21 May Dinvishes
मित्रांनो,आज जागतिक दहशतवादी विरोधी दिन त्यानिमित्ताने संपूर्ण जगभर हा दिवस पाळला जातो. सन १९९१ साली निवडणुकी प्रचार प्रसंगी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे प्रचारासाठी तामिळनाडू मधील श्रीपेरंबुदुर या ठिकाणी एका आमसभेला संबोधित करण्यासाठी गेले असतांना.
त्यांचे स्वागत करण्यासाठी त्यांचे हजारो समर्थक त्या ठिकाणी जमा झाले होते. त्यांचे समर्थक त्यांच्या गळ्यात फुलांचे हार घालत होते. याचाच फायदा घेऊन लिट्टे या आतंकवादी संघटनेने बॉम्ब ठेवलेला हार त्यांच्या गळ्यात घातला व तेथे मोठा स्फोट झाला त्या स्फोटातच राजीव गांधी यांचे निधन झाले. त्यांचे बलिदान म्हणून २१ मे हा दिवस जागतिक आतंकवादी दिवस म्हणून पाळला जातो.
तसचं, आजच्या दिवशी सन १९९४ साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री सुश्मिता सेन यांनी वयाच्या १८ व्या वर्षी विश्वसुंदरी हा किताब जिंकून संपूर्ण विश्वात आपल्या देशाचे नाव मोठे केलं. याचप्रमाणे आज आपण, या लेखाच्या माध्यमातून काही महत्वपूर्ण व्यक्तींच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, काही ऐतिहासिक माहिती, शोध आदी सर्व बाबी जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या २१ मे रोजी येणारे दिनविशेष – 21 May Today Historical Events in Marathi
२१ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 21 May Historical Event
- इ.स. १८८१ साली अमेरिकेतील टेनिस खेळाकरिता प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय नियामक संस्था (युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशन) ची स्थापना करण्यात आली.
- इ.स. १८८१ साली युरोपीय देशांतील गृहयुद्ध संपल्यानंतर क्लारा बार्टन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. मध्ये अमेरिकन रेड क्रॉसची स्थापना केली.
- सन १९०४ साली फुटबॉल खेळाची सर्वोच्च संस्था आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाची (फिफा) स्थापना पॅरिस या देशांत करण्यात आली.
- सन १९७० साली अमेरिका राष्ट्राने देशांत आण्विक शास्त्राची चाचणी केली.
- सन १९९१ साली भारतीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य व भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची लिट्टे या आतंकवादी संघटनेने मानवी बॉम्बस्फोटच्या माध्यमातून पेरबुदूर येथे हत्या केली.
- सन १९९४ साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट आभिनेत्या सुश्मिता सेन यांनी फिलीफिंस देशाची राजधानी मनिला येथे आयोजित ४३ वा विश्वसुंदरी किताब आपल्या नावे केला.
२१ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 21 May Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १४७१ साली प्रसिद्ध जर्मन चित्रकार अल्ब्रेक्ट ड्यूरर यांचा जन्मदिन.
- सन १९१६ साली प्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार व लेखक हॅरोल्ड रॉबिन्स यांचा जन्मदिन.
- सन १९२२ साली प्रसिद्ध अमेरिकन आंतरराष्ट्रीय व्यावसायिक कोर्टाचे न्यायाधीश जेम्स लोपेझ वॉटसन यांचा जन्मदिन.
- सन १९२८ साली सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक, व कला समिक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा जन्मदिन.
- सन १९३० साली प्रख्यात ऑस्ट्रेलियन राजकारणी व लिबरल पार्टीचे नेता तसचं, ऑस्ट्रेलियाचे २२ वे पंतप्रधान जॉन मॅल्कम फ्रेझर यांचा जन्मदिन.
- सन १९३१ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी, लेखक, व्यंगचित्रकार तसचं, हिंदी चित्रपट व दूरदर्शन मालिकांचे संवाद आणि पटकथा लेखक शरद जोशी यांचा जन्मदिन.
- सन १९७१ साली प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माता व पटकथा लेखक आदित्य चोपडा यांचा जन्मदिन.
२१ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 21 May Death / Punyatithi /Smrutidin
- सन १९२९ साली युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान आर्किबाल्ड फिलिप प्रिमरोज यांचे निधन.
- सन १९७३ साली महाराष्ट्रीयन मराठी मुद्रण व प्रकाशन शेत्राचे व्यावसायिक बाळकृष्ण ढवळे यांचे निधन.
- सन १९७९ साली ब्रिटीश कालीन भारतातील स्वातंत्र्य कार्यकर्त्या व अवज्ञा आंदोलनाच्या सदस्या जानकीदेवी बजाज यांचे निधन.
- सन १९९१ साली भारताचे भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांची आतंकवादी संघटन लिट्टे द्वारा पेरुबुदूर येथे मानवी बॉम्बस्फोट घडवून त्यांची हत्या करण्यात आली.
- सन १९९३ साली ब्रिटीश सैन्य दलातील हवाई अधिकारी मेजर जनरल जॉन डटन “जॉनी” फ्रॉस्ट यांचे निधन.
- सन २००५ साली बंगाल वंशीय सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक सुबोध मुखर्जी यांचे निधन.