Advertising Writing
आजच्या युगात जाहिरातीला फार महत्व आले आहे. मग उत्पादन असोत वा सेवा, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय असोत किंवा स्थानिक असोत.
वस्तू, सेवा ई. बाबी जर जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर जाहिरातीला पर्याय नाही.
त्यामुळे आज जाहिरातीला आणि जाहिरात लेखनाला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाले आहे.
जाहिरात लेखन – Jahirat Lekhan in Marathi
Advertisement म्हणजे काय? What is advertising?
- लक्ष वेधून घेण्याचे कार्य करणे म्हणजे “जाहिरात” करणे होय.
- वस्तू व सेवांची मागणी निर्माण करणारी कला म्हणजे ”जाहिरात” होय.
किंवा
(१) आपल्याला हवी असणाऱ्या वस्तूचा निर्माता कोण?
(२) ती आपल्या खरच गरजेची आहे का?
(३) कुठे मिळते?
(४) त्या वस्तूची किंमत काय ?
वरील माहितीची उत्तरे ज्यातून आपल्याला मिळू शकतात ती म्हणजे ‘जाहिरात’ होय.
बाजारात अनेक उत्पादनं, सेवा देणाऱ्या काही संस्था आपल्याला दिसतात (उदा. टूथपेस्टचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत.). त्यामुळे स्पर्धा तयार होते.
प्रत्येक उत्पादन निर्मात्याचा किंवा सेवा देणाऱ्याचा हाच प्रयत्न असतो कि त्याचे उत्पादन किंवा तो देत असलेली सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्या उत्पादनाचा खप वाढावा. त्यामुळे ग्राहक जोडण्यासाठी जाहिरात हे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे.
मग एखादी व्यक्ती विकण्यासाठी घरी अगरबत्ती सुद्धा तयार करत असेल, तर उत्पादनाची चांगल्या प्रकारे जाहिरात करून ती त्यांचा खप वाढवू शकते. आणि हे सर्व शक्य होऊ शकतं जाहिरातीमुळे.
त्यामुळेच जाहिरात लेखनाला फार महत्व आहे.
जाहिरात लेखनाचा मूळ उद्देश – Purpose of Advertising Writing in Marathi
Advertisement Writing करतांना मूळ उद्देश हा असावा कि, जाहिरात करत असलेल्या वस्तू किंवा सेवेला प्राथमिकता देऊन ग्राहकांनी ते खरेदी करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.
जाहिराती आपल्या आजूबाजूला असतात, ज्यामुळे आपल्याला सर्व वस्तूंची माहिती मिळते आणि ग्राहक म्हणून आपल्याला खरेदी करणे सोपे होते.
आजच्या काळात जमिन असो वा फ्लॅट, दागिने, कपडे किंवा वाहने अशा कित्येक गोष्टींच्या जाहिराती आपल्याला पहायला मिळतात.
जाहिरात लेखनाचे मुख्यतः प्रकार – Types of Advertising
Advertisement Writing चे मुख्यतः 2 प्रकार आहेत – लेखी आणि तोंडी.
रस्त्यांवर पोस्टर्स किंवा बॅनरच्या स्वरूपात जाहिराती पहायला मिळतात.
Advertisement Writing चे मूळ मुद्दे – जाहिरात लेखनाचे मूळ मुद्दे
जाहिरातलेखन करतांना कुठल्या विशेष मुद्द्यांकडे आपले लक्ष असले पाहिजे ते आपण पाहूया.
जाहिरात लेखनाचे मुख्य मुद्दे – Advertisement Writing Tips
- Advertisement Writing करतांना कमी पण प्रभावी शब्दांचा वापर करावा.
- जाहिरात नेमकी कशाची आहे हे ठळकपणे आणि आकर्षकरीत्या मांडल्या गेले पाहिजे.
- वस्तू, सेवा इत्यादीविषयी जाहिरातीत लक्ष वेधून घेणारे शब्द हवे जसे कि, ‘जबरदस्त ऑफर’, ‘बंपर सेल’, ‘एकावर एक फ्री’, ‘50%सूट’, ‘आजच या आजच न्या’ इत्यादी.
- ग्राहकांची आवड, बदलणारी फॅशन्स आणि गरज पाहून जाहिरात लेखन करावे.
- आजकाल लोकं घरपोच सुविधेला फार प्राधान्य द्यायला लागले आहेत त्यामुळे जाहिरात लेखन करतांना ती सुविधाही तुम्ही (शक्य असेल तर) त्यात ठळकपणे मांडू शकता.
- माहिती व तंत्रज्ञानाच्या या जगात आपण सोशल मिडिया चा उपयोग करून घेतही आपण जाहिरात लेखन करू शकतो. त्याला आपण डिजिटल जाहिरातही म्हणू शकतो.
- Advertisement Writing करतांना जाहिरातीत साजेशी एखादी मनाला भावेल अशी ओळ, स्लोगन इत्यादी असावे उदा. एख्याद्या विवाह नोंदणी संस्थेविषयीच्या जाहिरातीत संबंधित संस्थेचे नाव टाकून तुम्ही ‘मनाला जोडणारी माणसे’ अशी ओळ टाकू शकता. त्यानंतर त्यांचा संपर्क व इत्यादी माहिती.
- जाहिरात लेखन करतांनाचा ट्रेडमार्क किंवा लोगोचा वापर तुम्ही करू शकता.
- Advertisement Writing झाल्यानंतर ती पुन्हा एकदा वाचून, तपासून पहा जेणे करून चुका टाळता येतील. व्याकरणाची चूक असेल तर लोक सहसा त्या जाहिरातीकडे दुर्लक्ष करतात.
जाहिरात लेखन उदाहरण- Advertisement Writing Examples
समजा तुम्हाला एखाद्या अगरबत्तीच्या उत्पादनाचं जाहिरात लेखन करायचे आहे, तर तुम्हाला त्या उत्पादनाची गुणवत्ता, वजन, किंमत, संपर्क इत्यादी बाबींकडे तुम्हाला लक्षात घेऊन जाहिरात लेखन करावे लागेल.
जसे,
- वेगवेगळे सुगंध उदा.- चंदन, मोगरा, केवडा, गुलाब ई. माहिती लिहावी.
- त्यानंतर वजन जर जास्त देत असाल तर इतके टक्के जास्त (Extra) असे ठळक लिहावे.
- एकावर एक मोफत असेल तर ते ठळक नमूद करावे.
- किमतीत काही सूट असेल तर तेही नमूद करावे.
अशाप्रकारे मुद्देसूदपणे तुम्ही जाहिरात लेखन करू शकता.
आजच्या काळात जाहिरात हे ग्राहकांपर्यंत वस्तू, सेवा आणि इत्यादी बाबी पोहोचविण्याचे सशक्त माध्यम बनले आहे.
जहिरात लेखन या विषयावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Advertising Writing
उत्तर: लक्ष वेधून घेण्याचे कार्य करणे म्हणजे “जाहिरात” करणे होय. वस्तू व सेवांची मागणी निर्माण करणारी कला म्हणजे जाहिरात होय.
उत्तर:
1. कमी पण प्रभावी शब्दांचा वापर.
2. जाहिरातील शब्द हे लक्षवेधक असायला हवे.
3.ग्राहकांची आवड, बदल, फॅशन्स इत्यादी बारकाव्यांवर लक्ष.
उत्तर:
1. लेखी जाहिरात
2. तोंडी जाहिरात.