Dawood Ibrahim Information
दाऊद इब्राहीम हा एक अंडरवर्ल्ड चा बादशाह आहे, दाऊद इब्राहीम हा गुन्हेगारी जगतातील बादशाह व मोस्ट वॉण्टेड डॉन आहे. भारतीय खुपीया ईगन्सी दाऊद ला पकडण्यासाठी वेगळंवेगळे प्लॅन करत आहे पण अजून त्यात यश आले नाही. अशा खुनकार डॉन बद्दल ची माहिती.
गुन्हेगारी जगतातील बादशाह व मोस्ट वॉण्टेड डॉन दाऊद इब्राहीम ची माहिती – Dawood Ibrahim Biography in Marathi
अंडरवर्ल्डचा बादशहा दाऊद इब्राहीमचा जीवन परिचय – Dawood Ibrahim Information in Marathi
संपूर्ण नांव (Name) | दाऊद इब्राहीम कासकर |
जन्म (Birthday) | 26 डिसेंबर 1955, खेड रत्नगिरी महाराष्ट्र भारत |
वडील (Father Name) | इब्राहीम कासकर ( मुंबई पोलिस हेड कॉन्स्टेबल) |
आई (Mother Name) | अमीना बी ( गृहिणी ) |
भाऊ (Brother) |
|
बहिण (Sister) | सईदा पारकर, फरजाना तुंगेकर, मुमताज शेख, हसीना पारकर |
पत्नी (Wife Name) | मेह्जबीन शेख ( उर्फ जुबीना जरीन ) |
मुलं (Childrens) | मोईन इब्राहिम , मेह्रीन इब्राहीम, मारिया इब्राहिम, माहरुख इब्राहीम |
शाळा (School) | अहमद सैलर हायस्कूल, डोंगरी, मुंबई भारत |
दाऊद इब्राहीम चा जन्म, कुटुंब, शिक्षण, आणि सुरुवातीचे आयुष्य – Dawood Ibrahim History in Marathi
महाराष्ट्रातील रत्नागिरीत 27 डिसेंबर 1955 ला गुन्हेगारी जगतातील बादशहा दाऊद इब्राहीम चा जन्म झाला. त्याचे वडील शेख इब्राहीम अली कासकर मुंबई पोलिसमध्ये हेड कॉन्स्टेबल होते. आईचे नाव अमिना बी. पैसे कमावण्याच्या लालसेने सुरुवाती पासूनच दाऊद इब्राहीम ने गुन्हेगारी जगताकडे जाणारा मार्ग निवडला.
आणि त्यामुळे शाळा त्याने अर्ध्यातच सोडली. युवा अवस्थेतच त्याला दारू पिणे व्यसनं करणे यासारख्या वाईट सवयींनी जखडले इतकेच नव्हे तर या सवयींच्या आहारी गेलेला दाऊद त्या पूर्ण करण्याकरता लहान वयातच चोरी, ड्रग्स सप्लाय, दरोडे, लुटमारी सारखे जगन्य अपराध करू लागला.
दाऊदची प्रेयसी…विवाह…मुलं – Dawood Ibrahim Marriage in Marathi
हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मंदाकिनी समवेत दाऊद चे नाव जोडले गेले. या दोघांचा विवाह झाल्याच्या बातम्या देखील प्रसार माध्यमांमध्ये आल्या. दाऊद च्या गुन्हेगारी मुळे त्रस्त झालेल्या त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा विवाह महजबीन उर्फ जुबीना जरीन समवेत करून दिला.
विवाहा पश्चात त्याला मेहरीन, माजिया, आणि माहरुख नावाच्या तीन मुली झाल्या व मोईन नवाज हा मुलगा झाला. त्याच्या मारिया या सगळ्यात लहान मुलीचा मृत्यू झालाय. माहरुख या आपल्या मुलीचा विवाह त्याने पूर्व पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदाद चा मुलगा जुनैदशी लावून दिला, आणि माहरीन चा निकाह पाकिस्तानी-अमेरिकी अयुबशी करून दिला व मोईन या आपल्या मुलाचे लग्नं सानिया नावाच्या मुलीशी लावून दिले.
दाऊद इब्राहीम असा झाला डॉन – Dawood Ibrahim Don Journey
मोस्ट वान्टेड दाऊद इब्राहीम सुरुवातीपासूनच वाईट सवयी आणि चुकीच्या आवडीनिवडींमुळे गुन्हेगारी जगताकडे आकर्षिला गेला. अगदी सुरुवातीला एका व्यावसायिकाला लुटून त्याने गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवलं. या अपराधासाठी त्याला तुरुंगात देखील जावं लागलं, कारागृहातून बाहेर आल्यानंतर देखील त्यात काहीही बदल झाला नाही उलट तो मुंबईच्या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि त्याच्या टीम मध्ये सहभागी झाला आणि मोठ-मोठ्या गुन्ह्यांना तडीस नेऊ लागला.
पुढे आपल्या भावासोबत त्याने आपली वेगळी गैंग बनवली. दाऊद इब्राहीमची सुरुवातीला गुन्हेगारी जगतात फारशी ओळख नव्हती मात्र पुढे-पुढे त्याचे नाव मुंबईतील गुन्हेगारी जगात वेगाने प्रसिद्ध झाले. 80 च्या दशकात दाऊद चे नाव अपराध जगतातील सगळ्यात मोठे नाव झाले होते. चित्रपटांना फायनान्स करण्यापासून ते सट्टेबाजी विश्वात त्याच्या नावाचा दबदबा होता.
त्याचे गुन्हेगारी वर्चस्व एवढे वाढले होते कि तो लोकांना धमकावून-घाबरवून हप्ते वसूल करू लागला. त्याच्या या वर्तणुकीने तो मुंबई पोलिसांच्या हिट-लिस्ट वर आला आणि आपल्या गुन्ह्यांसाठी अनेकदा तुरुंगात देखील गेला परंतु दरवेळी तो सुटायचा आणि नव्या गुन्ह्यांची पायाभरणी करायचा. त्याची दहशत मुंबईत इतकी वाढली होती की लोक त्याच्या नावाने थरथरा कापू लागले होते. आणि याच भीतीचा फायदा उचलत तो लोकांकडून करोडो रुपयांची वसुली करत होता.
आपल्या अपराधिक कारनाम्यांमुळे तो सतत पोलिसांच्या तावडीत सापडू लागला. 1990 साली पोलिसांना गुंगारा देऊन तो दुबईला पळाला. या दरम्यान त्याची भेट छोटा राजन या डॉन समवेत झाली दोघे मिळून भारता बाहेर काम करू लागले आणि नवनव्या गुन्ह्यांना पूर्णत्वास नेऊ लागले. विदेशात बसून त्याने अनेक आतंकी संघटनांच्या आणि आपल्या गैंगच्या मदतीने भारतात अनेक गुन्हे घडवून आणले.
About Dawood Ibrahim
12 मार्च 1993 रोजी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी भयंकर बॉम्बस्फोट झालेत, ज्यात जवळपास 257 लोक मृत्युमुखी पडले आणि 700 जण जखमी झाले. तपासादरम्यान मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हणून दाऊद इब्राहीम चे नाव पुढे आले, त्यानंतर मात्र तो गुन्हेगारी जगतातील आणि भारताचा मोस्टवोन्टेड डॉन झाला. पण या बॉम्बस्फोटात छोटा राजन आणि दाऊद च्या मैत्रीत दरार आली आणि दोघांच्या मैत्रीची जागा शत्रुत्वाने घेतली, दोघे वेगळे झाले.
दाऊद पाकिस्तान ला पळून गेला आणि तेथे राहून भारता विरुद्ध कारवाया करीत राहीला. 2005 साली गुप्तहेर संघटनांनी त्याच्या माहरुख या मुलीच्या निकाह मध्ये त्याला संपविण्याचा बेत आखला परंतु प्लान लिक झाल्याने तो वाचला. वेळोवेळी दाऊद ला भारतात आणण्याची मागणी जोर धरत राहीली आणि भारत सरकार पाकिस्तानवर दबाव आणत राहीली. पण दाऊद आपले ठिकाण सारखे बदलत राहीला आणि आजपर्यंत पकडला गेला नाही. आजही तो भारताचा मोस्टवोन्टेड अपराधी आहे.
नाव आणि ओळख बदलून करत राहीला गुन्हे – Dawood Ibrahim Crime
अनेक रिपोर्ट आणि पुस्तकांनुसार जवळ-जवळ 13 वेळा आपले नाव आणि ओळख बदलून दाऊद ने गुन्हे केलेत. त्याच्या बाबतीत हे देखील प्रसिद्ध आहे की अनेक वेळा पोलिसांना चकमा देण्यासाठी त्याने आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी देखील केलीये. याव्यतिरिक्त असे देखील म्हणतात की दाऊद पाकिस्तानात शेख दाऊद हसन या नावाने रहातोय.
डेविड भाई, अमीर साहब, हाजी साहब या नावाने देखील त्याला तिथे संबोधल्या जाते. याशिवाय दाऊदची अनेक वेग-वेगळी ठिकाणं असल्याचे दावे केले जातात. त्याच्याजवळ 4 पासपोर्ट असल्याचे सुद्धा सांगण्यात येते.
दाऊद इब्राहीम वर निघालेत चित्रपट- Dawood Ibrahim Movie
गुन्हेगारी जगतातील सर्वात मोठे नाव दाऊद इब्राहीम…त्याच्यावर चित्रपट निघाले नसते तरच नवल.
- कंपनी डी
- शूटआउट एट लोखंडवाला
- ब्लैक फ्रायडे डी-डे
- वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई
असे चित्रपट त्यावर तयार झालेत.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम संबंधित चर्चित विवाद – Dawood Ibrahim Controversy
1993 साली मुंबईत झालेल्या भयंकर बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहीम लाच मानल्या जाते.
या बॉम्बस्फोटात जवळ-जवळ 300 लोक मृत्युमुखी पडले होते तर 700 हून अधिक लोक जखमी झाले होते.
दाऊद इब्राहीम भारतातील हवाला सिस्टीम ला देखील कंट्रोल करत असल्याचे बोलल्या जाते.
ब्रिटन, सिंडीकेट पश्चिमी युरोप मध्ये दाऊद इब्राहीम मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि इतर नशिल्या पदार्थांचे संचालन करत असल्याचा दावा अनेक गुप्तहेर संघटनांनी केला होता.
दाऊद चे संबंध अलकायदा आतंकी संघटनेचा नेता ओसामा बिन लादेनशी देखील असल्याचे दावे केल्या गेले.
याव्यतिरिक्त दाऊद चे संबंध अन्य मोठे आतंकवादी संघटन “लष्कर-ए-तैयबा” शी देखील असल्याचे म्हंटल्या जाते.
आणि दाऊद या संघटनांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था व आर्थिक मदत करत असल्याचे देखील सांगण्यात येते.
2003 मध्ये दाऊद इब्राहीम ला भारत आणि संयुक्त राज्य अमेरिकेच्या सरकार द्वारे ग्लोबल टेरेरीस्ट ( वैश्विक आतंकवादी) घोषित करण्यात आले आहे.