Shikshaprad Kahani
आपल्या मुलांसाठी मजेदार आणि मनोरंजक गोष्टी – Marathi Stories with Moral Values
खुप वर्षा पूर्वी एका छोटया गावात एका छोटया व्यापाऱ्याने एका सावकारापासून खुप सारा पैसा कर्ज म्हणून घेतला होता.
सावकार जून्या विचारांचा चिडचिडा माणूस होता. आपल्या कर्जाच्या बदल्यात त्यास काहीतरी हवे होते.
त्याची मागणी होती की त्याचे लग्न व्यापाऱ्याच्या सुंदर कन्येशी झाल्यास तो त्याचे सर्व कर्ज माफ करेल.
या प्रस्तावामुळे व्यापारी आणि त्याची कन्या चिंतीत झाली होती. व्यापाराची मुलगी फार चतूर व सूंदर होती तिने आपल्या वडिलांना तिच्या डोक्यातील युक्ती सांगितली.
व्यापारी सावकाराकडे आला व त्याच्या काही अटी सांगू लागला.
माझी मुलगी लग्न करेल परंतू त्यासाठी मी एक थैली आणली आहे यात एक पांढरा दगड व दुसरा काळा दगड आहे, जर माझ्या मुलीने पांढरा दगड काढला तर तिचा विवाह तूमच्याशी होणार नाही अन् आमचे सर्व कर्ज फेडल्या जाईल.
जर तिने काळा दगड काढला तर तिचा विवाह तुमच्याशी मी लावून देईल व मी तूमच्या घरी चाकरी करेल.
जर माझ्या मुलीने थैलीतून कोणताही दगड काढण्यास मनाई केली तर माझी सर्व संपत्ती तुमची व आम्ही दोघे तुरूंगात जाऊ.
यावर सावकार थोडा विचार करून म्हणाला की थैली मीच देईल व माझ्या समोरच तिला दगड निवडावा लागेल. व्यापाऱ्याने मान्य केले. ठरल्याप्रमाणे व्यापारी आपल्या कन्येस घेवून आला.
आणि सावकारही तेथे आला, त्याच्या चेहेऱ्यावर कुबूध्दीचे हास्य दिसत होते.
तो धूर्त सावकार होता. व्यापाऱ्याच्या कन्येने पाहीले की सावकाराने थैलीत दोन्ही काळे दगड टाकले. नंतर सावकाराने मुलीस दगड निवडायला सांगितले.
तर मग वरील अर्धवट कथेतील मूलीच्या जागी तूम्ही असाल तर काय कराल? तुमच्या समोर तीन पर्याय उपलब्ध आहेत
१) कन्या दगड काढण्यास नकार देईल.
२) कन्या हे सांगेल की सावकाराने धूर्तपणे थैलीत दोनही दगड काळेच ठेवले आहेत.
३) कन्या थैलीतील काळा दगड निवडून त्या सावकाराशी विवाह करून आपल्या पित्यास संकटातून मुक्त करेल.
या कथेत तार्कीक आणि बौध्दिक समजुतीत फरक असतो हे आपणास पुढील भागावरून कळेल.
तर सावकाराने थैली कन्येच्या हाती दिली. तिने थैलीत हात टाकला अन् दगड बाहेर काढताच थैली व दगड खाली पाडला.
सर्वजण तिच्याकडे पाहू लागले, तिने थैली हातात घेतली व म्हणाली माझ्या हातून निवडलेला दगड खाली पडला अन् तो इतर दगडांमध्ये मिसळला. आता आपण तो दगड कसे शोधणार?
तर जर थैलीत दोन दगड होते व मी एक निवडला मग थैलीतील दगडाहून मी कोणता दगड निवडला हे कळेल.
तिने थैलीतील काळा दगड बाहेर काढून सर्वांना दाखवला व म्हणाली मी पांढरा दगड निवडला होता, याचा अर्थ मी व माझ्या वडीलांची कर्जापासुन मुक्तता झाली आणि सावकार तुमच्या कडे आमचे कोणतेही कर्ज शिल्लक राहीले नाही.
सावकार निमूटपणे पाहात राहीला. मुलीने स्वतःस व आपल्या पित्यासही वाचवले आणि एका असंभवास संभव करून दाखविले. तिची बुध्दी तिक्ष्ण असल्यामुळे तिने योग्य मार्ग निवडला.
गोष्टीचे तात्पर्य – Conclusion of story
संकट कितीही मोठे असो त्याचा उपाय नक्कीच असतो. कधी कधी धूर्त लोकांसोबत आपल्या बुध्दीने सामना करायचा असतो.