Korigad Fort
महाराष्ट्र हे राज्य विविध परंपरा संस्कृतींनी नटलेलं राज्य आहे. नद्या, तलाव, सरोवरे, समुद्र सह्याद्रीसारख्या डोंगर रांगा आणि अशाच डोंगर रांगांवर असनारे गड, किल्ले, लेण्या हे महाराष्ट्र राज्याचं वैशिष्ट.
शिवाजी महाराजांपासून अनेक राजांनी महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांची बांधणी केली. काही किल्ले तर अशा प्रकारे बांधण्यात आले आहेत कि, त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तर आपण आजच्या लेखात अशाच एका किल्ल्याविषयी माहिती पाहणार आहोत. ज्याचं नाव आहे कोरीगड किल्ला.
कोरीगड किल्ला – इतिहास – Korigad Fort Information in Marathi
या किल्ल्याच्या इतिहासाविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अशी माहिती समोर येते कि, १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. १६६५ मध्ये ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी ठरविल्याप्रमाणे महाराजांना २३ किल्ले औरंजेबाला द्यावे लागले. पण त्या मध्ये कोरीगड किल्ला नव्हता यावरून महाराजांच्या लेखी या किल्ल्याचे किती महत्व होते ते आपणास दिसून येते.
- या परिसरामध्ये कोळी लोकांची कोरी नावाची पोटजात राहते म्हणून या नावामुळेच या किल्ल्याला कोरीगड हे नाव पडले.
- १८१८ मध्ये इग्रजांनी या किल्ल्यावर हल्ला करून येथील दारू गोळा उध्वस्त केला होता. या किल्ल्यावर मराठा आणि इंग्रज सलग तीन दिवस युद्ध सुरु होते पण शेवटी इग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
भौगोलिक माहिती – Korigad Fort History
- हा किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या डोंगर रांगावर आहे. कोरीगड हा किल्ला कोराईगड, शहागड या नावाने देखील ओळखल्या जातो.
- समुद्रसपाटीपासूनची उंची – ३०५० फुट १५ व्या शतकामध्ये ह्या किल्ल्याची स्थापना करण्यात आली.
- शत्रूंच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी भक्कम अशा तटबंदीची उभारणी केली आहे. गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे.
- दगड आणि चुनखडी पासून या किल्ल्याची बांधणी केली आहे. जमिनीपासून सुमारे ९५० फुट उंचीवर हा किल्ला बांधण्यात आला आहे.
- किल्ल्यावर चढण्यासाठी सुमारे ६०० पायऱ्या आहेत.
किल्ल्यावरील काही पाहण्यासारखी ठिकाणे – Korigad Fort Tourist Places
- किल्ल्याकडे जातांना वाटेवर गणेशाचे छोटेसे मंदिर लागते.
- किल्ल्यावर चढताच किल्ल्याचे महाद्वार आपल्याला लागते याच महाद्वारातून किल्ल्यात प्रवेश करावा लागतो.
- कोरीगड किल्ल्यावर एक टाकेही आपणास पाहायला मिळते. ज्याला गणेश टाकेही म्हणतात. त्यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी याच टाक्याचा वापर करण्यात येत असे.
- तसेच वर आपणास कोराई देवीचे तसेच हनुमानाचे मंदिर पहावयास मिळते. किल्ल्यावर आपल्याला प्राचीन काळातील एक तोफही पहावयास मिळते.
- किल्ल्याच्या पठारी भागावर गेल्यानंतर एक ध्वजस्तंभ आपल्याला दिसून येतो. परंतु आता बऱ्याचश्या वास्तूंचे केवळ अवशेषच शिल्लक असल्याचे आपल्याला दिसतात.
कोरीगड किल्यापर्यंत कसे जाल – How to reach Korigad Fort
- तुम्ही मुंबई किंवा पुण्याहून लोणावळ्याला येऊ शकता. लोणावळ्यापासून २० की.मी. अंतरावर हा किल्ला आहे.
- किल्ला चढण्यासाठी १ ते २ तास लागतात.
कोरीगड किल्ला पाहण्याची उत्तम वेळ – Korigad Fort Best Time to Visit
- किल्ला पाहण्यासाठी सप्टेबर ते मार्च हा काळ चांगला मानला जातो. ज्यांना थ्रील अनुभवायचा असेत ते पावसाळ्यातही या किल्ल्याला भेट देऊ शकतात.
जर तुम्हाला गड-किल्ल्यांना भेट देण्याची आवड असेल तर एकदा नक्कीच कोरीगड किल्ल्याला भेट द्या..!कोरीगड किल्ल्याविषयीचा हा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.
कोरीगड किल्ल्याविषयी विचारल्या जाणारे प्रश्न – FAQ About Korigad Fort
उ. या परिसरात असलेल्या कोळी लोकांच्या कोरी या पोटजातीच्या नावावरून हे नाव पडले.
उ. ३०५० फूट.