Vahtukiche Niyam
आजच्या या युगात बऱ्याच जणांना ट्राफिक नियमांची चांगल्या प्रकारे जाणीव नाही आहे म्हणून रस्त्यावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे ज्यामध्ये दिवसाला हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत.
या मागचे कारण म्हणजे ट्राफिक च्या नियमांचे केले गेलेले उल्लंघन होय, जर प्रत्येकाने ट्राफिक नियमांचे पालन केले तर अपघात होणारच नाही. त्यासाठी भारत सरकारने नवीन नियम केले तयार केले आहेत.
तर चला जाणून घेऊया,
आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत आपले ट्राफिक नियम व ते नियम तोडल्यास आपल्याला त्याचे भुगतान कसे करावे लागेल.
“माहिती आहेत का आपले ट्राफिक नियम” – Traffic Rules in Marathi
ट्राफिक चे काही बेसिक नियम – Traffic Rules
१) डावीकडून चालणे.
जेव्हा हि आपण रस्त्याने प्रवास करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेऊन घ्या कि आपण नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूला आपले वाहन चालवावे. कारण समोरून येणारे वाहन हे तुमच्या विरुद्ध बाजूने येत असते. आपण जर आपली बाजू सोडून दुसऱ्या बाजूने वाहन चालविले तर आपला अपघात होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण डाव्या बाजूनेच आपले वाहन सुरक्षितरित्या चालवावे.
२) डावीकडे वळणे.
वाहने चालविताना जर आपल्याला डाव्या बाजूला वळायचे असेल तर आपण आपले वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला घ्या त्यांनतर आपल्या गाडीचे डाव्या बाजूचे इंडीगेटर सुरु करून त्यानंतर डावीकडे वळण घ्या जेणेकरून तुमच्या पाठीमागे असणाऱ्या वाहनाला कळेल कि तुम्हाला डावीकडे वळायचे आहे, त्यामुळे तो स्वतःच्या वाहनावर नियंत्रण ठेवेल आणि यामुळे आपण आपला होणारा अपघात टाळू शकता.
३) उजवीकडे वळणे.
वाहने चालविताना जर आपल्याला उजव्या बाजूला वळायचे असेल तर आपण आपले वाहन रस्त्याच्या उजाव्या बाजूला घ्या त्यांनतर आपल्या गाडीचे उजव्या बाजूचे इंडीगेटर सुरु करून त्यानंतर उजवीकडे वळण घ्या जेणेकरून तुमच्या पाठीमागे असणाऱ्या वाहनाला कळेल कि तुम्हाला उजवीकडे वळायचे आहे, त्यामुळे तो स्वतःच्या वाहनावर नियंत्रण ठेवेल आणि यामुळे आपण आपला होणारा अपघातही टाळू शकता.
४) ओव्हरटेक करणे.
बरेचदा आपण वाहन चालवित असतांना घाईत एखाद्या वाहनाला मागे टाकण्याचे प्रयत्न करत असतो.
कधी कधी असे करणे आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकते.
ज्यामुळे आपला अपघात होऊन आपल्याला दुखापत होण्याची शक्यता असते.
त्यासाठी नेहमी वाहन चालवित असताना ओव्हरटेक करतेवेळी आपण उजव्या बाजूनेच ओव्हरटेक करावा तेही समोरचे वाहन येत नसताना.
जेणेकरून आपल्याला दुखापत होणार नाही.
५) जेव्हा कोणी आपल्याला ओव्हरटेक करत असेल.
प्रवास करत असताना जेव्हा आपल्याला कोणी ओव्हरटेक करत असेल तेव्हा आपण आपल्या वाहनाची गती कमी ठेवावी.
जेणेकरून त्या मागील वाहनाला समोर जाण्यासाठी रस्ता मिळेल. आणि अपघात होण्याची शक्यता कमी होईल.
६) योग्य अंतर ठेवणे.
वाहन चालवत असतांना समोरील वाहनात आणि तुमच्या वाहनात योग्य ते अंतर ठेवा. जेणेकरून तुमच्या आणि समोरील वाहनाची टक्कर होणार नाही आणि अपघातास टाळा बसेल.
७) होर्न न वाजवणे.
रस्त्याने प्रवास करत असताना बरेच ठिकाणी “नो होर्न” असे लिहिलेलं असते. त्या भागात आपण आपल्या वाहनाचा होर्न वाजवू नये. (उदा. दवाखान्याजवळ, शाळेजवळ)
भारत सरकार ने काढलेले नवीन चलनाचे नियम – RTO Traffic Rules in Marathi
या लेखामध्ये आपल्याला थोडक्यात या नियमांची रूपरेखा मिळणार आहे.
नियम खालीलप्रमाणे आहेत.
१) मोबाईलचा वापर
गाडी चालविताना जर मोबाईल चा वापर करताना आपण ट्राफिक पोलिसांच्या निदर्शनास आले तर आपल्याला पहिल्यांदा ५०० तर दुसर्यांदा १००० रुपये दंड ठोठावण्यात येतो.
२) विना हेल्मेट.
जर आपण दुचाकीवर विना हेल्मेट प्रवास करताना आढळले.
तर आपल्याकडून पहिल्यांदा ५०० तर दुसर्या वेळेला १००० रुपये दंड घेण्यात येईल. त्यासाठी आपण नेहमी आपले हेल्मेट घालूनच प्रवास करावा.
३) इंडीगेटर चा योग्य उपयोग.
जर वाहन चालविताना तुम्ही इंडीगेटर चा योग्य उपयोग केला नाही तर भारत सरकार नवीन नियमानुसार आपल्याकडून पहिल्यांदा ३०० तर दुसऱ्यांदा ५०० रुपयांचा दंड घेऊ शकते.
४) ट्रिपल सिट सवारी.
आपण जर आपल्या दुचाकीवर ट्रिपल सिट सवारी घेऊन फिरतांना ट्राफिक पोलिसांच्या निदर्शनास आले तर आपल्याकडून पहिल्यांदा ३०० तर दुसर्यांदा ५०० रुपयांचा दंड घेण्यात येईल.
५) विना सिट बेल्ट चा प्रवास.
चार चाकी वाहनामध्ये आपण जर विना सिट-बेल्ट प्रवास करताना पोलिसांच्या निदर्शनास आले तर ते आपल्याकडून पहिल्यांदा ५०० तर दुसऱ्यांदा १००० रुपयांचा दंड घेऊ शकतात.
६) गती वाढविल्यास.
ठरवून दिलेल्या गतीपेक्षा जर आपण आपल्या वाहनाची गती वाढविली तर आपल्याला पहिल्यांदा २००० तर दुसर्यांदा ४००० रुपये दंड भरावा लागेल.
७) विना परवाना गाडी चालवणे.
जर आपण विना परवाना आपली गाडी चालवत असाल तर आपल्याला त्यासाठी दंड भरावा लागू शकतो. नवीन ट्राफिक नियमानुसार जर आपल्या कडे परवाना नाही तर आपल्याला २५०० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
वरील सर्व नियम बऱ्याच राज्यांमध्ये लागू झालेले नाहीत परंतु आपण आपल्या सुरक्षितेसाठी या सगळ्या नियमांचे पालन करावे जेणेकरून आपल्यासोबत कोणताहि वाईट अपघात होऊ नये.
आणि आपण सुरक्षितरित्या आपल्या परिवारासोबत आपले आयुष्य जगू शकू.
तर मित्रांनो आजच्या लेखात आपण काही नियम पहिले ज्या नियमांना भारत सरकार ने पहिल्यापेक्षा जास्त कठोर केले आहेत.
भारत हा असा एकमेव देश असेल जिथे लोकांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकार ला नियम बनवावे लागत आहेत. आणि त्यांचे पालन करावे असे सांगावे लागत आहेत.
जर आजच्या लेखामध्ये आपल्याला नवीन चलानाविषयी थोडी नवीन माहिती मिळाली असेल आणि आपल्याला वाटत असेल कि आपल्या मित्रपरिवारात सुद्धा ह्या नियमांचे पालन झाले पाहिजे तर या लेखाला आपल्या मित्रपरिवारात शेयर करायला विसरू नका.
तसेच आपला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, तो द्यायला विसरू नका.
Thank you!