16 June Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटना तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन, निधन, असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कार्यबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
आजच्या दिवशी रशियन अंतराळवीर व्हॅलेंटाइना व्लादिमिरोवना तेरेशकोवा (Valentina Vladimirovna Tereshkova) यांनी वोस्टोक 6 नावाच्या अंतराळ यानातून आपल्या अंतराळ प्रवासाला सुरुवात केली. अंतराळात प्रवेश करणाऱ्या त्या जगातील पहिल्या तरून महिला ठरल्या. त्यांच्या आठवणीचा उजाळा देणार दिवस म्हणजे आजचा दिवस होय.
जाणून घ्या १६ जून रोजी येणारे दिनविशेष – 16 June Today Historical Events in Marathi
१६ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 16 June Historical Event
- इ.स. १९०३ साल फोर्ड मोटार कंपनीला सुरुवात करण्यात आली.
- सन १९११ साली अमेरिकेतील न्यूयार्क या शहरात आय. बी. एम या कंपनीची स्थपना करण्यात आली. सुरुवातीला या कंपनीचे नाव कम्प्युटिंग टॅब्युलेटिंग रेकॉर्डिंग कंपनी असे होतं.
- सन १९१४ साली भारतीय जहालमतवादी नेते लोकमान्य टिळक यांची सहा वर्षानंतर तुरुंगातून सुटका करण्यात आली.
- सन १९६३ साली रशियन अंतराळवीर व्हॅलेंटाइना व्लादिमिरोवना तेरेशकोवा(Valentina Vladimirovna Tereshkova) ह्या अंतराळात उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या आणि सर्वात तरुण महिला ठरल्या.
- सन २००७ साली भारत वंशीय अमेरिकन अंतराळवीर सुनिता विलियम्स अवकाशात जास्त काळ राहणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.
- सन २०१० साली तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.
१६ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 16 June Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १७२३ साली स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ, तत्ववेत्ता आणि लेखक तसचं, “द फादर ऑफ इकॉनॉमिक्स” म्हणून ओळखले जाणारे अॅडम स्मिथ(Adam Smith) यांचा जन्मदिन.
- सन १९१० साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजनीतिज्ञ तथा उडीसा व मध्यप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल सी. एम. पुनाचा यांचा जन्मदिन.
- सन १९२० साली राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध भारतीय संगीत दिग्दर्शक व बंगाली, हिंदी आणि अन्य भाषिक गायक हेमंत मुखर्जी उर्फ हेमंत कुमार मुखोपाध्याय यांचा जन्मदिन.
- सन १९३६ साली भारतीय साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय उर्दू कवी, शायर अख़लाक़ मुहम्मद ख़ान शहरयार यांचा जन्मदिन.
- सन १९५२ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा जन्मदिन.
- सन १९६८ साली प्रख्यात भारतीय राजकारणी व दिल्ली राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री तसचं, ‘आम आदमी पक्षाचे’ संस्थापक व अध्यक्ष, समाजसेवक, व सनदी अधिकारी अरविंद केजरीवाल यांचा जन्मदिन.
- सन १९९४ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकर यांचा जन्मदिन.
१६ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 16 June Death / Punyatithi /Smrutidin
- सन १९११ साली हॉंगकॉंग देशांतील भारत वंशीय पारशी उद्योगपती व हॉंगकॉंग विद्यापीठाचे संस्थापक सर होर्मसजी नौरोजी मोडी यांचे निधन.
- सन १९२५ साली ब्रिटीश कालीन भारतातील बंगाली राजकारणी, प्रख्यात वकील , भारतीय राष्ट्रीय चळवळीचे कार्यकर्ते आणि बंगालमधील स्वराज पक्षाचे संस्थापक-नेते चित्तरंजन दास यांचे निधन.
- सन १९४४ साली प्रख्यात भारतीय बंगाली रसायनशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, उद्योगपती आणि परोपकारी भारतातील रसायनशास्त्राचे जनक आचार्य सर प्रफुल्ल चन्द्र राय यांचे निधन.
- सन १९७७ साली महाराष्ट्रीयन मराठी गायक, संगीत नाटक-अभिनेते श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचे निधन.
- सन १९९५ साली प्रसिद्ध भारतीय गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या मातोश्री शुद्धमती उर्फ ताई मंगेशकर यांचे निधन.
- सन २०१० साली भारतीय मल्याळम भाषिक चित्रपट दिग्दर्शक पी. जी. विश्वभरन यांचे निधन.
- सन २०१५ साली भारतीय वास्तुकार व शहरी रचनाकार चार्ल्स मार्क कोरिया(Charles Mark Correa) यांचे निधन.