Interesting Facts about Pakistan
पाकिस्तान या देशाविषयीच्या या महत्वपूर्ण गोष्टी खरंच आपल्याला माहितीयेत? – Interesting Facts about Pakistan
- पाकिस्तान हा नुक्लेअर शक्ती बाळगलेला जगाच्या पाठीवरील एकमेव असा इस्लामिक देश आहे.
- पाकिस्तानात आजतागायत केवळ दोन व्यक्तींनाच नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलय, 2014 ला मलाला युसुफजाई या महिलेला शांततेकरीता आणि 1979 साली अब्दुस सलाम यांना भौतिकशास्त्रा (Physics) करीता देण्यात आला.
- अधिकृतरीत्या “इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान” हे पाकिस्तानचे वास्तविक नाव आहे.
- 1947 साली पाकिस्तान ब्रिटीश भारतीय साम्राज्यातून स्वतंत्र झाला.
- अफगाणिस्तान, चायना, भारत, आणि इराणच्या सीमारेषा या पाकिस्तानशी जोडलेल्या आहेत.
- पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा उर्दू असून आधिकारिक भाषा इंग्लिश आहे.
- एका सर्वेक्षणानुसार पाकिस्तान चे राष्ट्रीय गान विश्वातील सर्वश्रेष्ठ गान आहे.
- इंस्टिटयूट ऑफ युरोपियन बिझनेस एडमिनिस्ट्रेशन यांच्या द्वारे 125 देशांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार सर्वाधिक बुद्धिमान लोकांच्या सूचित पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर येतो.
- सर्वात अधिक वैज्ञानिक आणि इंजिनियर्स कुठे आहेत याचा शोध घेतला असता या क्रमवारीत पाकिस्तान जगात सातव्या क्रमांकावर आहे.
- आंबा हे पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ असून जास्मिन हे राष्ट्रीय फुल आहे.
- मारखोर पाकिस्तान चा राष्ट्रीय पशु म्हणून ओळखला जातो तर राष्ट्रीय पक्षी हा चकोर आहे.
- इस्लामाबाद हि पाकिस्तानची राजधानी असून त्याची लोकसंख्या 9,19,000 इतकी आहे.
- २३ मार्च हा पाकिस्तानचा गणतंत्र दिवस म्हणून साजरा होतो, याला पाकिस्तान डे देखील म्हंटल्या जातं.
- पाकिस्तानात अधिकतर मुस्लिमांचे वास्तव्य असून जवळजवळ 96 .4 % लोकसंख्या हि मुस्लीम आहे. इतर धर्मीयांमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन धर्मीय लोक राहतात.
- पाकिस्तानचा चा जीडीपी (आर्थिक वृद्धिदर) 884.2 बिलियन $ आहे.
- कश्मीर मुद्द्यावर 1965 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरे युद्ध झाले. तब्बल 17 दिवस चाललेल्या या युद्धात हजारो लोक जखमी झाले आणि मृत्युमुखी पडले. इतिहासातील दुसऱ्या विश्व युद्धानंतर झालेले हे दुसरे विनाशकारी युद्ध मानले जाते.
- 1965 मध्ये झालेल्या युद्धात विजयी झाल्याचा दावा भारत आणि पाकिस्तान दोघेही करत आले आहेत, सोवियत संघ आणि युनाईटेड स्टेट यांच्या मध्यस्थी नंतर हे युद्ध संपुष्टात आले होते.
- पाकिस्तान ने सरकारी संविधानाला संसदीय प्रणालीकरीता 1973 साली स्वीकारले होते.
- बेनजीर भुट्टो या पाकिस्तानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री झाल्या शिवाय मुस्लीम राष्ट्रांमधील त्या पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून देखील ओळखल्या जातात.
- 1991 साली पास करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार इस्लामिक कायदाच पाकिस्तान चा कायदा म्हणून स्वीकृत झाला.
- जनरल परवेज मुशर्रफ यांनी 31 ऑगस्ट 2007 साली पाकिस्तानच्या संविधानात त्यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती बनविण्याकरिता अनुमती मिळविण्या संबंधित संशोधन बनविले होते.
- अलकायदा चा सर्वेसर्वा असलेल्या ओसामा बिन लादेनची हत्या यूनाइटेड स्टेट स्पेशल फोर्स ने २ मे 2011 ला पाकिस्तानातील अबोत्ताबाद येथे केली.
- .pk हा पाकिस्तानचा इंटरनेट कंट्री कोड आहे.
- पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी 7,789 किलोमीटर क्षेत्रफळात रेल्वेचे जाळे पसरले आहे, 7,477 किलोमीटर ब्रॉडगेज व 312 किलोमीटर नॅरोगेज आहे.
- मुहम्मद बिन कासिम बंदर पाकिस्तानातील कराची मधले मुख्य बंदर आहे.
- मोहंजोदडो, हडप्पा, तक्षशीला, कोट दिजी, मैहर गढ, तख्त भाई, जुनिपर शाफत गुफा, मुर्घगुल्ल घर्रा गुफा आणि मुगल गुफा पाकिस्तानातील मुख्य ऐतिहासिक वास्तूंमधील एक आहेत.
- कुईद-ए-आजम मुहम्मद अली जिन्ना (1876-1948) यांनाच पाकिस्तानाचा जनक/ पिता संबोधण्यात येतं.
- पाकिस्तानच्या राष्ट्रीय गीताचा अवधी हा 80 सेकंदाचा आहे.
- १८ वर्ष वयाची व्यक्ती ही पाकिस्तानात मतदानाकरीता पात्र समजण्यात येते.
- सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पक्के महामार्ग हे पाकिस्तानात आहेत – दी काराकोरम हाईवे (KKH)
- पाकिस्तान जवळ जगातील सर्वात मोठी कालव्यावर आधारीत सिंचन व्यवस्था आहे.
- विश्वातील सर्वात मोठे रुग्णवाहिकेचे जाळे हे पाकिस्तानात आहे. पाकिस्तानच्या एधी फाउंडेशन ची नोंद यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ला करण्यात आली आहे.
- पाकिस्तान ची लोकसंख्या ही 2015 साली अंदाजे 191.71 मिलियन पेक्षा देखील अधिक होती. म्हणूनच लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून हा जगातील सहावा सर्वात मोठा देश आहे. ब्राजिल पेक्षा मागे आणि नाइजीरिया पेक्षा पुढे.
- पार्शियन आणि उर्दूत पाकिस्तान या शब्दाचा अर्थ “शुद्ध जमीन” असा होतो.
आशा आहे की आपणास “Interesting Facts about Pakistan” याविषयी हा लेख आवडला असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर कृपया फेसबुकवर शेअर करा.
टीपः आम्ही अचूकतेसाठी प्रयत्न करतो. कृपया आपल्याला या लेखात पाकिस्तान देशाच्या रोचक गोष्टी योग्य दिसत नसतील किवां आपल्याकडे पाकिस्तान देशाच्या विषयी अधिक रोचक माहिती असल्यास आम्हाला कमेंट च्या माध्यमातून कळवा ती योग्य असल्यास आम्ही या लेखात नक्कीच अपडेट करू.