Dhanya Dhanya Ho Pradakshina Lyrics
आपण नेहमी मंदिरात गेल्यानंतर आपली आजी, आई किवा वडीलधारे लोक आपल्याला नेहमी प्रदक्षिणा घालायला सांगतात प्रदक्षिणा हा षोडशोपचारातील एक संस्कार आहे. देवळाभोवती, मूर्तीभोवती, गाभाऱ्याभोवती उजवीकडून डावीकडे गोल फिरणे म्हणजे प्रदक्षिणा होय. आज आम्ही या लेखात तुमच्यासाठी दत्त गुरूंची प्रदक्षिणा घेवून आलो आहोत, चला तर मग बघूया…
“धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची” दत्त गुरूंची प्रदक्षिणा – Dhanya Dhanya Ho Pradakshina Lyrics in Marathi
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची।
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची।। धृ.।।
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी।
सर्वही तीर्थे घडली आम्हा आदिकरुनि काशी।। १।।
मृदुंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाती।
नामसंकीर्तने ब्रह्मानंदे नाचती।। २।।
कोटि ब्रह्महत्या हरिती करितां दंडवत।
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात।। ३।।
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमानिगमांसि।
अनुभव जे जागति ते गुरुपदिचे अभिलाषी।। ४।।
प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला।
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला।। ५।।