10 June Dinvishes
मित्रांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य यासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच, आज महाराष्ट्र राज्य दृष्टीदिन राज्यातील अंध व्यक्तीना समर्पित हा दिन दरवर्षी सन १९८२ सालापासून आपल्या राज्यात साजरा करण्यात येतो.
जाणून घ्या १० जून रोजी येणारे दिनविशेष – 10 June Today Historical Events in Marathi
१० जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 10 June Historical Event
- इ.स. १७६८ साली मराठा पेशवा साम्राज्याचे शासक माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामध्ये धोडपची लढाई होऊन त्या लढाईत राघोबादादा यांचा पराभव झाला.
- सन १९४० साली दुसऱ्या महायुद्धा दरम्यान नॉर्वे देशाने जर्मन देशासमोर शरणागती पत्कारली.
- सन १९७७ साली अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी ॲपल इंक ने आपला ॲपल २ हा संगणक बाजारात विक्रीस आणला.
- सन १९८२ सालापासून दरवर्षी महाराष्ट्र राज्यात दृष्टीदिन हा साजरा केला जातो.
- सन १९९९ साली प्रसिद्ध भारतीय तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतिल प्रतिष्ठित पुरस्कार नॅशनल हेरिटेज करिता त्यांची निवड करण्यात आली.
१० जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 10 June Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स १८९० साली भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न सन्मानित भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता व राजकारणी तसचं, आसाम प्रांताचे शेवटचे पंतप्रधान व आसाम राज्याचे पहिले मुख्यमंत्री गोपीनाथ बोरदोलोई यांचा जन्मदिन.
- सन १९०८ साली भारतीय भूसेना दलाचे माजी लष्कर प्रमुख जनरल जयंतनाथ चौधरी यांचा जन्मदिन.
- सन १९३८ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय भारतीय अब्जाधीश उद्योजक आणि परोपकारी तसचं, बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा जन्मदिन.
- सन १९५५ साली सर्वोत्कृष्ट भारतीय बॅडमिंटनपटू म्हणून अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार सन्मानित माजी भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांचा जन्मदिन.
- सन १९५८ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यिक व समाजसेवक अनुप सेठी यांचा जन्मदिन.
- सन १९७२ साली प्रसिद्ध भारतीय अमेरिकन व्यावसायिक कार्यकारी अधिकारी, अल्फाबेट इंक चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गुगल चे व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांचा जन्मदिन.
- सन १९८१ साली सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडूचा भारतीय खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय पॅराऑलम्पिक भाला फेकपटू देवेंद्र झाझरिया यांचा जन्मदिन.
- सन २००० साली जगातील सर्वोच शिखर माउंट एवरेस्ट ची मोजणी करणाऱ्या व ते शिखर केवळ एक वर्ष आणि अकरा महिन्यात सर करणाऱ्या विश्वातील पहिली युवा गिर्यारोहिका भारतीय युवा गिर्यारोहिका मालावथ पूर्णा यांचा जन्मदिन.
१० जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 10 June Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १८३६ साली फ्रेंच देशांतील प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ आंद्रे अँपिअर(André-Marie Ampère) यांचे निधन.
- इ.स. १८७७ साली ब्रिटीश कालीन भारतातील कोलकाता (कलकत्ता) शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता रामनाथ टागोर यांचे निधन.
- सन १९०३ साली प्रसिद्ध इटालियन गणितशास्त्रज्ञ लुइगी क्रेमॉना(Luigi Cremona) यांचे निधन.
- सन १९५७ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित आधुनिक पंजाबी साहित्याचे प्रवर्तक, नाटककार, उपन्यासकार, निबंधाकर, चरित्रकार आणि कवी भाई वीरसिंह यांचे निधन.
- सन १९७६ साली ऑस्ट्रिया-हंगेरी वंशीय अमेरिकन चित्रपट निर्माते व पॅरामाउंट पिक्चर्सचे संस्थापक अॅडॉल्फ झुकोर(Adolph Zukor) यांचे निधन.
- सन १९८७ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता जीवन यांचे निधन.
- सन २००१ साली महाराष्ट्रीयन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या फुलवंतीबाई झोडगे यांचे निधन.
- सन २००६ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय गुजराती भाषिक लेखक गुलाबदास ब्रोकर यांचे निधन.