5 June Dinvishes
मित्रांनो, आपण सर्वांना माहितीच असेल की, आज जागतिक पर्यावरण दिन आहे. दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याची सुरुवात सन १९७२ साला संयुक्त राष्ट्राने केली होती. संयुक्त राष्ट्राचे असे करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे, पर्यावरणाच्या प्रती सर्व लोकांना जागृत करणे असा होता. बदलत्या काळानुसार पर्यावरणातील कार्बनडॉय ऑक्साईडचे प्रमाण हे दिवसांदिवस वाढतच चालले आहे. पर्यावरणातील कार्बनडॉय ऑक्साईडची वाढ ही एक गभीर समस्या आहे. जी आज आपण सर्वांकरिता एक डोकेदुखी बनली आहे. याच कारणामुळे संयुक्त राष्ट्राने देशातील सर्व जनतेला आपल्या पर्यावरणाच्या संरक्षनाप्रती जागृत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले.
तसचं, आजच्या दिवशी सन १९८४ साली पंजाब मधील अमृतसर मंदिराच्या आत काही अतिरेकी जाऊन दडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी देशाच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आपल्या लष्करी दलाला मंदिरावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. याकरिता ऑपरेशन ब्लू ही मोहीम राबविली गेली.
तसचं, मित्रानो आज आपण या लेखाच्या माध्यमातून काही इतिहास कालीन घडलेल्या ऐतिहासिक घटना, देश विदेशातील महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांचे शोध कार्य आदी संपूर्ण घटनांची माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या ५ जून रोजी येणारे दिनविशेष – 5 June Today Historical Events in Marathi
५ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 5 June Historical Event
- इ.स. १५०७ साली इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांनी व्यापार करारावर आपली सहमती दर्शविली.
- सन १६५९ साली मुघल बादशाहा औरंगजेब यांनी दिल्ली येथे राज्याभिषेक केला.
- सन १९०७ साली स्वामीनारायण पंथाची स्थापना करण्यात आली.
- सन १९५२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही कायदा पदवी बहाल केली.
- सन १९७५ साली इजिप्त देशांतील सुएझ कालवा हा सन १९६७ सालापासून वापरण्यास बंद करण्यात आला होता तो जवळपास आठ वर्षानंतर वाहतुकीसाठी उघडा करण्यात आला.
- सन १९८० साली भारतीय संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस चे (AITUC) सहसंस्थापक नारायणराव मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.
- सन १९८४ साली अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.
५ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 5 June Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८७९ साली भारतीय व्यापारी संघटनेचे नेते आणि समाजसेवक गोपाळ कृष्ण गोखले यांचे अनुयायी व भारतीय स्वातंत्र्य सेनानी नारायण मल्हार जोशी यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८१ साली महाराष्ट्रीयन हार्मोनियम वादक, रंगमंच अभिनेता आणि संगीतकार गोविंदराव टेंबे यांचा जन्मदिन.
- सन १९०० साली नोबल पारितोषिक विजेते हंगेरियन-ब्रिटीश इलेक्ट्रिकल अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ डेनिस गॅबर यांचा जन्मदिन.
- सन १९०८ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसंस्थापक रवी नारायण रेड्डी यांचा जन्मदिन.
- सन १९४५ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू अंबर रॉय यांचा जन्मदिन.
- सन १९४६ साली इंग्लंड देशातील फॉर्म्युला वन संघाचे सह-संस्थापक आणि माजी अभियांत्रिकी संचालक सर पॅट्रिक हेड यांचा जन्मदिन.
- सन १९५० साली ब्रिटीश कॉमनवेल्थ खेळातील सुवर्णपदक विजेते भारतीय महाराष्ट्रीयन कुस्तीगीर व कुस्ती प्रशिक्षक हरिश्चंद्र माधवराव बिराजदार यांचा जन्मदिन.
- सन १९६१ साली प्रसिद्ध भारतीय टेनिस प्रशिक्षक व माजी टेनिस खेळाडू रमेश कृष्णन यांचा जन्मदिन.
- सन १९७२ साली प्रसिद्ध भारतीय हिंदुत्ववादी राजकारणी व उत्तरप्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्मदिन.
५ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 5 June Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९१० साली अमेरिकन लघुकथा लेखक ओ. हेनरी यांचे निधन.
- सन १९१६ साली ब्रिटीश कालीन भारतातील ब्रिटीश लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि वसाहती प्रशासक व्हाईसराय लॉर्ड हर्बर्ट किचनर यांचे निधन.
- सन १९४२ साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील प्रतिभाशाली गझल आणि गीत गायक मास्टर मदन यांचे निधन.
- सन १९७३ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी अध्यक्ष आणि पुस्तक लेखक माधव गोळवलकर यांचे निधन.
- सन १९९६ साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी साहित्य आणि संस्कृतीचे लेखक व अभ्यासक कुबेरनाथ राय यांचे निधन.
- सन २००४ साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष तसचं, कॅलिफोर्नियाचे 33 वे गव्हर्नर व हॉलीवूड अभिनेते रोनाल्ड विल्सन रीगन यांचे निधन.
- सन २०१७ साली भारतातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथून सर्वात जास्त जड वजनी “जीएसएलव्ही मार्क -3 डी -1” रॉकेट् चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं.