Sambhashan Kaushalya
मित्रांनो, असे म्हटल्या जाते जगात प्रत्येक यशस्वी होणाऱ्या व्यक्तीमागे चांगल्या कम्युनिकेशन स्किल चा हात असतो.
जर आपण सुद्धा जीवनात काही मिळवण्याच्या तयारीत असाल, तर आपल्याला सर्वात पहिले आपले कम्युनिकेशन स्किल ला चांगले बनवावे लागेल,
जेणेकरून आपल्याला कोणत्याहि परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळता येईल.
कम्युनिकेशन स्किल हि एक कला आहे आपल्या व्यक्तिमत्वाला आणखी चांगले बनविण्याची.
आवश्यक नाही कि आपले कम्युनिकेशन स्किल चांगले होण्यासाठी कुठे क्लासेस लावावे, काही सीडीस पाहाव्या वगैरे वगैरे,
कम्युनिकेशन स्किल हा आपल्या दररोज च्या जीवनातील एक भाग आहे.
प्रत्येक व्यक्ती हा जन्मता शिकून येत नसतो, त्यासाठी त्याला प्रत्येक गोष्ट हि सरावाने शिकायची असते. जेणेकरून तो आपले भविष्य चांगल्या प्रकारे उज्वल करू शकेल.
जर तुमची कम्युनिकेशन स्किल चांगली असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कमी प्रयत्न करावे लागतील.
तर आज आपण जाणून घेवूया अश्या काही टिप्स ज्या मुळे आपण आपल्या कम्युनिकेशन स्किल ला चांगली बनवू शकता.
ह्या टिप्स वाचल्यावर लोक आपल्याशी बोलायला उत्सुक होतील – Tips to Improve Communication Skills in Marathi
१) बॉडी लँग्वेज (शारीरिक हावभाव):
कम्युनिकेशन स्किलसाठी आपल्या बॉडी लँग्वेज वर नियंत्रण असणे गरजेचे आहे. कारण बरेचदा असे होते कि लोक बोलतात काही आणि त्यांची बॉडी लँग्वेज काही दुसर बोलत असते. या साठी नेहमी लक्षात ठेवा.
आपण जे बोलत आहोत त्याचप्रकारे आपली बॉडी लँग्वेज बोलली पाहिजे.
कारण जर असे झाले नाही तर समोरच्याला समजून येईल कि आपल्याला त्याच्याशी बोलण्यात कुठल्याही प्रकारचा रस नाही. त्यासाठी जेव्हा आपण कोणाशी बोलत असू तेव्हा आपण आपली बॉडी लँग्वेज व्यवस्थित ठेवावी.
२) सरळ व्यक्ती बना:
जीवनात सरळ व्यक्ती बनून जगायचे प्रयत्न करा. कोणीही आपल्याशी सहज बोलू शकेल. तसेच आपल्याला सहज समजून घेईल.
आपण नेहमी आपल्या गोष्टींना तिखट मीठ लाऊन न सांगता, सरळ प्रकारे सांगावी जेणेकरून ऐकणार्यावर याचा वाईट प्रभाव न पडावा.
३) योग्य भाषा निवडा:
जेव्हा हि आपण एखाद्या व्यक्तीशी संवाद साधत असाल तर आपण आपल्या शब्दांचा योग्य प्रकारे वापर करावा.
वायफळ शब्दांचा तसेच दुसर्याला दुखावतील अश्या शब्दांचा वापर आपल्या संभाषणात असायला नको.
त्यासाठी नेहमी आपण आपल्या संवादात चांगले शब्द तसेच योग्य भाषा निवडावी. जेणेकरून समोरच्याला आपल्या शब्दांपासून इजा होणार नाही.
४) आत्मविश्वास:
आत्मविश्वासामुळे प्रत्येक गोष्ट आपण मिळवू शकता. जेव्हा आपण कोणाशीही संवाद सादत असू तेव्हा आपण पूर्ण आत्मविश्वासाने आपली बाजू मांडावी जेणेकरून समोरच्यावर आपला सकारात्मक प्रभाव पडेल.
तसेच चांगल्या प्रकारे समजू शकेल कि आपल्याला काय म्हणायचे आहे.
५) संवादामध्ये वाद करणे टाळावे:
समोरील व्यक्तीच्या विचारांसोबत आपली जुळवाजुळवी होत नसेल तर आपण संवाद तर साधु शकता पण नेहमी लक्षात ठेवा आपल्या संभाषणाचे रुपांतर कधीही वादामध्ये होता कामा नये.
कारण उत्तम संभाषण करणारे कधीही आपल्या संभाषणात वाद येऊ देत नाहीत. उलट ते समोरच्याला आपल्या विचारांशी जुळवून घेतात.
६) चेहऱ्यावर हसू तसेच डोळ्यात डोळे टाकून बोलावे:
संभाषण करत असताना समोरील व्यक्तीच्या डोळ्यात डोळे टाकून आत्मविश्वासाने संभाषण करावे. त्यामुळे समोरील व्यक्ती एवढे समजून जाईल कि या व्यक्तीला आपल्याशी बोलण्यात रस आहे.
तसेच संभाषण करतेवेळी नेहमी आपल्या चेहऱ्यावर हसू तसेच चांगले हावभाव ठेवावे. जेणेकरून समोरच्यावर त्याचा चांगला प्रभाव पडेल तसेच आपले संभाषण आणखी चुरस होईल.
७) उत्तम श्रोता बना:
एक चांगला वक्ता तोच बनू शकतो जो एक चांगला श्रोता असतो. ह्याविषयी तर तुम्ही ऐकलेलेच असेल म्हणजे जो व्यक्ती समोरच्याला जेवढ्या चांगल्या प्रकारे ऐकून घेऊ शकतो, तोच व्यक्ती एक उत्तम वक्ता बनू शकतो.
त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला चांगल्या प्रकारे ऐकून घ्या त्यानंतर आपले स्वतःचे मत मांडा.
जेवढे समोरच्याला चांगल्या प्रकारे ऐकता तेवढे त्याविषयी आणखी जाणून घेता आणि त्याविषयी जाणल्यानंतर आपण त्यासोबत चांगल्या प्रकारे संभाषण करू शकता.
८) आदराने बाळगा:
संभाषण करतेवेळी समोरच्याला हवा असलेला आदर त्यांना द्या ज्यामुळे आपल्यात असलेली चांगली प्रवृत्ती लोकांना दिसून येईल. तसेच ह्यामुळे समोरच्यावर आपला एक चांगला प्रभाव सुद्धा पडणार.
त्याच मदतीने आपण चांगल्या प्रकारे संभाषण करू शकू. हळूहळू तुमच्याच लक्षात येऊन जाईल कि आदरपूर्वक संभाषण केल्याने आपले कम्युनिकेशन स्किल कश्या प्रकारे आणखी उत्तम होत आहे.
९) वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधा:
आपले कम्युनिकेशन स्किल चांगले करण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या व्यक्तींसोबत आपल्याला बोलावे लागेल, लहान मुलांपासून तर वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत आपण संवाद साधावा जेणेकरून आपल्याला प्रत्येक व्यक्तीशी बोलल्या नंतर वेगळा अनुभव मिळेल.
या अनुभवला एकत्र करूनच आपले कम्युनिकेशन स्किल बऱ्यापैकी चांगले करू शकतो.
१०) प्रश्न साठा:
कम्युनिकेशन स्किल चांगले करण्यासाठी आपल्याकडे प्रश्नांचा साठा असणे गरजेचे आहे जेणेकरून आपण उत्तम प्रकारे आपले संभाषण करू शकता. आपल्याकडे आपल्या संभाषणाच्या संदर्भाचे जेवढे जास्त प्रश्न तेवढे चांगले.
संभाषणासाठी असलेल्या विषयावर आपण मनात प्रश्न निर्माण करून ठेवा. त्यानंतर आपण आपला संवाद योग्य पद्धतीने साधू शकता.
आशा करतो आपल्याला या लेखामधून काहीतरी शिकायला मिळाले असेल.
जर आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल, तर आपण या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नको.
आम्ही असेच आणखी लेख आपल्यासाठी घेऊन येत राहू.
या लेखावर आपला अभिप्राय नोंदवा कारण आपला अभिप्राय आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे.
Thank You!