Yoga Mahiti
आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्याच जीवन एखाद्या यंत्राप्रमाणे झाले आहे, सकाळी उठणे, फ्रेश होणे १०-६ घराबाहेर राह्रणे, घरी येणे जेवण करणे आणि झोपून राहणे. तसेच काही गृहिणी सुद्धा आपल्या घरकामातून स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही. या दररोज च्या धावपळीत बरेच जन स्वतःला वेळ देऊ शकत नाही त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येण्याची संभावना असते.
आपण जर पाहिले तर मागील काळात असे खूप ऋषी मुनी होऊन गेले जे वर्षोनुवर्षे तपशर्या करत आणि देवाला प्रसन्न करत. असे आपण पुरानामध्ये वाचले आहे. मग कशाच्या बळावर ते शेकडो हजारो वर्ष जगात असत,
काय रहस्य असेल बर त्या मागचे ?
तर ते रहस्य आहे ध्यान,योगासने आणि फळे, या काही गोष्टींच्या आधारावर ऋषी मुनी वर्षोनुवर्षे आपले जीवन जगत होते.
पण आजच्या युगात माणूस तंत्रज्ञानाच्या विळख्यात एवढा अडकलेला आहे कि त्याला त्याच्या शरीराला पुरेसा वेळ देता येत नाही, परंतु जीवनात काही गोष्टी अश्या आहेत कि ज्यांना वेळ नसला तरीही त्या गोष्टींना वेळ द्यावा लागत असतो.
आजही आपल्याला वाटत असेल कि आपण आपले जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत केले पाहिजे तर आपण आपल्या शरीरावर लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून आपले शरीर आपल्याला शेवट पर्यंत साथ देईल.
त्यासाठी दररोज शरीराचा व्यायाम होणे गरजेचे आहे आणि शारीरिक व्यायामध्ये आपण योगासने करू शकतो. तर चला तर मग जाणून घेऊ काही असे योगासने जे आपल्याला दीर्घायुषी बनण्यास आपल्याला मदत करतील.
“दीर्घायुषी बनण्यासाठी करा हि योगासने” – Yogasan Information in Marathi
१) सूर्यनमस्कार – Surya Namaskar Yogasan
तर सर्वात पहिले आसन म्हणजे सूर्यनमस्कार आहे, या योगासानाविषयी आपल्याला बर्यापैकी माहिती असेलच, कि या योगासनाला कश्या प्रकारे करतात.
तरीही एक वेळ आपण या योगासनाला कश्या प्रकारे दररोज करू शकतो ते जाणून घेऊया.
ह्या आसनामध्ये आपल्याला सूर्याला नमस्कार करायचा असतो. आणि सूर्योदयाच्या वेळेस ह्या आसनाला केल्या जाते. सकाळी सकाळी वार्म अप होण्यासाठी सुद्धा या आसनाला केल्या जाते.
कृती:
सूर्याकडे सरळ स्थितीत उभे राहून आपल्या स्वासा सोबत आपल्या शरीराला सैल होण्यासाठी सोडून दोन्ही हाथ डोक्यावरून मागे नेऊन समोर आणणे त्यानंतर आपले डोके गूढघ्याला ठेकून झाल्यानंतर आपले दोन्ही हाथ जमिनीवर टेकवावे,
त्यानंतर दोन पायांपैकी एक पाय समोर घेऊन मान वरती करावी. त्यानंतर दोन्ही पाय मागे घेऊन एक पुश अप सारखी स्थिती करावी, त्यांनतर केलेल्या सर्व स्टेप ह्या पुन्हा वापस त्याच मार्गाने कराव्या आणि पुर्वस्थितीमध्ये यावे.
२) भुजंगासन – Bhujangasana Yogasan
कृती :
हे आसन करण्यासाठी तुम्हाला आपल्या योगासन करण्याच्या आसनावर पोटावर झोपावे लागेल, तसेच आपल्या दोन्ही पायांना जानिनीवर एकमेकांना जोडावे लागतील,आपल्या नाभी पासून तर पायांच्या बोटांपर्यंत आपल सगळ शरीर जमिनीला टेकून ठेवावे,
आपल्या हातांना आपल्या खांद्याच्या दिशेने जानिनीला लावावे.आणि आपले समोरील शरीर पूर्णपणे वर करावे. यामुळे आपल्या शरीराचा समोरील भाग हा एखाद्या सापासारखा दिसेल.
भुजंगासन चे फायदे – Bhujangasana Benefits:
- भुजंगासन स्थूलपणा कमी करण्यात मदत करते.
- आपल्या शरीरातील रक्तप्रवाहाला वाढवण्यास मदत करते.
- पाठीचा कणा लवचिक करण्यास मदत करते. सोबतच आपली छातीला रुंद बनविण्यास मदत करते.
३) धनुरासन – Dhanurasana Yogasan
कृती :
या आसनाला करण्यासाठी आपल्याला जमिनीवर पोटावर पडून राहावे लागेल, त्यानंतर आपल्या दोन्ही हातांनी आपल्या दोन्ही पायांना पकडून ओढावे. ज्यामुळे आपले शरीर हे बाणाप्रमाणे होईल.लांब स्वास घेऊन आपल्या छाती ला वरच्या बाजूला थोडेसे ताणावे, जेवढा वेळ राहता येईल या स्थिती मध्ये तेवढा वेळ राहावे.
धनुरासन चे फायदे – Dhanurasana Benefits:
- आपल्या पाठीच्या कण्यामध्ये आलेल्या दुखण्याला दूर करते तसेच आपल्या पाठीच्या कण्याला लवचिक बनविण्यास मदत करते.
- पोटाविषयी च्या प्रत्येक आजारावर उपयुक्त असे हे आसन आहे.
- शरीरामध्ये आलेल्या स्थूलपणाला दूर करण्याचे काम हे आसन करते.
४) ताडासन – Tadasana Yogasan
कृती:
या आसनाला सर्वात सोपी पद्धतीने केल्या जाते. पायावर सरळ उभे राहून तुमच्या हातांच्या बोटांमध्ये बोटे फसवून आपले दोन्ही हाथ आकाशाकडे ताणावे, सोबतच आपल्या पायाच्या बोटांवर उभे राहायचे प्रयत्न करावे.
आणि आपले डोके समोरच्या दिशेने असायला हवे. आणि जेव्हा हि कृती करसाल तेव्हा आपला श्वास आतमध्ये ओढावा. त्यांनतर काहीवेळाने श्वास सोडत पुर्वस्थितीमध्ये यावे. या क्रियेला आपण १०-१५ वेळा करावे.
ताडासन चे फायदे – Tadasana Benefits:
- आपल्या शरीरातील स्नायूंना लवचिक करण्यास मदत करते.
- कमी उंचीच्या व्यक्तीला ह्या आसनाचा भरपूर फायदा आहे.
५) पद्मासन – Padmasana Yogasan
कृती:
ज्याप्रमाणे आपण जमिनीवर बसतो त्याप्रमाणे बसून डावा पाय हा उजव्या पायावर घ्यावा जेणेकरून आपल्या दोन्ही पायांच्या टाका ह्या आपल्या नाभीजवळ येतील. त्यांनतर समोर पाहत आपल्या शरीराच्या वरच्या भागाला ताठ ठेवावे.आणि आपले दोन्ही हाथ हे आपल्या गुढघ्यावर ठेवावे.
पद्मासन चे फायदे – Padmasana Benefits:
- आपले पाय, पोट, आणि आपल्या हाताचे स्नायू ह्या मजबूत बनण्यास मदत होते.
- आपल्या फुफ्फुस च्या कार्यक्षमतेत वाढ होते.
६) वज्रासन – Vajrasana Yogasan
कृती:
या आसनाची सुरुवात करताना आपल्या पायांच्या दोन्ही गूढघ्यांवर बसून करावी, आपल्या पाठीच्या कण्याला तसेच डोक्याला एकदम सरळ ठेवावे. सोबतच आपल्या दोन्ही हातांना आपल्या गूढघ्यांवर ठेवावे. ह्या आसनाला आपण जेवणानंतर सुद्धा केले तरीही लाभदायक राहते.
वज्रासन चे फायदे – Vajrasana Benefits:
- वज्रासन अन्न पचनास मदत करते. आणि जेवलेले अन्न चांगल्या रित्या पचवण्याचे काम करते.
- आपल्या मनाला एकत्रित करण्यासाठी या आसनाची मदत होते.
- स्मरण शक्ती ला वाढवण्यास मदत करते.
७) शीर्षासन – Shirshasana Yogasan
कृती:
शीर्षासन करताना आपल्याला आपल्या शरीराला डोक्यावर उभे करावे लागते. त्यासाठी आपल्या डोक्याला जमिनीवर ठेकावावे आणि आपल्या दोन्ही हातांच्या मदतीने आपल्या डोक्याला सहारा द्यावा. आपल्या पायांना डोक्याच्या विरुध्द दिशेला करावे. आपलं पूर्ण वजन हे आपल्या डोक्यावर असायला हवं!
शीर्षासन चे फायदे – Shirshasana Benefits:
- या आसनामुळे हाथ,पाय, आणि पाठीचा कणा लवचिक होण्यास मदत होते.
- शिर्षानामुळे फुफ्फुस चांगल्या प्रकारे कार्य करते.
- तणाव आणि डिप्रेशन दूर करण्यासाठी मदत होते.
८) त्रिकोणासन – Trikonasana Yogasan
कृती:
हे आसन करताना जास्त मेहनत घ्यायचं काम नाही आहे फक्त आपल्याला आपल्या दोन्ही पायांना एकमेकांजवळून थोडे दूर नेऊन आपल्या एका हाताने आपल्या एका पायाला स्पर्श करावा लागतो आणि दुसरा हाथ आकाशाकडे तसेच आपला चेहरा सुद्धा आकाशा कडे असायला हवा. हे करत असताना आपण पाहसाल कि तुमच्या शरीराचा आकार हा त्रिकोनासारखा बनला आहे.
त्रिकोणासन चे फायदे – Trikonasana Benefits:
- या आसनामुळे हाथ,पाय, आणि पाठीचा कणा लवचिक होण्यास मदत होते.
- या आसनामुळे शरीरातील स्नायूंना चालना मिळते.
९) सर्वांगासन – Sarvangasana Yogasan
कृती :
सर्वांगासनाची सुरुवात करतेवेळी आपल्याला पाठीवर पडून राहावे लागेल, त्यानंतर आपल्या हातांना डोक्याच्या दिशेने ठेवून आपल्या पायांना हळू हळू वर उचलावे लागेल, आणि हाताने आपल्या पाठीला सहारा देत आपल्या पायांना सरळ दिशेत ठेवावे.आणि जेव्हा आपले पाय वरच्या दिशेला असतील तेव्हा आपला खांदा हा जमिनीवर टेकलेला असावा.
या आसनाला केल्यानंतर आपण थोड्या वेळाने पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत यावे.
सर्वांगासन चे फायदे – Sarvangasana Benefits:
- या आसनामुळे आपल्याला असलेल्या पोटांच्या विकारांमध्ये फरक पडते.
- सर्वांगासानामुळे आपली पचनशक्ती आणखी जास्त कार्यशील होते.
- हे आसन केल्यामुळे आपली स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते.
या प्रकारे आज आपण योगासन कसे करावे आणि आपल्याला त्यांचा कसा फायदा होईल हे जाणून घेतले.
आशा करतो आपल्याला या लेखामधून काहीतरी शिकायला मिळाले असेलच, तसेच आपण दररोज ह्या योगासनांना करून पहा आपल्याला काही दिवसांनतर याचा परिणाम दिसून येईल.
आणि आमचा हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांमध्ये शेयर करायला विसरू नका.
Thank You!