Marathi Slogans on Global Warming
जागतिक तापमानवाढीने (ग्लोबल वार्मिंग) आज उग्र रूप धारण केलं आहे, यामुळे मानवी जीवनाच्या अस्तित्वावरचा धोका सतत वाढत चालला आहे. पृथ्वीचे तापमान मोठया प्रमाणात वाढल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पाण्याची परिस्थीती तर दिवसेंदिवस वाढतेच आहे कुठे अति पाण्यामुळे महापुरासारखी परिथिती तर कुठे कोरडा दुष्काळ. ग्लोबल वार्मिंग च्या समस्येमुळे फक्त मनुष्यच नाही तर पृथ्वीवरील समस्त जीव जंतुंवर, झाडांना मोठया प्रमाणात नुकसान पोहोचले आहे.
जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या दुष्परीणामांबाबत लोकांना वेळीच जागरूक केले नाही तर भविष्यात याचे फार गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागु शकतात. म्हणुन या दिशेने कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे तसच या प्रती जनतेला जागे करण्याची देखील गरज आहे जेणेकरून ग्लोबल वार्मिंग च्या समस्येपासुन मुक्तता व्हावी आणि वातावरणातील संतुलन कायम रहावे.
आज आम्ही या पोस्ट मधे आपल्याकरीता ग्लोबल वार्मिंग विषयावर स्लोगन्स् उपलब्ध करून देत आहोत ज्यामुळे आपण जागतिक तापमानवाढीवर प्रतिबंध घालण्याकरीता जागरूक व्हाल. जार आपण या स्लोगन्स्ला सोशल मिडीयावर शेयर केले तर अन्य लोक देखील या समस्येकडे गांभीर्याने पाहातील आणि असा कुठलाही प्रकार करणार नाही ज्यामुळे जागतिक तापमान वाढेल आणि गंभीर समस्या जन्म घेतील…..
ग्लोबल वार्मिंग वर घोषवाक्य – Marathi Slogans on Global Warming
“हिरवे हिरवे गार गालिचे हरीत तृणांच्या मखमालीचे” ही केवळ कविता न राहाता सृष्टी हिरवीगार व्हायलाच हवी, तेव्हांच वाढणारे जागतिक तापमान कमी होईल.
जागतिक तापमानवाढ हा चिंतेचा विषय, याला थांबविण्याचा आता करूया निश्चय.
निसर्गाशी नाते जोडुया, ग्लोबल वाॅर्मिंगला दुर पळवुया.
ग्लोबल वार्मिंग समस्येचे गांभीर्य लक्षात घ्या भरपुर झाडे लावण्याचे तुम्ही मनावर घ्या.
विजेची बचत करून देखील आपण, पर्यावरणाचे तापमान नियंत्रणात ठेवु शकता.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जागतिक तापमानात कमालीची वाढ, विज्ञान शाप की वरदान? हाच खरा प्रश्नं आहे.
वाढत्या तापमानामुळे पिघळतायेत बर्फाचे डोंगर, ग्लोबल वाॅर्मिंग मुळे होणारा थांबवा हा कहर.
पर्यावरणाशी खेळ मांडल्यास निसर्ग देखील कोपे, निसर्गाशी नाते जडता जगणे होई सोपे.
प्रकृतीचा ठेवा मान पर्यावरणाचा करा सन्मान, तेव्हांच थांबेल ग्लोबल वाॅर्मिंगचे थैमान.
निसर्गाचा आपण राखायला हवा मान, ग्लोबल वाॅर्मिंग रोखण्याचे चालवा अभियान.
पृथ्वीवरील हिरवळ पाहुन सृष्टी देखील सुखावत, जागतिक तापमान वाढीने मात्र प्रत्येकाला दुःख होते.
जागतिक तापमानवाढ नक्की थांबेल जेव्हां प्रत्येकाच्या हातुन झाड लागेल.
पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
ज्यावेळी मोठया संख्येने झाडे लागतील, वाढत्या तापमानाचे दिवस आपोआप निघुन जातील.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उष्णता वाढली आहे, वाढती उष्णता जागतिक तापमानावाढ घेउन आली आहे.
बर्फ वितळल्याने येतायेत नद्या नाल्यांना पुर, निसर्गापासुन आपण का जातोय दुर दुर?
ग्लोबल वाॅर्मिंग नावाचा राक्षस दुरू सारू, प्रत्येक माणसाच्या मनात जागरूकता पसरवु.
चांगले आणि सद्विचारी लोक एकत्र येऊया, ग्लोबल वाॅर्मिंग थांबवण्यात पुढाकार घेऊया.
ग्लोबल वाॅर्मिंग चा धोका लक्षात घ्या, पर्यावरण सुरक्षेची जवाबदारी खांद्यावर घ्या.
पर्यावरणाला हानी पोहोचेल असे कृत्य मी करणार नाही, जागतिक तापमान वाढवण्यात माझा सहभाग असणार नाही.
वीज बचतीचा मंत्र ध्यानी धरा, पर्यावरणाला जपा निसर्गाचा हात धरा.
जागतिक तापमानवाढीवर तुम्हाला कधीच कुणी बोलणार नाही, विचारेल ती फक्त येणारी पिढी…
सावध व्हा! जागतिक तापमानवाढीने काय काय घडेल? आपल्या निष्काळजीपणाला पुढची पिढी बळी ठरेल.
एक भिषण सत्य, जागतिक तापमान याच वेगाने वाढत राहिल्यास लोकसंख्या झपाटयाने कमी होईल.