Chandrapur District Information in Marathi
महाराष्ट्रातील चंद्रपुर जिल्हा! हा जिल्हा 1964 पुर्वी चंदा या नावाने ओळखला जायचा हे आज फार कमी जणांना माहीत असेल. 1964 नंतर मात्र चंद्रपुर असे नाव अस्तित्वात आले आणि आज तेच प्रचलीत आहे, आणखीन एक वैशिष्टय या जिल्हयाचं असं आहे की भारतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणुन याची ख्याती होती जोवर गडचिरोली हा वेगळा जिल्हा म्हणुन अस्तित्वात आला नव्हता.
चंद्रपुर जिल्हाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Chandrapur District Information in Marathi
चंद्रपुर जिल्हाचा इतिहास – Chandrapur History in Hindi
सुपर थर्मल पाॅवर स्टेशन आणि कोळशाच्या खाणीकरता चंद्रपुर जिल्हा जगभरात प्रसीध्द आहे. चंद्रपुरात मोठया प्रमाणात चुनखडी सापडते, सिमेंटचा कच्चा माल म्हणुन तिच्याकडे पाहिल्या जातं.
चंद्रपुर जिल्हयातील तालुके – Chandrapur District Taluka List
चंद्रपुर जिल्हयात एकुण 15 तालुके आहेत.
1) चंद्रपुर
2) भद्रावती
3) वरोरा
4) चिमुर
5) नागभिड
6) ब्रम्हपुरी
7) सिंदेवाही
8) मुल
9) साओली
10) गोंडपिंपरी
11) राजुरा
12) कोरपना
13) पोंबुर्ना
14) बल्लारपुर
15) जिवती
पर्यटन स्थळं – Tourist Places in Chandrapur
चंद्रपुर जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत समृध्द जिल्हा आहे. प्रसीध्द ठिकाणांमुळे एक वेगळ वलय या जिल्हयाला प्राप्त झालं आहे.
- ताडोबा नॅशनल पार्क – Tadoba National Park
वाघाकरता प्रसीध्द ताडोबा व्याघ्रप्रकल्पाला पाहाण्याकरता लोक दुरदुरून इथे भेटी देतात. व्याघ्रदर्शन ते ही थेट मोकळया भागात हा अनुभव अक्षरशः अंगावर रोमांच उभे करणारा असल्याने फार मोठया प्रमाणात इथे पर्यटकांची गर्दी बघायला मिळते.
नुकत्याच झालेल्या गणनेत ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आजरोजी जवळपास 88 वाघ आहेत. व्याघ्रप्रकल्प हा 7 ही दिवस बघण्याकरता उपलब्ध असुन उघडया जिपमधुन व्याघ्रदर्शन आणि इतर प्राणी पाहाणे हा अतिशय साहसी आणि आनंद देणारा अनुभव पर्यटकांना घेता येतो.
महाराष्ट्रातील सर्वात जुना व्याघ्रप्रकल्प म्हणुन याची ख्याती आहे, भारतातील 28 व्याघ्रप्रकल्पातील हे एक आहे. 623वर्ग कि.मी. च्या क्षेत्रफळात हे विस्तारलेले असुन चन्द्रपुर पासुन अवघ्या 45 कि.मी अंतरावर आहे. बांबु ची झाडं आणि अनेक वेगवेगळी वृक्ष व्याघ्र प्रकल्पाच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात.
वाघ, चित्ता, हरिण, अस्वल, कोल्हा, चितळ, निलगाय, मगर, शिवाय अनेक पक्ष्यांचे हे माहेरघर असल्याने तुम्हाला इथे विपुल प्रमाणात पक्षी आणि प्राणी बघायला मिळतात. नोव्हेंबर ते जुन हा काळ इथे भेट देण्याकरता उत्तम मानल्या जातो. या व्याघ्रप्रकल्पात निवास करण्याकरता रेस्ट हाउस बांधण्यात आले आहेत.
नागपुर पासुन जवळपास 150 कि.मी. अंतरावर ताडोबा असुन तेथे जाण्याकरता नागपुर मधुन बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
- चंद्रपुर सुपर थर्मल पाॅवर स्टेशन – Chandrapur Super Thermal Power Station
8 आॅक्टोबर 1983 ला तत्कालीम प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी याचे औपचारीक उद्घाटन केले आहे. महाराष्ट्राला लागणा.या एकुण विजेपैकी 25 टक्के जास्त वीजेची निर्मीती या थर्मल पाॅवर मधुन होते. कोळश्यापासुन वीजेची निर्मीती येथे केली जाते. 3340 मेगावॅट ची क्षमता असलेले हे औष्णीक केंद्र महाराष्ट्रातील सर्वात मोठे वीज निर्मीती केंद्र आहे. वीजनिर्मीतीकरता लागणारा कोळसा दुर्गापुर आणि पÙपुर कोळसा खाणीतुन पुरवल्या जातो.
- महाकाली मंदीर – Mahakali Mandir Chandrapur
चंद्रपुर येथील महाकाली मंदीर फार प्रसीध्द असे पुरातन मंदीर आहे. चंद्रपुरकरांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदीरात मंगळवारी फार गर्दी असते. चैत्र पौर्णिमेच्या सुमारास इथली यात्रा असुन लाखो भाविक त्यादरम्यान लांबुन देवीच्या दर्शनाला इथे येतात. यात्रेदरम्यान लांबच लांब भक्तांच्या रांगा पहायला मिळतात. चंद्रपुर मधल्या प्रसीध्द मंदीरापैकी हे एक मंदीर असुन याला शहराचे प्रतीक मानल्या जाते.
या मंदीरात गणेशाचे, शनीचे आणि हनुमंताचे देखील मंदीर आहे. प्रसादाची आणि निवासाची व्यवस्था मंदीरात उपलब्ध आहे. 50 फुट उंच अश्या या मंदीरात 8 खिडक्या असुन 4 दरवाजे आहेत मंदीराच्या बाहयभागात वाघ हत्ती आणि इतर प्राण्यांची शिल्पे पहायला मिळतात.
एकुण देवीच्या तीन मुर्ती असुन एक मातेची मुर्ती निद्रावस्थेत विराजमान आहे. महादेवासोबत भांडण झाल्यानंतर देवी चंद्रपुरात गुफेत येउन झोपल्याची आख्यायीका या मंदीराच्या अस्तित्वामागे सांगीतली जाते.
- आनंदवन आश्रम वरोरा – Anandwan Warora
चंद्रपुर पासुन जवळ असलेल्या वरोरा इथं थोर समाजसेवक बाबा आमटे यांचा आनंदवन आश्रम आहे. बाबा आमटेंच्या अथक परिश्रमाने आणि त्यागाने हा आश्रम पावन झालाय. कुष्ठरोग्यांचे पुर्नवसन आणि त्यांच्या सेवेमुळे या आश्रमाला विश्वव्यापी दर्जा प्राप्त झाला आहे. विदेशी पर्यटक देखील या आश्रमाला भेट देण्याकरता मोठया संख्येने इथे येत असतात.
- बल्लालपुर किल्ला – Ballalpur Fort Chandrapur
बल्लालपुर परिसर सध्या कोळश्याच्या खाणींकरता आणि पेपर मिल्समुळे ओळखला जातो. फार पुर्वी बल्लालपुर गुड राजा खांडक्य बल्लालसाह ची राजधानी होती. बल्लालपुर चा किल्ला वर्धा नदीच्या तिरावर भक्कम भिंती आणि बुरूजांमुळे आजही उभा आहे. या किल्ल्याव्यतिरीक्त चंद्रपुर किल्ला आणि माणिकगढ किल्ला देखील पुरातन वास्तु प्रेमींना सदैव आकर्षीत करता असतो.
- भद्रावती जैन मंदीर – Bhadravati Jain Temple Chandrapur
चंद्रपुर पासुन अवघ्या 32 कि.मी. अंतरावर जैनांचे हे पवित्र स्थान भद्रावतीमधे स्थित आहे. यात सुरेख मुर्त्या विराजमान आहेत, अतिप्राचीन असे हे मंदीर असुन याच्या निर्मीतीचा नेमका काळ आज कुणालाही ठाउक नाही. मंदीरात अनेक मुर्त्या आहेत ज्या खोदकाम करतांना आढळुन आल्या.
चंद्रपुर शहराविषयी उपयुक्त माहिती – Chandrapur Information
- चंद्रपुर शहराचे नाव पुर्वी चंदा होते 1964 साली हे चंद्रपुर असे करण्यात आले.
- वर्धा नदी शहराजवळुन वाहाते.
- सुपरथर्मल पाॅवर प्लांट आणि कोळशाच्या विपुल खाणींकरता चंद्रपुर जगभरात प्रसिध्द आहे.
- शहराच्या चारही बाजुने कोळशाच्या खाणी असल्याने शहराला ब्लॅक गोल्ड म्हणुन देखील ओळख आहे.
- चंद्रपुर जिल्हयाची लोकसंख्या 21,94,962
- साक्षरतेचा दर 59.41%
- क्षेत्रफळ 11443 वर्ग कि.मी.
- एकुण चार राज्यमहामार्ग या शहरातुन जातात अनुक्रमे 6,9,233, आणि 243
- 1000 पुरूषांमागे 961 स्त्रिया
- ताडोबा नॅशनल पार्कमुळे इथे येणा.या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे.
आणखी वाचा:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ चंद्रपुर जिल्ह्याबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्