Hockey Khelachi Mahiti
खो-खो, क्रिकेट, कब्बडी या मैदानी खेळांमध्ये हॉकी हा एक रोमांचक खेळ आहे, शरीराची स्फूर्ती वाढविणारा, रहस्य रोमांच आणि उत्साह वाढविणारा खेळ म्हणून फार प्रसिद्ध खेळ आहे.
हॉकी या खेळात दोन संघांची आवश्यकता असते ज्यात ११-११ खेळाडू असतात.
हॉकी खेळाची माहिती – Hockey Information in Marathi
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, भारत हा हॉकी खेळात कित्येक वर्षांपर्यंत विश्वविजेता राहिला असल्याने या खेळाला आपला राष्ट्रीय खेळ संबोधण्यात येतं. परंतु नियमानुसार आधिकारिक स्तरावर या खेळाला अद्याप भारताचा राष्ट्रीय खेळ घोषित करण्यात आलेले नाही. तरीही हॉकी ला अजून सुद्धा भारताचा राष्ट्रीय खेळ समजल्या जातं.
हॉकी हा खेळ मुलं आणि मुली दोघेही खेळू शकतात. या खेळात फायबरपासून बनलेल्या काठीचा उपयोग केला जातो. तिला स्टिक असं म्हणतात. या स्टिक ने खेळाडू रबरी किंवा प्लास्टिक बॉल ला नेट वा गोल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करत करतो.
Hockey History – हॉकी चा इतिहास
हॉकी ची सुरुवात जवळजवळ ४००० वर्षांपूर्वी मिस्र येथे झाल्याचे बोलले जाते. भारतात मात्र साधारण १५० वर्षांपूर्वी हा खेळ खेळायला सुरुवात झाली.
बर्फात खेळल्या जाणाऱ्या आईस हॉकी मुळे या खेळला मैदानी खेळ म्हंटल्या गेले.
हॉकी चे प्रकार – Types Of Hockey
या खेळाचे अनेक प्रकार आहेत
- फील्ड हॉकी Field Hockey
- बर्फ हॉकी Ice Hockey
- रोलर हॉकी Rollar Hockey
- स्लेज हॉकी Sledge Hockey
- गली हॉकी Street Hockey
हॉकी ने उंचावली होती भारताची मान – Hockey in India
एके काळी हॉकी ने आपल्या देशाचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवले होते. भारताचे प्रसिद्ध खेळाडू ध्यानचंद यांना ”हॉकी चे जादुगार” म्हंटल्या जातं.
आपल्या भारताने १९२८ ते १९५६ पर्यंत ऑलंपिक स्पर्धांमध्ये तब्बल ८ सुवर्ण पदकांची कमाई केलीये.
१९६० साली रोम ऑलंपिक मध्ये भारताने रजत पदक मिळविले व १९६८ आणि १९७२ ला भारताला कांस्य पदक मिळवून दिले.
त्यानंतर मात्र दुर्दैवाने हॉकी खेळात भारताची वारंवार पीछेहाट सुरु झाली. तरी देखील धनराज पिल्ले सारख्या झुंजार खेळाडूंनी हॉकी ला भारतात जिवंत ठेवण्याकरता जीवाचे रान केले म्हणून असेल कदाचित कि हॉकी आज आपला राष्ट्रीय खेळ आहे.
हॉकी मध्ये आपल्या देशाने इतके नाव कमावले कि आज महिला देखील मोठ्या प्रमाणात हॉकी खेळायला लागल्या आहेत आणि यश देखील प्राप्त करतायेत.
आपल्या भारतात सर्वप्रथम हॉकी क्लब (१८८५-८६) कलकत्ता येथे स्थापित करण्यात आला. भारतीय खेळाडूंनी ऑलंपिक ची यशस्वी सुरुवात येथूनच केली होती.
Hockey Rules in Marathi – हॉकी खेळण्याचे नियम
हॉकी खेळात ३५-३५ मिनिटांचे २ भाग असतात, प्रत्येक संघात ११ खेळाडू खेळण्याकरता आणि ५ अतिरिक्त खेळाडू असतात.
ऑलंपिक स्पर्धांमध्ये एकूण १२ संघ सहभागी होतात, त्यामुळे ६-६ चे दोन ग्रुप बनविण्यात येतात.
प्रत्येक संघ ग्रूपमधील इतर संघांसोबत सामना खेळतात, ६-६ च्या टीम मधून २ संघ सेमीफायनल करता निवडण्यात येतात. मागे राहिलेले संघ आपापसात खेळतात जेणेकरून ५ व्या ते ७ वा क्रमांक प्राप्त करता यावा. अश्या रीतीने संघ उपांत्यफेरीतून अंतिम फेरीत दाखल होतो आणि त्यातून एक संघ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरतो.
हॉकी खेळतांना लागणारे आवश्यक साहित्य – Hockey Materials
हा सुरळीत आणि सुरक्षित खेळण्याकरता काही महत्वाच्या साहित्याची आवश्यकता असते.
- हेल्मेट
- नेक गार्ड
- शोल्डर गार्ड
- नी गार्ड (Knee Guard )
- एल्बो गार्ड (Elbo Guard )
- कप Pocket आणि जेएक्सट्रेप
- सरंक्षक कप
- हॉकी स्टिक
- हॉकी खेळण्याकरता बॉल
हे सगळं साहित्य खेळतांना खेळाडूच्या सुरक्षेकरता आणि सरंक्षणाकरता अत्यावश्यक असल्याने हे वापरून खेळाडू हॉकी चा उत्तम रीतीने आनंद घेऊ शकतो.
हॉकी चे प्रकार – Hockey Types
हॉकीची अनेक रूपं आणि प्रकार पाहायला मिळतात
- एअर हॉकी
- बीच हॉकी (समुद्र)
- बॉल हॉकी
- बॉक्स हॉकी
- डेक हॉकी (बंदरगाह)
- फ्लोर हॉकी (जर्मनी)
- फुट हॉकी
- जीम हॉकी
- मिनी हॉकी
- रॉक हॉकी
- पोंड हॉकी
- टेबल हॉकी
- अंडरWater हॉकी
हॉकी खेळल्याने होणारे स्वास्थ्यलाभ – Health Benefits of Hockey
खेळ आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी अत्यंत लाभदायक आहे हे आपण जाणतोच. हॉकी खेळल्याने मनोरंजन तर होतं शिवाय हा खेळ आपल्याला अनुशासन देखील शिकवतो. कारण हॉकी असो किंवा आणखीन कुठला खेळ, त्या खेळाचे काही नियम असतात ज्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते.
हॉकी खेळल्याने खेळाडूला स्फूर्ती, आत्मविश्वास, जीवनात संघर्ष आवश्यक असल्याची जाणीव जागृत होणे, या महत्वाच्या गोष्टींचा लाभ होतो.
खेळल्याने सांप्रदायिक सद्भाव देखील वाढतो, आणि हे देखील तितकेच खरे आहे कि स्वस्थ शरीरात स्वस्थ आत्म्याचा निवास असतो.
हॉकी खेळावर चित्रपट – Best Hockey Movies Hindi
चक दे इंडिया :- चक दे इंडिया नावाच्या शाहरुख खान अभिनित चित्रपटात हॉकी हा खेळ दाखविण्यात आला आहे. या चित्रपटामुळे हॉकी ला खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती.
भारतीय महिला हॉकी संघाला हॉकीत सर्वोत्कृष्ट टीम बनविण्याकरता शाहरुख खान खूप परिश्रम घेताना या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट त्यावर्षीचा फार यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपट ठरला होता.