Bimbisara Information in Marathi
आपण भारतीय इतिहासात जाणतो की चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे पहीले शासक होते, ते एक उत्तम शासक व राज्यकर्ते होते. त्यांचा पुत्र बिंबीसार हा सूध्दा एक महान योध्दा व शासक होता. सम्राट अशोक बिंबीसार यांचे पुत्र होते बिंबीसार एक उत्तम शासक व महान सेनानी होते.
मौर्य शासक बिंबीसार यांचाविषयीची माहिती – Mourya King Bimbisara Information in Marathi
मौर्य शासक बिंबीसार यांचा इतिहास – Mourya King Bimbisara History in Marathi
बिंबीसार यांच्या बाबत इतिहासात विशेष माहिती नाही त्यांच्या विषयीच्या माहितीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बिंबीसार हे मौर्य साम्राज्याचे दुसरे शासक होते ते मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे पुत्र व मौर्य सम्राट अशोक यांचे वडील होते आपल्या पितापुत्राप्रमाणे बिंबीसार यांचे आयुष्य इतके प्रसिध्द झाले नाही.
त्यांच्या मृत्युनंतरही १०० वर्षापेक्षा जास्त वर्षानंतर जगास कळली होती.
मौर्य शासक बिंबीसार यांचे जीवन – Mourya King Bimbisara Life
प्राचीन आणि मध्यकालीन सुत्रांच्या मते बिंबीसार यांच्या जिवनाविषयी फार माहिती उपलब्ध नाही. जी माहीती आहे ती बौध्द माहानुभावांच्या लेखनातील तथ्यांमध्ये सापडते.
जैन व बौध्द महानुभावांच्या विविध उल्लेखातुन बिंबीसाराच्या व्यक्तीत्वाची झलक मिळते.
जैन महामानव हेमचंद्र परीशिष्ट परवाना यांच्यानुसार बिंबीसार हे एक उत्तम शासक होते ते महान सम्राट अशोकांचे पिता होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकांनी आपल्या राज्याचा विस्तार केला.
काही बौध्द महानुभावांच्या मते अशोकास बौध्द धर्माची प्रेरणा आपल्या पित्याकडुन मिळाली होती.
बौध्द महानुभावांकडे सम्राट अशोक व सम्राट चंद्रगुप्ता विषयीचीच माहिती उपलब्ध आहे.
बौध्द लेखाच्या उल्लेखानुसार त्याची माहिती दिव्यवदाना दिपवंसा, महावंसा वंसत्थाप्पकसिनी, समन्थपसदिंका आणि १६ व्या शतकातील लिखीत तारानाथ मध्ये काही अंशी मिळते.
जैन स्त्रोतांन्वये १२ व्या शतकातील परिशिष्ट परवाना आणि १९ व्या शतकातील देवचंद्र यांच्या व्दारा लिखीत राजावली कथांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो.
हिंदू पुराणांमध्ये बिंबीसारास एक मौर्य शासक म्हणुन उल्लेख आहे.
मौर्य शासक बिंबीसार यांचा जन्म – King Bimbisara Story
बिंबीसार यांचा जन्म मौर्य साम्राज्याचे शासक महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या घरी झाला ही माहिती आपणांस पुराण आणि महावंसा यामध्ये सापडते.
चंद्रगुप्त यांनी सेल्यूसिड्स या ग्रीक राजकन्येशी विवाह केल्यामूळे असा अंदाज लावला गेला होता की बिंबीसार यांची माता एक ग्रीक राजकन्या होती.
याचे ऐतिहासीक पुरावे भारतात किंवा ग्रीक इतिहासात नाही.
१२ व्या शताब्दीतील जैन धर्म प्रचारक हेमचंद्र परिशिष्ठ परवाना यांच्या मते बिंबीसार यांच्या मातेचे नाव दुर्धरा होते.
मौर्य शासक बिंबीसार यांचा मृत्यु – Mourya King Bimbisara Death
ऐतिहासीक पुराव्यांमध्ये बिंबीसार यांचा मृत्यु इ.स. पूर्व २७० च्या आसपास झाला असावा, अभ्यासक उपिंदर सिंह यांच्या मते बिंबीसार यांचा मृत्यू इ.स. पूर्व २७३ मध्ये झाला होता.
अलेन डेलीनोऊ या ब्रिटिश इतिहासकाराच्या मते त्याचा मृत्यु इ.स. पूर्व २७३ ते २७२ च्या दरम्यानच झाला होता.
कारण सम्राट अशोक मौर्य साम्राज्याचा शासक म्हणून इ.स. २६९ – २६८ च्या आसपास गादीवर बसला होता.
याची आशंका दर्शवली जाते की बिंबीसार यांच्या मृत्युनंतर ३-४ वर्ष संघर्ष केल्यावर अशोक शासक बनला होता.
इतिहासात बिंबीसारास महान पित्याचा पुत्र व महान पुत्राचा पिता असे संबोधन प्राप्त आहे.
आपल्या पित्याने कमावलेल्या साम्राज्यास त्यांनी योग्यरित्या सांभाळले व त्यांनी अनेक प्रदेशातही आपली सत्ता वाढविली होती.
दक्षिण भारतात साम्राज्य विस्ताराचे पुरावे उपलब्ध आहेत.
तर हि माहिती होती इतिहासातील बिंबीसार सम्राट यांची आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा तसेच असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी जुळून रहा, माझीमराठी सोबत.
धन्यवाद !