Paus Status in Marathi
प्रत्येकाने येरे येरे पावसाची कविता तर ऐकलीच असेल काही जणांची तर पाठही असेल लहानपणी पावसात भिजणे, जहाज सोडणे, मस्ती करणे या सर्व दिवसांची मजा वेगळीच असायची, अस म्हणतात की पाऊस जुन्या आठवणींना जाग करतो, प्रिय व्यक्तीची आठवण करून जातो.
सोबतच त्या पावसात भिजणे कोणाला आवडत नाही. पावसात रमण्यात एक वेगळाच आनंद असतो, आणि ज्यांनी अजूनही तो आनंद घेतला नसेल त्यांना मी एकच सांगेल की एक वेळ पावसाचा आनंद घेऊनच पहा. आजच्या लेखात आम्ही काही Rain Quotes किंवा Rain Status लिहिले आहेत जे आपल्याला आवडतील तर चला पाहूया पावसावरील Quotes.
पावसावरील मराठी कोट्स – Rain Quotes in Marathi
बरसती वर्षाऋतू चिंब ओला उधाणलेला,मनी नवस्वप्नांचा अबीरतसा झुलतो झुला.
हळुवार दाटली मेघ नभी, हळुवार पसरतो गारवा सर्वांग फुलवे आगमनाने भरून वाहतो मनी स्पर्श नवा हर्ष नवा.
Rain Status in Marathi
धो धो कोसळत होता आता आता लगोलाग पडली उन्हे, आपण जरा कौतुक करावे तर पाऊस करते नखरे जुने.
तहानलेल्या त्या धरतीलाही आता चिंब चिंब भिजायचं, पहिल्या पावसाच्या थेंबानी एवढं का मग लाजाव.
Rainy Quotes in Marathi
तो बरसतंच असतो अधुनमधून मग माझेही डोळे पाणावतात ती संधी साधून.
पहिल्या पहिल्या पावसात शिवार दरवळत नव्या नव्यात, हिरवागार एक स्वप्न उभारी घेत धरतीच्या मनात.
पावसावर आधारित मराठी स्टेटस – Monsoon Quotes in Marathi
पावसाच्या त्या रिमझिम धारा ज्या सर्व धरतीला एक वेगळा गंध देऊन जातात, निळ्या आसमंतात सोबत विजाही गळगळतात, पावसामुळे काही दिवसातच सर्व दूर हिरवळ पसरते जशी धरतीमातेने अंगावर शाल घेतल्यासारखे. आपल्या जीवनातच नाही तर पर्यावरणासाठी पावसाचे महत्व खूप आहे. त्याच पावसामुळे जगाचा पोशिंदा संपुर्ण जगाला पोसतो. अश्याच पावसावर हे Quotes आहेत जे आपण सोशल मीडियावर शेयर करू शकता. तर चला पुढेही पाहू काही आणखी पावसावरील Quotes.
पावसाची सर आता नुकतीच बरसली, आणि आठवणींची पाऊलवाट पुन्हा एकदा झळकली.
पाऊस कोसळे हा अंधाराले दिसे, डोळे भरून आले माझे असे कसे.
Paus Status in Marathi
पाऊस आणि आठवण या दोघांच घट्ट नात आहे, फरक फक्त एवढाच आहे की पाऊस फक्त शरीराला भिजवतो आणि आठवण मनाला.
पाऊस एकाच वेळी अनेक ठिकाणी पडत असला तरी प्रत्येकाच भिजण हे वेगळं असत.
तर हे सर्व होते पावसावरील Quotes आशा करतो आपल्याला आवडले असतील आणि या लेखामुळे आपल्याला पावसात जगलेल्या क्षणांची आठवण झाली असेल, आपल्याला हा लेख आवडला असेल तर ह्या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून राहा माझीमराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!