4 June Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास कालीन ऐतिहासिक घटना, तसचं काही विशिष्ट व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे शोधकार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या ४ जून रोजी येणारे दिनविशेष – 4 June Today Historical Events in Marathi
४ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 June Historical Event
- इ.स.१८९६ साली अमेरिकन उद्योगपती व फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेनरी फोर्ड यांनी अमेरिकेतील डेट्रॉइट शहरात आपल्या पहिल्या फोर्ड मोटारीची यशस्वी चाचणी घेतली.
- सन १९२९ साली अमेरिकन उद्योगपती व ईस्टमेन कोडक कंपनीची संस्थापक जॉर्ज ईस्टमैन यांनी पहिल्या रंगीत चित्रपटाचा नमुना सादर केला.
- सन १९४० साली द्वितीय महायुद्धादरम्यान जर्मन सैन्यांनी फ्रांस देशाची राजधानी पॅरिसमध्ये प्रवेश केला.
- सन १९४४ साली द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळी अमेरिकेच्या सैन्यांनी रोम देशांत प्रवेश केला.
- सन १९५९ साली भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय नागरिक सी राजगोपालचारी यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.
- सन १९९३ साली भारतीय युद्ध नौका आय.एन. एस म्हैसूर चे जलावतरण करण्यात आले.
- सन १९९४ साली सुप्रसिद्ध भारतीय गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब पुरस्कार जाहीत करण्यात आला.
- सन १९९७ साली इनसॅट -2 डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे प्रक्षेपण फ्रेंच गयानातील कौऊरु येथून यशस्वीपणे करण्यात आले.
- सन २००८ साली हरियाणा राज्य सरकारकडून २५ वर्षांखालील मुलींना कौटुंबिक पेन्शनचा लाभ जाहीर करण्यात आला.
४ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 4 June Birthday / Jayanti / Birth Anniversary
- सन १९०४ साली भारतीय लेखक, प्रकाशक आणि पर्यावरणवादी भगत पूरन सिंह यांचा जन्मदिन.
- सन १९३१ साली भारतीय रंगहीन हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध अभिनेत्या बिना राय यांचा जन्मदिन.
- सन १९३६ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्या नूतन यांचा जन्मदिन.
- सन १९४६ साली पद्मश्री पुरस्कार, तसचं, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायक, संगीत दिग्दर्शक, अभिनेता आणि चित्रपट निर्माता एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचा जन्मदिन.
- सन १९४७ साली लोकप्रिय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ याचा जन्मदिन.
- सन १९५९ साली प्रसिद्ध भारतीय उद्योगपती व रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल धीरूभाई अंबानी यांचा जन्मदिन.
- सन १९७५ साली प्रख्यात अमेरिकन चित्रपट अभिनेत्री एंजेलिना जोली यांचा जन्मदिन.
४ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4 June Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९१८ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी भाषिक कवी व भाषांतरकार रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर यांचे निधन.
- सन १९८९ साली अमेरिकन व्यंगचित्रकार डिक ब्राउन यांचे निधन.
- सन २०१४ साली अमेरिकन बेसबॉल खेळाडू, व्यवस्थापक आणि मेजर लीग बेसबॉल (एमएलबी) चे प्रशिक्षक डॉन झिम्मर यांचे निधन.
- सन २०१५ सकू सुप्रसिद्ध अमेरिकन विन्स्टन चषक मालिका कार रेस ड्रायव्हर जबे थॉमस यांचे निधन.