15 June Dinvishes
मित्रांनो, आज दिवस हा इतिहास काळात घडलेल्या एका भयंकर दुःखद घटनेचा साक्षीदार आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा, भारताची फाळणी केली गेली होती, त्या फाळणी नुसार भारत आणि पाकिस्तान अश्या दोन राष्ट्रांची निर्मिती करण्यात आली होती. देशाची फाळणी झाली तेव्हा देशांत खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. लाखो लोक बेघर झाले होते.
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी झालेली ही फाळणी आजच्या दिवशी म्हणजे सन १५ जून १९४७ साली दिल्ली येथे अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सदस्यांनी दिल्ली येथे झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात फाळणीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. १४ ऑगस्ट च्या मध्यरात्री ठीक १२ वाजता ही फाळणी होऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले. या प्रस्तावाची आठवण म्हणून आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे.
तसचं मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या १५ जून रोजी येणारे दिनविशेष – 15 June Today Historical Events in Marathi
१५ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 15 June Historical Event
- इ.स. १७६२ साली ऑस्ट्रिया देशांत कागदी नोटाचे चलन सुरु करण्यात आले.
- इ.स. १८६९ साली महाराष्ट्रात विधवा विवाह पध्दत मोडीत काढून पहिला विधवा विवाह श्री. पांडुरंग विनायक करमकर यांनी वेणूताईच्या गळ्यात माळ घालून साजरा केला.
- सन १९०८ साली कलकत्ता शेयर बाजाराची सुरुवात करण्यात आली.
- सन १९४७ साली अखिल भारीय कॉंग्रेस ने दिल्ली येथे भारताचे विभाजन करण्यासाठी ब्रिटीश योजनेचा स्वीकार केला.
- सन १९९३ साली संपूर्ण भारतीय बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची तुकडी भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.
- सन २००१ साली प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळ पटू ग्रँडमास्टरविजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी नॅशनल ‘ए’ विस्डम स्पर्धा सलग पाचव्यांदा जिंकून विश्वविक्रम रचला.
१५ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 15 June Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८८४ साली स्वातंत्रपूर्व भारतातील ब्रिटीशविरोधी बंगाली भारतीय क्रांतिकारक आणि आंतरराष्ट्रीयतावादी विद्वान तारकनाथ दास यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९९ साली भारतीय सैन्य दलाचे माजी सैन्य प्रमुख जनरल महाराज श्री राजेंद्रसिंह जडेजा यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९९ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार, शिल्पकार, आणि ललित कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष देवी प्रसाद राय चौधरी यांचा जन्मदिन.
- सन १९०७ साली महाराष्ट्रीयन समाजवादी नेते आणि मराठी लेखक नारायण गणेश गोरे यांचा जन्मदिन.
- सन १९१२ साली प्रसिद्ध उत्तर भारतीय साहित्यकार श्रीमन्नारायण अग्रवाल यांचा जन्मदिन.
- सन १९२८ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, समिक्षक, शिक्षक. ललित लेखक, उत्तम वक्ता व सूत्रसंचालक साहित्यकार शंकर वैद्य यांचा जन्मदिन.
- सन १९२९ साली लोकप्रिय भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री व पार्श्वगायिका सुरैया जमाल शेख यांचा जन्मदिन.
- सन १९३३ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखिका, समिक्षक, ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा साहित्याच्या साहित्यकार तसचं, महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या माजी संचालक सरोजिनी वैद्य यांचा जन्मदिन.
- सन १९३४ साली भारतीय राजकारणी व राज्यसभेचे सदस्य देवदास आपटे यांचा जन्मदिन.
- सन १९३७ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ भारतीय समाजसेवक किसन बाबुराव हजारे उर्फ अण्णा हजारे यांचा जन्मदिन.
- सन १९४३ साली माजी भारतीय क्रिकेटपटू तपन बॅनर्जी यांचा जन्मदिन.
- सन १९५० साली भारतीय स्टील उद्योग सम्राट व जगातील सर्वात मोठ्या स्टीलमेकिंग कंपनी आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल यांचा जन्मदिन.
१५ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 15 June Death / Punyatithi /Smrutidin
- इ.स. १८७८ साली भारतातील ‘राधा स्वामी सत्संग’ पंताचे संस्थापक शिव द्याल साहब यांचे निधन.
- सन १९३१ साली महाराष्ट्रीयन मराठी पत्रकार व ‘संदेश’ वृत्तपत्राचे संस्थापक- संपादक अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन.
- सन १९७१ साली अमेरिकन नोबल पारितोषिक विजेता जीवरसायनशास्त्रज्ञ वेंडेल मेरीडिथ स्टॅनले(Wendell Meredith Stanley) यांचे निधन.
- सन १९८३ साली प्रसिद्ध भारतीय तेलगु भाषिक कवी आणि गीतकार तसचं, पेन इंडिया, साहित्य अकादमी, दक्षिण भारतीय चित्रपट लेखक संघ, मद्रासचे माजी उपाध्यक्ष आणि आंध्रच्या क्रांतिकारक लेखक संघटनेचे माजी अध्यक्ष श्रीरंगम श्रीनिवास राव उर्फ श्री श्री यांचे निधन.
- सन २००६ साली प्रसिद्ध भारतीय गायिका व गीतकार तसचं, पंजाबी लोकगीत गायक, व हिंदी चित्रपट पार्श्वगायिका सुरिंदर कौर यांचे निधन.