Pratibha Patil chi Mahiti
प्रतिभाताई पाटील हे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्या स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. या व्यतिरिक्त राजस्थान च्या माजी राज्यपाल…राज्यसभा सदस्य…आणि महाराष्ट्र सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील त्यांनी आपली सेवा दिलीये.
एक सशक्त सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. देशातील महिला, गरीब आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाकरता त्यांनी महत्वपूर्ण काम केलं आहे. भारत देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याविषयी ये लेखात अधिक माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया.
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होऊन इतिहास रचणाऱ्या प्रतिभाताई पाटील यांचा जीवन परिचय – First Woman President of India Pratibha Patil Information in Marathi
प्रतिभा पाटील यांचा थोडक्यात महत्वपूर्ण परिचय – Pratibha Patil Biography in Marathi
संपूर्ण नांव (Name) | श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील |
जन्म (Birthday) | 19 डिसेंबर 1934 नांदगाव महाराष्ट्र |
वडील (Father Name) | नारायणराव पाटील |
पती (Husband Name) | देवीसिंह रणसिंह शेखावत |
मुलं (Children) | राजेंद्र सिंह, ज्योती राठोड |
शिक्षण (Education) | एल.एल.बी. (वकील) |
प्रतिभाताई पाटील यांचा जन्म, शिक्षण आणि सुरुवातीचा काळ – Pratibha Patil History
देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 ला महाराष्ट्रातील जळगाव येथे झाला. त्यांचे वडील नारायणराव पाटील राजकारणी होते, आपल्या वडिलांच्या कार्याने प्रभावित होऊन त्या राजकारणात आल्या.
प्रतिभा पाटील यांचे शिक्षण – Pratibha Patil Education
- प्रतिभाताईंचे प्राथमिक शिक्षण जळगाव च्या आर.आर शाळेत झाले. त्यानंतर पुणे विद्यापीठाशी संलग्नित मुलजी जेठा महाविद्यालयातून त्यांनी पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. वकिलीचे अध्ययन त्यांनी मुंबई च्या शासकीय महाविद्यालयात पूर्ण केलं.
- अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातून त्यांनी एम.ए केलं. त्या अगदी सुरुवातीपासून बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या धनी आहेत. शिक्षणा समवेत संगीतात आणि क्रीडा क्षेत्राची देखील त्यांना आवड आहे. तुम्हाला वाचून कदाचित आश्चर्य वाटेल पण प्रतिभाताई टेबल-टेनिस च्या उत्तम खेळाडू होत्या.
- टेबल-टेनिस प्लेयर म्हणून त्यांनी कित्येकदा आपल्या महाविद्यालयाचे आणि विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले व विजयी देखील ठरल्या. याशिवाय 1962 ला एमजे महाविद्यालयात त्यांनी कॉलेज ची “ब्युटी क्वीन’ हा किताब देखील पटकावला.
प्रतिभा पाटील यांचा विवाह आणि मुलं – Pratibhatai Patil Information And Life History
प्रतिभाताई पाटील यांचा विवाह 1965 मधे देवसिंह रणसिंह शेखावत यांच्यासमवेत झाला. विवाहानंतर त्यांना एक मुलगा आणि एक कन्यारत्न झालं. मुलाचे नाव राजेंद्र सिंह आणि मुलगी ज्योती राठौड.
प्रतिभा पाटलांचा राजकीय प्रवास- Pratibha Patil Political Career
- राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी प्रतिभाताई सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या.
- राजकीय प्रवासाला खरी सुरुवात 1962 मधे झाली. त्या दरम्यान महाराष्ट्रातील जळगाव सिट वरून त्या विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल्या.
- 1962 ते 1967 पर्यंत प्रतिभाताई सलग 4 वर्ष मुक्ताईनगर विधानसभा सिट साठी कॉंग्रेस कडून निवडून आल्या आणि MLA पदावर कायम होत्या.
- पुढे 1967 पासून 1972 पर्यंत प्रतिभा पाटील यांनी महाराष्ट्राची राज्यमंत्री म्हणून जनआरोग्य, संसदीय कार्य, आवास, पर्यटना सारखी महत्वपूर्ण खाती सांभाळली.
- 1972 ला प्रतिभाताई पुन्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकल्या आणि यावेळेस त्यांनी महाराष्ट्र शासनात कॅबिनेट मंत्री म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावली.
- समाज कल्याण, पर्यटन, आणि आवास विभागासारखी महत्वाची खाती त्यांच्याकडे होती.
- 1974 ते 1975 प्रतिभा पाटील यांनी महाराष्ट्र सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून जनआरोग्य मंत्रालय व समाज कल्याण मंत्रालय सांभाळले. 1975 पासून 1976 पर्यंत ताईंनी कॅबिनेट मंत्री म्हणून पूनर्वसन आणि सांस्कृतिक विभागाची जवाबदारी सांभाळली.
- ताई 1979 ते 1980 महाराष्ट्र विधानसभेत विरोधीपक्ष प्रमुख देखील होत्या. 1980 साली त्यांनी सलग पाचव्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून येत विजय मिळवला
- 1982 ते 1985 पर्यंत प्रतिभा पाटलांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समाज कल्याण, ग्रामीण विकास, नागरी पुरवठा व आवास मंत्रालयाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. 1986 मधे प्रतिभाताईंनी राज्यसभेत उपसभापती पद देखील भूषविले.
About Pratibha Patil
- 1990 पर्यंत आपला कार्यकाल संपेपर्यंत त्या राज्यसभेवर होत्या. पुढे 1991 ला त्या पहिल्यांदा अमरावती निर्वाचन क्षेत्रातून संसद सदस्य झाल्या. 2004 साली प्रतिभाताईंची योग्यता आणि पक्षासाठीची त्यांची निष्ठा पहाता त्यांना राजस्थान च्या 24 व्या राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले.
- त्या दरम्यान राजस्थान येथे भाजप चे सरकार होते आणि वसुंधरा राजे सिंधिया या मुख्यमंत्री होत्या.
- प्रतिभाताई या ठिकाणी राज्यपाल म्हणून 2007 पर्यंत होत्या, या दरम्यान राजस्थानातील गुर्जर आंदोलनावेळी प्रतिभाताईंनी परिस्थिती अत्यंत शांततेने आणि समंजसपणाने सांभाळली व राजस्थानमधील भाजप च्या लोकतांत्रिक सरकार समवेत जवाबदारीने उभ्या राहील्या.
- 2007 ते 2012 या काळात प्रतिभाताई पाटील यांनी देशातील सर्वोच्च पदावर प्रथम महिला राष्ट्रपती म्हणून देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या पूर्वी राष्ट्रपती पदावर “मिसाइल मैन” एपीजे अब्दुल कलाम विराजमान होते.
- वास्तविक अब्दुल कलाम साहेबांनी आपल्या दुसऱ्या राष्ट्रपती कार्यकाळाला घेऊन अनिच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे युपीए तर्फे राष्ट्रपती पदाकरता प्रतिभाताई पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
- या राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभाताईंनी आपले प्रतिद्वंदी भैरोसिंह शेखावत यांना 3 लाखांहून अधिक मतांनी हरविले.
- राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी भैरोसिंह शेखावतांना राष्ट्रीय जनतांत्रिक संयुक्तपक्षाचे (एनडीए) चे समर्थन मिळाले तर शिवसेना (एनडीए चा मित्रपक्ष असून देखील) संस्थापक बाळासाहेब ठाकरेंनी प्रतिभाताई या मुळात मराठी असल्याच्या मुद्य्यावरून त्यांना समर्थन द्यायचे ठरविले.
सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रतिभा पाटील यांची भूमिका – Pratibha Patil as a Social Worker
प्रतिभाताईंनी स्वतःला केवळ राजकीय भूमिकेतून समाजासमोर ठेवलं असं नव्हे तर त्या सतत सामाजिक बांधिलकी जपत समाज कार्यात देखील अग्रेसर होत्या.
त्यांनी केलेली महत्वाची सामाजिक कार्य अशी आहेत…
- देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी महिलांकरता महिला होम गार्डची स्थापना केली.
- गरीब आणि होतकरू महिलांसाठी संगीत, संगणक, शिवणकामाचे प्रशिक्षण केंद्र देखील सुरु केले.
- ताईंनी मुंबई दिल्ली येथे आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या वर्किंग वूमंस करता वसतिगृह उभारले.
- आपल्या प्रत्येक जवाबदारीला समर्थपणे पूर्णत्वास नेणाऱ्या ताईंनी शिक्षणावर भर देत गरीब आणि मागासलेल्या वर्गातील मुलांसाठी नर्सरी स्कूल ची स्थापना केली
- प्रतिभाताईंनी जळगावला अनुसूचित जनजातीतील युवकांसाठी इंजिनियरिंग कॉलेज सुरु केले.
- अमरावतीत ताईंनी दृष्टीहिनां करता ‘औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ स्थापन केली.
- श्रमसाधना ट्रस्ट च्या कार्यकारी ट्रस्टी म्हणून देखील ताईंनी अनेक महत्वपूर्ण कामं केलीत.
- जळगाव साखर कारखान्याच्या अध्यक्ष म्हणून सुधारणेची अनेक कार्य ताईंनी केलीत.
- ‘महिला विकास मंडळ’ स्थापन करण्यात देखील त्यांचे मोठे योगदान आहे.
- देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांनी जळगावला ‘महिला कॉ.ऑपरेटीव्ह बँकेची’ स्थापना केली.
- शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याकरता आणि शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी अमरावतीत ताईंनी “कृषी विज्ञान केंद” स्थापन केले.
देशाच्या सर्वोच्च पदावर पहिली महिला राष्ट्रपती म्हणून विराजमान होऊन प्रतिभाताई पाटील यांनी केवळ इतिहासच रचला असे नाही, तर महिलांच्या सशक्तीकरणाचं त्या एक उत्कृष्ट उदाहरण ठरल्या.
प्रतिभाताई पाटील या प्रत्येक महिलेकरता एक प्रेरणास्त्रोत आहेत…