Solapur Jilha Mahiti
भारत सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमधे समावेश मिळवलेला सोलापुर जिल्हा !
पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा सोलापुर प्राचीन काळी सोन्नलागी आणि सोन्नलापुर या नावाने देखील ओळखला जायचा.
औद्योगिक केंद्र म्हणुन ओळख मिळवलेल्या या जिल्हयात सुती वस्त्र, सोलापुरी चादरी, प्रसिध्द असुन या शहराला कापड गिरण्यांचे शहर देखील बोलल्या जाते. विडी आणि सिगारेट उदयोगात या जिल्हयाचा प्रथम क्रमांक लागतो.
सोलापुर जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Solapur District Information In Marathi
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर येथील लोक कर्नाटकात जाण्यास ईच्छुक होते, महादेवी लिंगाडे नामक कन्नड लिंगायत साहित्यिक महिलेने सोलापुर ला कर्नाटकाशी जोडण्याकरता आंदोलन देखील केले पण या विवादामुळे सरकारने महाजन आयोगाची स्थापना केली, या आयोगाने सोलापुर ला कर्नाटकाशी जोडण्यासंदर्भातला अहवाल शासनासमोर मांडला परंतु शासनाने तो धुडकावत न्यायालयाची मदत घेतली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
मराठी भाषेपेक्षा देखील जास्त प्रमाणात या ठिकाणी तेलगु आणि कन्नड भाषा बोलली जाते.
सिध्देश्वर मंदिरामुळे देखील या जिल्हयाला एक आगळ वेगळं वलय प्राप्त झालं असुन दुरदुरून भाविक येथे दर्शनाकरता येत असतात.
सोलापुरात आज देखील एका मुस्लिम किल्ल्याचे भग्नावशेष पहायला मिळतात.
सोलापुर जिल्हा सध्या सर्व त.हेच्या गणवेशांकरता ओळखला जातो, महाराष्ट्राव्यतीरीक्त हे गणवेश उपयोगात आणले जातात.
Solapur District Taluka List – सोलापुर जिल्हयातील तालुके
सोलापुर जिल्हयात एकुण 11 तालुके आहेत
- उत्तर सोलापुर
- दक्षिण सोलापुर
- अक्कलकोट
- बार्शी
- मंगळवेढा
- पंढरपुर
- सांगोला
- माळशिरस
- मोहोळ
- माढा
- करमाळा
सोलापुर जिल्हयाविषयी काही उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Solapur Zilla Chi Mahiti
- लोकसंख्या 43,17,756
- एकुण क्षेत्रफळ 14895 वर्ग कि.मी.
- एकुण गावं 1144
- एकुण तालुके 11
- साक्षरतेचे प्रमाण 2%
- 1000 पुरूषांमागे स्त्रियांची संख्या 935
- राष्ट्रीय महामार्ग क्र. 65, 52, 204, 361, 465, 150 या जिल्हयातुन गेले आहेत.
- सोलापुर जिल्हयाच्या उत्तरेला अहमदनगर पुर्वेला उस्मानाबाद दक्षिणेला सांगली विजापुर तर पश्चिमेला सातारा आणि पुणे हे जिल्हे आहेत.
- स्वातंत्र्य मिळण्यापुर्वीच या शहराने तिन दिवसाचे स्वातंत्र्य उपभोगले आहे ते 1930 साली 9,10 आणि 11 मे ला मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि किसन सारडा या स्वातंत्र्यविरांना इंग्रजांनी सोलापुरात फाशी दिली होती त्यामुळे या शहरास हुतात्म्यांचे शहर म्हणुन देखील ओळख आहे.
- अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत ’पंढरपुर’ याच जिल्हयात असुन या जिल्हयाला संतांची भुमी देखील म्हंटले आहे.
- पंढरपुरला फक्त महाराष्ट्रातीलच नव्हें तर दक्षिणेकडच्या राज्यातील भाविकही दर्शनाकरता येत असतात.
- तेलगु, कन्नड आणि मराठी अश्या तिनही भाषा बोलणारे नागरिक गुण्या गोविंदाने याच जिल्हयात नांदतांना आपल्याला पहायला मिळते.
- अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शनाकरता भाविक लांबुन या ठिकाणी येतात शिवाय येथील शिवगंगा मातेचे मंदिर त्याच्या कळसामुळे फार प्रसीध्द आहे या मंदिराचा कळस 100 तोळे सोन्यापासुन बनला असुन दरवाजा 80 किलो चांदिपासुन बनल्याचे सांगितल्या जाते.
- सोलापुर जिल्हयात दरवर्षी साजरी होणारी सिध्देश्वराची यात्रा खुप प्रसिध्द आहे.
- या जिल्हयातील ’सोलापुरी चादरी’ प्रसिध्द आहेत.
पर्यटन आणि तिर्थस्थळं – Places To Visit in Solapur
पंढरपुर – Pandharpur
पंढरीचा विठोबा आणि त्याचे वारकरी यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हें तर अवघ्या त्रिभुवनात पंढरपुर सुपरिचीत आहे. जाती भेदाच्या पलिकडच्या या भगवंताला भेटण्याकरता लांबलांबुन वारकरी पायी पायी विठुरायाच्या भेटीला आषाढी वारीला येत असतात.
अलौकीक असा हा वारीचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्याकरता देखील लाखो भाविक पंढरीला येत असतात. विÐल आणि रूक्मीणीच्या दर्शनाकरता वारकरी तासनतास् रांगेत उभे असतात.
आषाढी आणि कार्तिकी अश्या दोन उत्सवादरम्यान पंढरपुरात प्रचंड संख्येने भाविक दाखल होतात.
चंद्रभागेच्या तिरावर वसलेले हे मंदीर फारच प्राचीन असुन अगदी गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत या ठिकाणी एकसमान होतात.
या पंढरपुरात शेगावच्या गजानन महाराजांचे देखील मंदिर असुन तो परिसर देखील दर्शनाकरता आणि निवासाकरता अतिशय योग्य आहे त्यामुळे विठोबाच्या मंदिरात दर्शनाला आलेले भाविक या ठिकाणी देखील दर्शनाकरता येतात.
सोलापुर जिल्हयातील पंढरपुर हे ठिकाण रेल्वे, बस आणि खाजगी वाहनांने देखील जोडले असुन सोलापुर पासुन अवघ्या दिड तासाच्या अंतरावर आहे.
गाणगापुर – Gangapur
दत्तात्रयाचे नृसिंह सरस्वती अवतारातील हे गाणगापुर ठिकाण अत्यंत पवित्र आणि धार्मिक स्थळ म्हणुन प्रसिध्द आहे.
सोलापुर पासुन साधारण तीन तासाच्या अंतरावर 110 कि.मी. वर असलेल्या या ठिकाणी दत्तभक्त दर्शनाकरता येतातच.
येथील भिमा अमरजा संगमावर सकाळी स्नान करून दुपारच्या वेळेस पाच घरी भिक्षा मागावी आणि सायंकाळी दत्तात्रयाच्या पादुकांचे दर्शन घ्यावे असे केल्याने प्रभु दत्तात्रयाची कृपादृष्टी प्राप्त होते अशी भाविकांची श्रध्दा आहे.
दत्तात्रय प्रभु या ठिकाणी नृसिंह स्वरूपात अस्तित्वात असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.
भिमा अमरजा अश्या पवित्र नद्यांचा या ठिकाणी संगम आहे.
अक्कलकोट – Akkalkot
सोलापुर पासुन अगदी जवळ म्हणजे 40 कि.मी. अंतरावर असलेले अक्कलकोट हे ठिकाण स्वामी समर्थामुळे सर्वदुर परिचीत आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या अगदी लगत हे गाव दत्तपरंपरेतील भाविकांकरता अत्यंत पवित्र ठिकाण आहे.
एकदा एका भक्ताने समर्थांना त्यांच्या विषयी विचारले असता समर्थांनी सांगितले की ते औदंुबराच्या वृक्षातुन निघालेले आहेत आणि एकदा असे सांगितले की त्यांचे नाव नृसिंह भान असुन श्रीशैलम नजीक कर्दळीवनातुन ते आले आहेत.
आजही कर्दळीवनाची यात्रा करणा.या भाविकांना त्याठिकाणी स्वामी समर्थांचे स्थान पहावयास मिळते.
संपुर्ण भारतात पदभ्रमंती केल्यानंतर श्री स्वामी समर्थ शेवटी अक्क्लकोट या ठिकाणी आले त्यामुळे त्यांचे हे ठिकाण अत्यंत पवित्र आणि जागृत असुन भाविक या ठिकाणी नेहमी दर्शनाकरता येत असतात.
सिध्देश्वर मंदिर – Siddheshwar Temple
सिध्देश्वर हे सोलापुर नगरीचे ग्रामदैवत असुन या मंदिराची निर्मीती योगी श्री सिध्दरामेश्वर यांनी केली आहे जवळजवळ 68 शिवलिंगांची त्यांनी स्थापना केली.
सोलापुरचे सिध्देश्वर मंदिर फार प्राचीन मंदिर असुन अनेक शिवलिंगांचे दर्शन या ठिकाणी भाविकांना घेता येते.
श्री गणेशाची मुर्ती देखील या ठिकाणी असुन येथील मुर्तींवर आणि मंदिरावर कर्नाटकी स्थापत्य कलेचा प्रभाव आपल्याला दिसुन येतो.
श्री शिव सिध्दरामेश्वरांची समाधी या ठिकाणी असुन तेथील शिवपिंडीवर सदैव जलाभिषेक सुरू असतो.
या मंदिराच्या सभोवताली सिध्देश्वर तलाव असुन हे मंदिर सदैव पाण्याने वेढलेले असते मंदिर परिसरातुन सोलापुरचा किल्ला दृष्टीस पडतो.
येथील सिध्देश्वराची यात्रा फार प्रसिध्द असुन त्या दरम्यान लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात.
या व्यतिरीक्त सोलापुर जिल्हयात अशी बरीच ठिकाणं आहेत ज्याला आपण आवर्जुन भेट द्यायला हवी.
त्यापैकी नान्नजचे माळढोक अभयारण्य, बार्शी चे हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील भगवान विष्णुचे मंदिर, दक्षिण सोलापुर तालुक्यातील हत्तरसंग कुडल या ठिकाणी भीमा आणि सीना नदीचा संगम झालेला आपल्याला पहायला मिळतो या संगमावर हरिहरेश्वर आणि संगमेश्वर अशी महादेवाची मंदिर आपल्याला आकर्षीत करतात.
करमाळा येथील प्रसिध्द भुईकोट किल्ला सुध्दा प्रेक्षणीय आहे.
त्याचप्रमाणे सोलापुरमधल्या कंबर तलावानजिक असलेले महात्मा गांधी प्राणी संग्रहालया सारखी बरीच ठिकाणं आपल्याला सोलापुरात पहायला मिळतात.
महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानी उस्मानाबाद जिल्हयात असली तरी सोलापुर पासुन ती अवघ्या तासाभराच्या अंतरावर आहे.
लक्ष्य दया: तुमच्या जवळ सोलापुर जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please: आम्हाला आशा आहे की हा चला तर जाणुया सोलापुर जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Solapur District Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुध्दा.
नोट: Solapur District – सोलापुर जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.