Marathi Kavita Jeevan Saathi
आयुष्यात कधीतरी एखादी व्यक्ती आपली काळजी करणारी मिळावी असे प्रत्येकाला वाटत असते, जीच्याकडे मनातील प्रत्येक गोष्ट सांगता यावी तेही कोणत्याही गोष्टीची भीती न बाळगता आणि त्याच व्यक्ती सोबत संपूर्ण आयुष्य हे सुखात घालवावे असे प्रत्येकाला वाटत असते, यावर मी एक कविता लिहिली आहे आशा करतो आपल्याला आवडणार.
“असे कुणी मिळावे ” एक मराठी कविता – Marathi Kavita Navra Bayko
एकदा तरी आयुष्यात असे कुणी मिळावे
ज्याला माझे दुःख न सांगता कळावे,
त्याने हात फिरवता सर्व दुःख दूर पळावे,
त्याच्याच मांडीवर अखेरचा श्वास मी घ्यावे.
एकदातरी आयुष्यात असे कुणी मिळावे.
त्याने मायेची कधी कमतरता भासू न द्यावे,
चुकलो मी कधी तर त्याने समजवावे,
असे करता करता आयुष्य माझे निघावे,
एकदातरी आयुष्यात असे कुणी मिळावे.
सुकलेल्या घश्याची तहान त्याने व्हावे,
अश्रूंच्या धारेचा बांध त्याने व्हावे,
संकटकाळात मी फक्त त्यालाच शोधावे
एकदातरी आयुष्यात असे कुणी मिळावे.
हळव्या शब्दांनी त्याने मला दुखवावे
पण रुसलेले असताना त्याने मला मनवावे,
प्रत्येक परिस्थितीत त्याने सोबत माझ्या रहावे
एकदातरी आयुष्यात असे कुणी मिळावे.
स्वास मी त्याचा अन त्याने माझे प्राण व्हावे
शरीर दोन असले तरी आत्मा एक असावे
३६ गुण जुळले नाही तरीही त्याने माझे असावे
एकदातरी आयुष्यात असे कुणी मिळावे
जखम मला झाली तरी अश्रू त्याचे निघावे
न कळता त्याने मला प्रेम दाखवावे
आणि हसत हसत म्हातारपणी दोघांचे दात सोबत पडावे
एकदातरी आयुष्यात असे कोणी मिळावे.
युवाकवी
– वैभव भारंबे.
प्रत्येकाला जीवनात अशी एखादी व्यक्ती हवी असतेच काही जणांच्या जीवनात अशी व्यक्ती असेलही जी त्यांची काळजी स्वतःपेक्षा जास्त घेत असेल, आणि कवितेची सांगता हसण्याने झाली तर आशा करतो आपल्याला ही Marathi Poem on Life Partner लिहिलेली कविता आवडली असेल.अश्याच कवितांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!