Douglas Bader Information
आज आपण अशा माणसा बद्दल जाणुन घेऊया जे ऐकून तुम्हाला नक्कीच वाटेल हे मी कुठेतरी ऐकले आहे.
डगलस बॅडर यांची प्रेरणादायी कहाणी – Douglas Bader Biography in Marathi
डगलस बॅडर यांची जीवन कथा – Douglas Bader’s story
१९३० मध्ये युनाइटेड किंगडमच्या रॉयल एयर फोर्स मधील युवा पायलट चे नाव डगलस् बैडर होते. ते एक उत्तम पायलट होते.
त्यांनी विमानाव्दारा अनेक अद्भूत स्टंट ही केले होते. अनेक साधारण पायलट यांच्या सारखे बनण्यासाठी स्वप्नं पाहत होती.
एकदा विमान उडवतांना दुर्भाग्याने त्यांचे विमान कोसळले त्यांनी मोठया हिम्मतीने व बुध्दीने विमान खाली एका शेतात उतरवले त्यांच्या दोन्ही पायांना फार जखमा झाल्या होत्या.
त्यांचे पाय टोंगळयापासुन कापण्यात आले.
त्यांचे वैमानिकाचे करियर जवळ जवळ संपलेच होते परंतु डगलस् त्या लोकांसारखे नव्हते जे पटकन् हार मानतात.
त्यांनी त्यानंतर विमानही उडवले, आपल्या विमानात उचीत बदल करून त्यांनी विमान आरामाने उडवले तसेच दुसऱ्या महायुध्दात नवीन वैमानिकांना प्रशिक्षणही दिले.
ते युवा पायलटांचे आदर्श बनले होते. जर्मन विमानांना गोळयांनी सरळ उडवण्याचा त्यांचा रेकॉर्ड उत्तम होता. त्यांनी शत्रूच्या इलाक्यात जाऊन त्यांना त्रस्त करून सोडले होते.
जर्मन वायुक्षेत्रात उडतांना त्यांच्या विमानास आग लागली, डगलसांनी पॅराशूट ने खाली उडी मारली. त्यांना जर्मन सेनेने कैदेत टाकले, त्यांनी एक विकलांग असतानाही तुरूंगातून दोन वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला जर्मन लोक त्यांच्या साहसास नमन करायचे.
दोन वर्षाच्या कारावासानंतर त्यांना सोडण्यात आले जर्मन सरकार ने नकली पायांची जोडी त्यांना भेट म्हणुन दिली.
त्यांच्या हिम्मत, साहस, आणि दृढनिश्चयी स्वभावामूळेच त्यांनी परत देशात येवून देशाची सेवा केली.
त्यांचे उदाहरण नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यांचे साहस जगभरात चर्चेचा विषय बनला होता.
डगलस यांनी सिध्द केले की आपल्या अचाट हिमतीच्या बळावर मानव मोठया संकटास तोंड देऊ शकतो.
त्याच्या कथेवरून आपणांस नक्कीच प्रेरणा मिळते.
प्रतिकुल परिस्थितीतही मानव आपल्या धैर्याने व साहसाने कोणत्याही संकटावर मात देऊ शकतो.
सतत प्रयत्न करत राहणे व योग्य त्यावेळी प्रयत्नांच्या गतीत वाढ व घट करणे आपणांस ध्येयापर्यंत घेवून जाते.
अश्याच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कनेक्ट रहा माझीमराठी सोबत. आणि हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
धन्यवाद!