Baba Vanga Information
मंडळी आज माझ्या मित्रानं गाडी घेतली बरं का…
हो म्हणजे आज जेंव्हा नवी कोरी चारचाकी घेऊन तो मला दाखवायला आलानं तेंव्हा आश्चर्य आणि आनंद असा संमिश्र भाव माझ्या चेहऱ्यावर उमटला.
त्याने मला पेढा भरवला मी त्याचं अभिनंदन केलं, आणखीन एका गोष्टीचं मला नवल वाटलं बरं का…
आठ दिवसां आधीच्या वर्तमानपत्रात आलेल्या राशिभविष्यात मित्राचे गाडी घेण्याचे योग सांगितले होते.
आश्चर्यच ना? राशिभविष्यात येतं काय आणि मित्र गाडी घेतो काय…
मंडळी तुमचा आहे का हो राशीभविष्यावर विश्वास? अहो आपल्यातलेच काहीजण अगदी न चुकता वर्तमानपत्रात येणारं रोजचं राशिभविष्य आवर्जून वाचतातच आणि त्यानुसार वागतात देखील…
बरं आजचा हा भविष्यावरचा लेखन प्रपंच करण्यामागचं कारण सांगतो, बुल्गारिया इथल्या कोणी एक बाबा वंगा त्यांच्या बऱ्याच वर्षांआधी करून ठेवलेल्या भाविष्यवाणीने भलत्याच प्रसिद्धीस आल्या आहेत. त्यांनी केलेल्या भविष्यवाणी आजमितीस तंतोतंत खऱ्या ठरतायेत व सगळ्यांनाच त्याची दखल घेण्यास भाग पाडतायेत.
कोण आहेत या बाबा वंगा आणि त्यांनी केलेली कोणकोणती भविष्यवाणी आजवर खरी ठरली आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…
बाबा वंगा यांची भविष्यवाणी – Baba Vanga Predictions
बुल्गारिया इथल्या बाबा वंगा यांची माहिती – Baba Vanga Mahiti
बाबा वेंगांना ‘नास्त्रेदमस फ्रॉम द बाल्कन’ या नावाने ओळखलं जातं.
त्यांनी आजवर जे जे भविष्य वर्तवलं ते खरं ठरलं.
फ्रांस व अमेरिकेवर 9/11 चा आतंकी हमला, सुनामी, फुकुशिमा दुर्दैवी घटना, आतंकी संघटनांचे वाढते वर्चस्व यांसारख्या बाल्कन ने फार आधी भूतकाळात वर्तविलेल्या घटना आज तंतोतंत घडतांना दिसतायेत.
- 2010 ला मध्यपूर्वेत संघर्ष वाढीस लागेल हे देखील त्या बोलल्या होत्या.
- 2016 साली युरोपवर मुस्लिम आतंकवाद्यांचा हल्ला होण्याची भविष्यवाणी त्यांनी केली होती.
- येणाऱ्या काळात मंगळग्रहावर युद्ध होण्याची भीती त्यांनी फार आधी व्यक्त केली आहे.
कोण आहेत बाबा वंगा – Who are Baba Vanga
बुल्गारिया येथे जन्माला आलेल्या वेंगेलिया पांडेवा दिमित्रोवा वयाच्या 12 वर्षा पर्यंत तुमच्या आमच्या सारखं सामान्य आयुष्य जगल्या…
पुढे एकदा अनपेक्षित आलेल्या वादळाने त्यांची दृष्टी हिरावून नेली, कित्येक दिवसांनी त्या त्यांच्या कुटुंबियांना सापडल्या पण त्यांच्या डोळ्यांमध्ये माती भरलेली होती.
असं असतांना देखील सामान्यांना जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते असामान्य अश्या बाबा वंगा यांना दिसायचं आणि ती भविष्यवाणी करून त्या समोरच्याला मदत करीत असत.
बाबा वंगांची भविष्यवाणी – Baba Vanga Predictions
- बुल्गारिया येथे जन्माला आलेल्या बाबा वंगा दृष्टिहीन भविष्यवक्ता होत्या. रूस आणि युरोप मधे तर त्यांना एक संत म्हणून बराच काळापर्यंत सन्मानित देखील करण्यात आलं…
- वयाच्या 85 व्या वर्षी 1996 साली त्यांचं निधन झालं.
- वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी जवळ-जवळ 100 भविष्यवाणी केल्या.
- यातल्या अधिकाधिक खऱ्या ठरल्या.
- नैसर्गिक आपत्ती आणि वातावरणाशी संबंधित त्यांनी अधिक भविष्य वर्तवलं.
- भविष्यातील राजकीय आणि धार्मिक घटनाक्रम देखील त्यांनी अचूक सांगितला.
- 2001 साली झालेला वर्ल्ड ट्रेड सेंटर वरचा हल्ला, 2004 सालातील सुनामी, मूळ आफ्रिकन वंशाची व्यक्ती (बराक ओबामा) अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होईल, या सगळ्या त्यांनी केलेल्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.
आपल्या मृत्यूपूर्वी बाबा वंगा यांनी 5079 पर्यंतची भविष्यवाणी करून ठेवलीये – Prophecy till 5079 by Baba Vanga Before his Death
- त्यांनी केलेली 2020 या वर्षाची भविष्यवाणी देखील आज खरी ठरू पहाते आहे
- बाबा वंगा बोलल्या होत्या की 2020 साली धर्माच्या आधारावर जगाला विभाजित करण्याचा प्रयत्न होईल.
- 2020 साली संपूर्ण जगाला भयभीत करून सोडणाऱ्या विनाशकारी घटना घडतील
- ज्यामुळे मानवी सभ्यता प्रभावित होईल (आज संपूर्ण जगात कोरोनामुळे होणारे मृत्यू पहाता त्यांच्या या भविष्यवाणीवर देखील विश्वास बसतो)
- वाढत्या प्रदूषणाचा धोका 2020 साली थोडा कमी होईल, वंगा असं म्हणाले होते की या वर्षी लोक पेट्रोल पेक्षा सौर उर्जेवर अधिक भर देतील…
- बाबा वंगा यांनी वर्तविल्या नुसार 2020 साली ब्रम्हांडातील जीवसृष्टीचा शोध घेतला जाईल आणि हे कळेल की पृथ्वीवर जीवनाला खऱ्या अर्थाने कधी सुरुवात झाली.
- त्यांच्या भविष्यवाणीत असं देखील म्हंटल्या गेलंय… येणाऱ्या 200 वर्षांमध्ये लोक अध्यात्माच्या आधाराने दुसऱ्या जगाच्या संपर्कात येतील.
भविष्य वर्तविणाऱ्या मंडळींवर सर्वांचाच विश्वास असतो असं आम्हाला म्हणायचं नाही पण बाबा वंगा यांनी फार पूर्वी वर्तविलेल्या घटना आज आपल्याला विचार करायला भाग पडतायेत हे मात्र नक्की…