Shia Sunni in Marathi
इराक येथे पेटलेल्या संघर्षाने पुन्हा एकवार शिया-सुन्नी यांच्यातील मतभेदांना चव्हाट्यावर आणले आहे.
सिरीयातील संघर्षात देखील शिया-सुन्नी यांच्यातील वाद उफाळून आलेला दिसतोय. परंतु यांच्यातील वादाचे मूळ कोठे आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक देखील नाही.
या लेखात शिया-सुन्नी विवादातील खरे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
अखेर का उभे ठाकले आहेत शिया- सुन्नी एकमेकांसमोर? – Shia Sunni
शिया आणि सुन्नी यांच्यातील फरक – Sunni and Shia Differences in Marathi
मुस्लीम समाज हा मुळात दोन समूहांमध्ये विभागल्या गेला आहे. शिया आणि सुन्नी! मोहम्मद पैगमबरांच्या मृत्युपश्चात लगेचच उत्पन्न झालेल्या मतभेदांमधून प्रश्न उपस्थित झाला…मुस्लिमांचे नेतृत्व यापुढे कुणाच्या हाती?
एकूण मुस्लीम बांधवांच्या लोकसंख्येत जवळ-जवळ 85 ते 90% समुदाय हा सुन्नी पंथीय आहे.
दोन्हीही समुदाय गेल्या कित्येक शतकांपासून गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आलाय, त्यांचातील धार्मिक पद्धती, चालीरीती परंपरा देखील एकसमान आहेत.
आत्ता-आत्तापर्यंत इराक मधील शहरी भागांमध्ये शिया-सुन्नी यांच्यात विवाह संपन्न होणे ही एक सर्वसामान्य बाब होती.
यांच्यात फरक असेलच तर तो सिद्धांत, परंपरा, धार्मिक संघटन, धर्मशास्त्र, कायदा, यात पाहायला मिळतो. यांच्या नेत्यांमध्ये देखील प्रतिस्पर्धा बघायला मिळते.
नुकत्याच पेटलेल्या संघर्षाने लेबनान ते सिरीया…आणि इराक ते पाकिस्तान पर्यंत सांप्रदायिक विभाजनात भर घातली आहे आणि दोन्ही समुदायांना वेग-वेगळं करून टाकलंय.
कोण आहेत सुन्नी? – Who are Sunni
सुन्नी समाज हा स्वतःला इस्लाम चा सर्वात धर्मनिष्ठ आणि पारंपारिक शाखांमधील एक समजतो.
सुन्नी हा शब्द ‘अहल अल-सुन्ना’ पासून बनलाय. परंपरांचे अनुकरण करणारी माणसं असा या शब्दाचा अर्थ सांगण्यात आलाय. यांच्यात परंपरांचा अर्थ अश्या रीतीरीवाजांशी आहे ज्या मोहम्मद पैगंबर आणि त्यांचे निकटवर्तीय पाळत आले होते.
ज्या पैगंबरांचा उल्लेख कुराणात करण्यात आलाय अश्या सगळ्या पैगंबरांना सुन्नी समूह मानत आलाय. यांच्यात अखेरचे मोहम्मद पैगंबर हेच होऊन गेले…त्यानंतर मात्र सगळ्याच मुस्लीम नेत्यांना संसारीक व्यक्तिमत्व म्हणून पाहिल्या गेले.
शिया समूहाच्या तुलनेत सुन्नी पंथीय शिक्षक आणि नेते पुरातन काळापासून घालून दिलेल्या नियमांमध्ये राहीले.
कोण आहेत शिया? – Who are Shia
इस्लाम इतिहासाच्या प्रारंभी शिया समूह हा एक राजनीतिक पक्ष म्हणून प्रकाशात आला …’शियत अली’ म्हणजे अली ची पार्टी.
शिया समुदायाच्या मते मुस्लिमांचे नेतृत्व करण्याचा अधिकार हा केवळ अली आणि त्यांच्या वंशजांचा आहे. अली हे मोहम्मद पैगंबरांचे जावई होते.
मुस्लिमांचे नेतृत्व (खलिफा) कोण करेल याकरता झालेल्या संघर्षात अली मारल्या गेले होते. हुसैन आणि हसन या त्यांच्या मुलांनी देखील नेतृत्वाकरता संघर्ष केला होता.
हुसैनचा मृत्यू युद्धस्थळी झाला, आणि असं म्हंटल्या जातं कि हसन ला विष देण्यात आलं.
या घटनांमुळेच शिया पंथीयांमध्ये बलिदान आणि शोक व्यक्त करण्याला एवढे अत्यंत महत्वं दिल्या गेले.
अंदाजानुसार शिया मुस्लिमांची संख्या मुस्लीम लोकसंख्येच्या 10% म्हणजे 12 ते 17 करोड यामध्ये आहे.
ईरान, इराक, बहरीन, अजरबैजान आणि काही आकड्यांनुसार यमन ला शिया समुदायाचे बहुमत आहे.
याशिवाय अफगाणिस्तान, भारत, कुवैत, लेबनान, पाकिस्तान, कतर, सिरीया, तुर्की, सउदी अरब आणि यूनाइटेड अरब ऑफ अमिरात मध्ये देखील यांची चांगली संख्या आहे.
शिया-सुन्नी संख्या – Shia Sunni Population
शिया आणि सुन्नी पंथीयांमध्ये संख्येचा फरक देखील फार मोठा आहे सबंध विश्वातील 1.8 करोड मुस्लीमांपैकी जवळ-जवळ 87-90 टक्के सुन्नी मुसलमान आहेत…
सुन्नी मुख्यतः इंडोनेशिया, चीन, सऊदी अरब, पाकिस्तान या देशांमध्ये वास्तव्याला आहेत…
शिया मुस्लीम हे एकंदर 10-13 टक्के असून इराक, ईराण आणि बाहरेन येथे रहातात…
वर्तमानात भारतात जवळपास 17 करोड मुस्लीम वास्तव्य करतायेत, यात अधिकांश सुन्नी समुदाय आहे…
भारतात 15 करोड सुन्नी आणि 2 करोड शिया मुस्लीम राहातायेत. शिया मुसलमान हे मोठ्या प्रमाणात भारतातील दिल्ली, हैद्राबाद, आणि लखनऊ या भागात आहेत.
प्राचीन भारतात मुस्लीम शासकांच्या काळात शिया मुस्लिमांवर अनेक अत्याचार करण्यात आले…
15 व्या शतकापासून ते 19 व्या शतकादरम्यान शिया समुदायाला मोठ्या प्रमाणात यातना सहन कराव्या लागल्या. परंतु स्वातंत्र्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये कोणताही मोठा वाद आपल्या देशात पहावयास मिळाला नाही…
हिंसेकरता कोण जवाबदार? – Shia Sunni Conflict
ज्या देशांमध्ये सुन्नीपंथीयांचे सरकार आहे त्याठिकाणी शिया समुदायाची गणना गरीबांमध्ये केली जाते.
ते नेहमी स्वतःला भेदभावाने आणि कुचंबणेने पिडीत मानतात. काही विद्वेषी सुन्नी सिद्धांतांनी शियांविरोधात घृणा पसरविण्यात पुढाकार घेतला आहे.
1979 च्या ईरान क्रांति ने उग्र शिया इस्लामी मिशनची सुरुवात झाली. त्यामुळे सुन्नी सरकारांकरीता विशेषतः खाडी लगत च्या देशांसाठी हे मोठे आव्हान समजल्या गेले.
ईराण ने आपल्या सीमारेषेबाहेर शिया मुस्लिमांना आणि पक्षांना समर्थन देण्यास सुरुवात केली. आखाती देशांनी या समस्येला आव्हानाच्या स्वरुपात पाहीलं.
या देशांनी सुद्धा सुन्नी संघटनांना अश्याच पद्धतीनं मजबूत बनविलं त्यामुळे सुन्नी शासनकर्ते आणि विदेशात सुन्नी आंदोलनांशी त्यांचे संपर्क अधिकाधिक सुदृढ झालेत.
लेबनान येथे गृहकलहा दरम्यान शिया मुस्लिम हे हिजबुल्लाच्या सैन्य कारवाई मुळे राजनीतिक स्वरुपात अधिक मजबूत झाले.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात तालिबान सारख्या कट्टरपंथी सुन्नी संघटना कायम शियांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करीत आल्या आहेत.
इराक आणि सिरीयात वर्तमानातील संघर्षाने दोन्ही समुदायांमध्ये वैमनस्याची मोठी भिंत उभी केलीये.
दोनही देशातील सुन्नी युवा विद्रोही समूहांमध्ये सहभागी झाले आहेत. या समूहांमधील अधिकतर अल-कायदा च्या कट्टर विचारांना मानणारे आहेत.
या सगळ्या दरम्यान शिया समुदायातील अधिकतर कट्टर युवा शासकीय सेनेसमवेत या सुन्नी युवा विद्रोही गटांशी युद्ध करत आले आहेत.
शिया-सुन्नी समुदाय अनेक शतकांपासून एकमेकांसोबत राहात आले आहेत. दोघांच्याही अधिकतर धार्मिक सद्भावना…परंपरा…चालीरीती एकसमान आहेत. सण-उत्सव देखील एकच आहेत…
तरीदेखील ईराण पासून तर सउदी अरब, लेबनान ते सिरीया आणि इराक ते पाकिस्तान पर्यंत संघर्ष इतका पेटला आहे की दोन्हीही समुदायातील तणाव वारंवार समोर येत असतो…
राजनीतिक संघर्षाने या दोन्ही समुदायातील वैमनस्याची दरी अधिकच खोल गेली आहे…