Rainfall Measurement Methods
आपण बरेचदा बातम्यांमध्ये ऐकत असतो आज राज्यात इतक्या पावसाची नोंद झाली, एवढा पाऊस पडला. या सर्व बातम्यांसाठी कुठून माहिती येते आणि यांना कशाप्रकारे माहिती होत की राज्यात एवढा पाऊस पडला, तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की पावसाची नोंद कशाप्रकारे केल्या जाते आणि कशाच्या साहाय्याने केली जाते, तर चला पाहूया..
तुम्हाला माहिती आहे का, पावसाचे पाणी कसे मोजतात? – How to Measure RainFall in Marathi
पावसाच्या पाण्याला कश्या प्रकारे मोजल्या जातं असेल? पावसाच्या पाण्याला मापण्यासाठी एका वस्तूचा वापर केला जातो. त्याला पाऊस मोजणी यंत्र म्हटल्या जातं, या यंत्राला खुल्या जागी लावलं जात जिथे झाडे किंवा घर, वगैरे नसतील, यामागे हे कारण आहे की आभाळातून पडणारे पावसाचे पाणी हे या चंचू पात्रासारख्या यंत्रात योग्य रित्या पडावे आणि ते पाणी कोठेही अडता कामा नये.
सर्वात आधी या पाऊस मोजणी यंत्राचा शोध हा क्रिस्टोफर व्रेन ने १६६२ मध्ये लावला होता आणि त्याच साली सर्वात आधी पावसाचे माप घेण्यात आले होते. सर्वात आधी पाऊस त्या बॉटल सारख्या यंत्रात पडतो आणि त्यानंतर त्या पावसाच्या पाण्याला एका स्केल असलेल्या चंचुपात्रात टाकल्या जाते आणि त्या चंचुपात्रावर असलेल्या स्केल नुसार पावसाची नोंद केल्या जाते, पावसाच्या पाण्याचे मोजमाप हे मिलिमीटर मध्ये केल्या जाते आणि जेवढे जास्त मिलिमीटर पाऊस पडलेला असतो तेवढी जास्त प्रमाणात वर्षा झालेली आहे आपल्याला बातम्यांच्या माध्यमातून कळतं.
तर पावसाचे पाणी कसे मोजतात हे या लेखातून आपल्याला कळले असेलच आशा करतो लिहिलेला हा छोटासा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!