर गैस्के यांचा जन्मदिन.
- सन १९८७ साली इंग्लंड देशाचे महान क्रिकेटपटू मोईन अली यांचा जन्मदिन.
- सन १९९४ साली युवा भारतीयह टेनिसपटू प्रार्थना गुलाबराव ठोंबरे यांचा जन्मदिन.
१८ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 18 June Death / Punyatithi /Smrutidin
- इ.स. १८५८ साली मणिकर्णिका तांबे ऊर्फ ‘राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी – इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या.
- सन १९०१ साली महाराष्ट्रीयन थोर साहित्यकार व लेखक तसचं, ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर यांचे निधन.
- सन १९५८ साली इंग्लंड देशाचे क्रिकेटपटू डगलस जार्डिन (Douglas Jardine) यांचे निधन.
- सन १९७४ साली भारतीय स्वातंत्र सेनानी, संसद सदस्य व हिंदी भाषिक साहित्यिक सेठ गोविंद दास यांचे निधन.
- सन १९९९ साली महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक व कथा कादंबरीकार श्रीपाद रामकृष्ण काळे यांचे निधन.
- सन २००३ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता व लेखक जानकीदास मेहरा यांचे निधन.
- सन २००५ साली प्रसिद्ध भारतीय सेवानिवृत्त कसोटी क्रिकेटपटू मुश्ताक अली यांचे निधन.
- सन २००९ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय संगीतकार, शास्त्रीय गायक व सरोद वादक अली अकबर ख़ाँ यांचे निधन.