25 March Dinvishesh
इतिहास काळात २५ मार्च या दिवशी अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. आज आम्ही आपणास याच घटनांची माहिती इथे सांगणार आहोत. तसेच, २५ मार्च या दिनी जन्मलेल्या तसेच निधन पावलेल्या थोर व्यक्तींबाबत माहिती (25 March Today Historical Events in Marathi) सांगणार आहोत.
जाणून घ्या २५ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 25 March Today Historical Events in Marathi
२५ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 March Historical Event
- इ.स. १६५५ साली डच भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि संशोधक क्रिस्टीयन हायगेन्स यांनी शनि ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह टायटनचा शोध लावला.
- सन १६६८ साली अमिरीके मध्ये सर्वप्रथम घोडदौड चे आयोजन करण्यात आले होते.
- इ.स. १७८८ साली ‘कलकत्ता गॅझेट‘ या वृत्तपत्रामध्ये भारतीय बंगाली भाषेतील पहिली जाहिरात प्रकाशित करण्यात आली.
- इ.स. १८०७ साली गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटीश साम्राज्यातील गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.
- सन १८०७ साली इंग्लंड देशांमध्ये प्रथम रेल्वे प्रवासी सेवा सुरू करण्यात आली.
- इ.स. १८९८ साली शिवराम महादेव परांजपे यांनी सुरु केलेल्या ‘काळ’ वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- सन १८९८ साली स्वामी विविकानंद यांनी भगिनी निवेदिता यांना ब्रह्मचर्याची दीक्षा दिली होती.
- इ.स. १९५४ साली भारत देशाचे पहिले हेलिकॉप्टर “एस-५५” दिल्ली याठिकाणी उतरविण्यात आले होते.
- सन १९९७ साली जगदीश शरण वर्मा यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे २७ सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
- इ.स. २००० साली १७ वर्षीय भारतीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ्रिकेतील रॉबेन बेटातील खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी टी सर्वात युवा जलतरणपटू आहे.
- सन २०१३ साली केंद्र्शाशित प्रदेश मणिपूर ची राजधानी इम्फाल येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
- इ.स. २०१३ साली मेघालय या केंद्र्शाशित प्रदेशाची राजधानी शिलांग येथे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
- सन २०१७ साली राजस्थान राज्याच्या बिकानेर शहरातील महिला तनुश्री परीक यांनी भारत देशाच्या सीमा सुरक्षा बल(बीएसएफ) च्या महिला अधिकारी बनून आपल्या देशाचे व राज्याचे नाव उज्वल केले.
२५ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25 March Birthday / Jayanti / Birth Anniversary
- सन १८९६ साली मराठी पुस्तक कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्मदिन.
- इ.स. १९१४ साली अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ व हरित क्रांतीचे जनक नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग यांचा जन्मदिन.
- सन १९१८ साली ब्रिटीश भारतीय सैन्य दलाचे अधिकारी कर्नल प्रेम कुमार सहगल यांचा जन्मदिन.
- इ.स. १९२० साली गांधीवादी भारतीय स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांचा जन्मदिन.
- सन १९३२ साली प्रसिद्ध मराठी साहित्यिक, लेखक वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्मदिन.
- इ.स. १९३२ साली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व अलिगढ येथील मुस्लिम विद्यापीठाचे कुलपती अजीज मुशब्बर अहमदी यांचा जन्मदिन.
- सन १९३३ साली भारतीय वैज्ञानिक व भारतीय अवकाश संघटनेचे माजी संचालक वसंत रणछोड गोवारीकर यांचा जन्मदिन.
- इ.स. १९३३ साली अमेरिकन उद्योजक तसेच डोमिनोज पिझ्झाचे संस्थापक थॉमस स्टीफन मोनाघन यांचा जन्मदिन.
- सन १८३८ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापक सदस्यांमधील एक सर विल्यम वेदरबर्न यांचा जन्मदिन. त्यांनी सन १८८९ साली कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे.
- इ.स. १९४८ साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता फारुख शेख यांचा जन्मदिन.
- सन १९५६ साली ग्वाल्हेर घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय गायक व पं. कुमार गंधर्व यांचे पुत्र व शिष्य पंडित मुकुल शिवपुत्र यांचा जन्मदिन.
२५ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 25 March Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १३१६ साली खिलजी घराण्यातील दिल्लीचे सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांचे निधन.
- सन १९३१ साली भारतीय पत्रकार, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते आणि स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ता गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन.
- इ.स. १९४० साली प्रख्यात भारतीय लेखक, पत्रकार व आसाम येथील चहा बागवान रजनीकांत बोरदोलोई यांचे निधन.
- सन १९७५ साली सौदी अरेबियाचे राजा फैसल यांचे निधन.
- इ.स. १९९१ साली जयपुर-अतरौली घराण्याचे पंडित व हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित वामनराव सडोलीकर यांचे निधन.
- सन १९९३ साली मराठी भाषिक महाराष्ट्रीयन लेखक मधुकर केचे यांचे निधन. केचे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि श्री संत गजानन महाराज यांचे चरित्र लिहिले आहे.
- इ.स. २०१४ साली भारतीय चित्रपट अभिनेत्री नंदा यांचे निधन.
वरील माहिती आपणास इतिहासामध्ये घडलेल्या सर्वच घटनांची जाणीव करून देते. तरी आपण या लेखाचे वाचन करून आपले ज्ञान वाढवू शकता. धन्यवाद……