देशात स्वातंत्र्यासाठी लढाई उग्र स्वरूपात होती तेव्हा प्रत्येकजण आपल्या पध्दतीने या संग्रामात उतरत होते. सुभाषचंद्र बोस यांच्या “तुम मूझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा” या नाऱ्यामुळे असंख्य जनसमुदाय त्यांच्या मागे आला. त्यांनी आझाद हिन्द सेना स्थापन केली हा नारा ज्या भाषणात त्यांनी दिला त्यास जाणुन घेवूया.
नेताजींनी हे भाषण १९४४ मध्ये वर्मा येथे इंडियन नॅशनल आर्मी येथे दिले होते.
मित्रहो, बारा महिन्यांपूर्वी आशियामध्ये भारतीयांपुढे संपूर्ण संगठन तसेच ज्यादा बलीदान कार्यक्रम लागू केला होता. आज मी आपल्या दोन वर्षाच्या उपलब्धीचा हिशेब तुम्हास देणार आहे. अश्या करण्यामागे एकच उद्देश आहे की स्वातंत्र्य किती अनमोल असतं याची माहिती तुम्हास समजेल.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी भाषण – Netaji Subhas Chandra Bose Speech in Marathi
इंग्रज विश्वयुध्दात गुंतले आहे त्यामुळे त्यांनी बऱ्याच ठिकाणी मार खाल्ला आहे अशा वेळी त्यांच्यावर हल्ला करून त्यांचा बंदोबस्त करायची वेळ आली आहे ही एक अशी संधी आहे जी शंभर वर्षात एकदा आली आहे. त्यामुळे आपल्या मातृभूमीस सोडविण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्याने त्यांचा विरोध करून त्यांना देशातून हाकलून द्यायला पाहिजे.
आपल्या यशासाठी मी यासाठी आशावादी आहे नी फक्त माझ्या ३० लाख सैनिकांच्या प्रयत्नावरच निर्भर नाही तर भारतात एक मोठे आंदोलन चालू आहे.
त्यामुळे या आंदोलनाची आपणास बरीच मदत मिळते. लोक त्रास सहन करूनही या आंदोलनात सक्रीय सहभागी होत आहेत. नशिबाच्या घातामुळे आपणांस १८५७ मध्ये विजय मिळाला नाही आता तर आपले देशवासी अहिंसेच्या मार्गाने लढत आहेत त्यामुळेच त्यांच्या मदतीला आपण आपली सशस्त्र सेना बनविली आहे जी त्यांच्या संगतीने लढेल आणि भारताचे स्वातंत्र्य निश्चित करेल.
याशिवाय स्वातंत्र्यासाठी पूर्वी आशियातील भारतीय एकतेत बांधल्या गेले आहेत धार्मीक विविधतेत ब्रिटिशांनी फुट पाडली धार्मिक राजकारण करून ब्रिटिशांनी आपणांस कमजोर केले.
येथे धार्मिक कट्टरवाद कुठेच नाही, त्यामुळेच अशी आदर्श परिस्थिती निर्माण झाली आहे की जी आपल्या विजयाच्या पक्षात आहे. संपूर्ण सैन्य संघठन कार्यक्रमा नुसार मी पैसा आणि सामग्रीची मागणी केली होती, त्याचा फायदाही झाला मोठया संख्येने जवान या कार्यक्रमात शामील झाले सोबत धन आणि सामग्रीही पुरविली गेली.
या पूर्वी आशिया सेनेत चीन, जापान, इंडोचिन, फिलीपीन्स, जावा, बोर्नियो, सुमात्रा, मलाया, थाइलॅंड, आणि बर्माहून असंख्य भारतीय शामील झाले.
तुम्हाला अधिकाधिक धन आणि साहित्याची जुळवाजुळव करायला पाहिजे. आपणांस आपुर्ती आणि परिवाहन विभागाच्या गरजांची पूर्तता करावी लागेल. युध्दात जवानांपर्यंत युध्द सामग्री पोहोचवणे फार गरजेचे आहे.
त्यामुळे तुंम्ही एकत्रीत व्हा. ब्रिटीश सेना जनतेच्या आड त्यांचे शोषण करेल त्यांचा वापर आपल्या विरूध्दही करू शकते. त्यामुळे शक्यतो होईल तोवर आपले सूरक्षा तंत्र मजबुत करा. युध्द कधीही होऊ शकते त्यामुळे आपणांस कोणत्याही हालतीत मागे हटायचे नाही त्यामूळे आपल्या देशवासीयांच्या मदतीने योग्य संघटन उभे करा. युध्दात जनतेचे सहकार्य फार जरूरी असेल.
Netaji Subhash Chandra Bose Bhashan
आपल्या मधील काहींची गरज देश स्वतंत्र झाल्यावरही मला लागेल. आपणांस कधीच विसरता कामा नये की पूर्वी एशिया विशेष रूपात बर्मा आपल्या संघर्षाचा आधार आहे. जर तुमचा आधार मजबुत नाही तर आपली सेना कधीच विजयी होणार नाही. लक्षात ठेवा की हे एक संपूर्ण युध्द आहे त्यामुळे आपणास संपूर्ण भारत ब्रिटिश मुक्त करायचा आहे.
मित्रहो मी आपणांस दिलेले वचन पाळले आहे. तुंम्ही मला संघटन दिले आता मी तुम्हास देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुमचे बलीदान मागतो आहे. आपल्या देशाचे स्वातंत्र्य हे आपल्यासाठी एक असंभव लक्ष्य आहे ज्यास आपण सर्वांनी मिळून संभव बनवायचे आहे. ब्रिटीश सेना यूध्दात मागे हटत आहे त्यांची हार होत आहे.
त्यामुळे आपणांस हीच संधी आहे ज्याचा आपणांस योग्य फायदा घ्यायचा आहे. जे काम आपण हाती घेतले आहे ते पूर्ण करण्यास आपली कंबर कसुन घ्या. आता आपल्याजवळ सर्व काही उपलब्ध आहे तेव्हां मला तुमच्या कडून प्रेरणा हवी आहे जीच्यामुळे आपण आपले ध्येय पूर्ण करू.
मित्रहो युध्दात आपल्याच बाजूने निर्णय लागला पाहिजे त्यासाठी आपल्या डोक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कितीही संकट आले किंवा काहीही झाले तरी आपले ध्येय विसरू नका. आज आपली एकच ईच्छा आहे ती म्हणजे देशाचे स्वातंत्र्य!
त्यासाठी मरावे लागले तरी विचार करू नका.
मित्रहो मला तूमच्या कडून एक गोष्ट हवी आहे आशा आहे की तुम्ही ती नक्कीच द्याल कारण आपणां सर्वांचे लक्ष एकच आहे. तर तुम्ही मला तुमचे रक्त द्या मी तूम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईल. आपल्या रक्तानेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची किंमत चूकवली होऊ शकते. तर मी वचन देतो की तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईल.
जयहिन्द!
या अश्या कठोर शब्दात त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले, आणि समोर देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी आपले योगदान दिले.
तर अश्या महान क्रांतीविराला माझी मराठी चा मनाचा मुजरा. अश्याच रोचक लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
धन्यवाद !