Gopinath Munde Jivan Parichay
भारतीय राजकारणातील एक महत्वाचे नाव! गोपिनाथ मुंडे… महाराष्ट्राचे पुर्व मुख्यमंत्री, तळागाळातील नेता म्हणुन आपली ओळख बनविली.
उच्चमध्यम वर्गीयापर्यंतच मर्यादित असलेल्या भारतीय जनता पक्षाला ग्रामिण भागातील गोरगरिबांपर्यंत पोहचविण्यात गोपिनाथ मुंडेचा महत्वाचा हात आहे.
लोकनेते गोपिनाथ मुंडे यांच्याविषयी माहिती – Gopinath Munde Biography in Marathi
गोपिनाथ मुंडे यांचा अल्पपरिचय – Gopinath Munde Information
नाव (Name): | गोपीनाथ पांडुरंग मुंडे |
जन्म(Birthday): | १२ डिसेंबर १९४९ |
जन्मस्थान (Birthplace): | नाथा, परळी जि. बीड |
वडील (Father Name): | पांडुरंगराव मुंडे |
आई (Mother Name): | लिंबाबाई पांडुरंगराव मुंडे |
पत्नी (Wife Name): | प्रज्ञा मुंडे (महाजन) |
कन्या (Daughter Name): | पंकजा पालवे मुंडे, प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे |
मृत्यु (Death): | ३ जुन २०१४ वयाच्या ६४ व्या वर्षी दिल्लीत |
लोकनेता गोपिनाथ मुंडे माहिती – Lokneta Gopinath Munde History in Marathi
गोपिनाथ मुंडे एक यशस्वी राजकारणी तर होतेच शिवाय एक शेतकरी देखील होते.
२०१४ मध्ये मे महिन्यात नरेंद्र मोदीं च्या मंत्रीमंडळात त्यांचा समावेश झाला परंतु हा आनंद त्यांच्या जीवनाच्या औटघटकेला ठरला कारण त्यानंतर अवघ्या काही दिवसांमधेच दिल्लीत एका कार दुर्घटनेत त्यांचे निधन झाले.
महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाचा चेहरा होते. महाराष्ट्रात एकमेव सभांना गर्दी जमविणारा नेता अशी मुंडेची ओळख होती. मुंडेच्या सभेला सर्वाधिक गर्दी होते हे पक्षाला चांगलेच माहित होते. विशेषतः वंजारी समाज हा गोपिनाथ मुंडेच्या सर्वाधिक जवळचा होता. ४० वर्षांपासुन गोपिनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले होते. सलग ३७ वर्षांपासुन निवडुन येत होते.
मुंडेंचे बाळासाहेब ठाकरेंशी युती होण्यापुर्वीपासुन २२ वर्ष जुने संबंध होते. गोपिनाथ मुंडे मुळात मराठवाडयातील होते. त्यांना कोणताही राजकिय वारसा मिळालेला नव्हता. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मोठं करण्याकरीता गोपिनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांनी अवघा महाराष्ट्र पिंजुन काढला. पुण्यात २०१० साली १२ डिसेंबरला एका समारंभात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गोपिनाथ मुंडेंचा “लोकनेता” असा उल्लेख केला होता.
मुंडे कायम अन्यायाविरूध्द उभे राहिले. राजकारणात लागणारी जिद्द, आत्मविश्वास, संयम त्यांच्यात होता. नवा विचार, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्यांची तयारी होती. उपेक्षित शोषित वर्गामधे त्यांनी नवा विश्वास निर्माण केला.
हे सर्व करत असतांना त्यांना राजकारणात असलेली अनिश्चितता, अपयश, जिवघेणी स्पर्धा याला सामोरे जावे लागले.
Gopinath Munde Mahiti
ऊसतोड कामगारांचे नेते म्हणुन देखील गोपिनाथ मुंडेंकडे पाहिले जाते. त्यांच्या स्वतःजवळ साखर कारखाने असुन देखील ज्या ज्या वेळी ऊसतोड कामगार आणि साखर कारखान्यांच्या मालकांमध्ये संघर्ष उभा राहीला आहे त्या वेळी मुंडे कामगारांच्या पाठिमागे भक्कमपणे उभे राहीले आहेत. युतीच्या कार्यकाळात मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग तयार झाला, मुंबईत उड्डाणपुलांचे जाळे निर्माण झाले त्यावेळी मुंडे उपमुख्यमंत्री होते. युतीसरकारचे हे मोठे यश मानले गेले.
मुंडेंनी तोटयात गेलेले साखर कारखाने, विज निर्मिती प्रकल्प आपल्या हाती घेतले आणि यशस्वी करत आपल्या नेर्तृत्वगुणांना सिध्द केले. मराठवाडा रेल्वेने सर्वदुर जोडला जावा, अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग सुरू व्हावा या करीता मुंडेंनी फार प्रयत्न केले त्यामुळे २०११-१२ साली भुसंपादन प्रक्रियेला वेग आला.
या कामाची मागणी गोपिनाथ मुंडेंनी लोकसभेत लावुन धरली होती.
खाजगी क्षेत्रात ओबिसींना आरक्षण मिळावे याकरीता मुंडे फार आक्रमक होते.
गोपिनाथ मुंडेंच्या मागे केवळ भारतीय जनता पक्षच नव्हे तर या पक्षाच्या पलिकडे जाऊन अनेक संघटना, अनेक गट, माणसं त्यांच्याशी घट्ट जोडल्या गेली होती.
गोपीनाथ मुंडे खऱ्या अर्थाने लोकनेते होते.
ग्रामिण भागाशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेली असल्याने तळागळातील माणसांशी त्यांचे एक अनोखे नाते निर्माण झाले होते जे आज त्यांच्या मृत्युपश्चात देखील या माणसांनी जपले आहे.
तर आजच्या लेखात आपण अश्या व्यक्तित्वाविषयी माहिती पाहिली ज्या व्यक्तीमुळे महाराष्ट्र प्रगतीच्या रस्त्याने जाताना दिसत होता. अश्या या महान नेत्याला माझी मराठी चा मनाचा मुजरा.
आशा करतो आजचा लेख आपल्याला आवडला असेल, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांपर्यंत शेयर करायला विसरू नका.
Thank You So Much And Keep Loving Us!