Unity Slogans in Marathi
कुठल्याही देशाचा आधार हा सामाजिक एकतेत सामावलेला असतो. या एकतेमुळे देशातील शांतता कायम राहाते. देशाचा विकास, सुख समृध्दी या एकतेमुळे सामाजिक सलोख्यामुळे कायम राहाते.
वर्षानुवर्ष गुलामगिरीत असलेल्या भारताला वीर स्वातंत्र्य सैनिकांनी एकतेच्या बळावरच स्वातंत्र्य मिळवुन दिले. या राष्ट्रीय एकतेला पाहुनच ब्रिटीशांना भारत सोडुन पळुन जावे लागले.
एकतेचे महत्व आपण जाणले पाहिजे आणि आजच्या तरूण पिढीत एकत्र आणि सर्वधर्म समभावाने राहाण्याची प्रेरणा रूजवायला हवी.
या पोस्ट मधे आम्ही आपल्याकरता सांप्रदायिक एकतेवर आधारीत काही स्लोगन्स् उपलब्ध करून देत आहोत. यांना वाचुन तुमच्यात देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्याची भावना उत्पन्न होईल. या स्लोगन्स् ना जर आपण सोशल मिडिया साईट्स वर शेयर केले तर इतर लोकांमधे देखील एकजुटीने राहाण्याची भावना वाढीस लागेल देशाच्या विकासाकरता हे एक चांगले पाऊल ठरेल.
सांप्रदायिक एकतेवर घोषवाक्य – Unity Slogans in Marathi
विविधतेत एकता हीच आपल्या भारताची शान, प्रत्येक देशवासीयाला येथे सारखा मिळतो सन्मान.
आपण एक आहोत ही भावना प्रत्येक भारतियाच्या अंगी भिनायला हवी, आपली एकी पाहुन शत्रुला पळता भुई थोडी व्हायला हवी.
जो देश कायम एकतेने राहाण्याचा निश्चय करतो, त्या देशाचे परकिय शक्ती काहीही बिघडवु शकत नाही.
आपला देश एकतेचे उदाहरण बनायला हवा, आपल्या देशाचा आपण सन्मान करायला हवा.
सर्व धर्मांचा आदर करणे हे केवळ भारतीय संस्कृतीच शिकवते.
आपल्या भारत देशाच्या या तीन गोष्टी आपण प्राणापलीकडे जपुया, राष्ट्रध्वज, राष्ट्रभाषा आणि राष्ट्रमान.
जो देश जात धर्म पंथ याच्या पुढे जाऊन विचार करतो, तो देश सतत प्रगतीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत असतो.
आपण सगळे शिक्षीत झाल्यास आपल्यात फुट पाडणारे कधीही यशस्वी होणार नाहीत.
सामाजिक एकता हा विकासाचा मुलमंत्र आहे, यात आपल्या देशाचे हित सामावलेले आहे.
हिन्दु मुस्लिम शिख ईसाई आपण नंतर आहोत, आधी आपण एक आहोत आपण भारतिय आहोत.
जगाला नव्याने आपल्या भारताची ओळख व्हायला हवी, प्रत्येक भारतियाने अखंडतेची ज्योत मनात पेटवायला हवी.
आपली बोली आपली भाषा जरी वेगळी असली तरी देखील, आपण एक आहोत आपण भारतिय आहोत.
बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना, भारतात समानतेने वागणुक मिळावी सर्वांना.
परदेशातील नागरिक आपल्या भारतातील अखंडता एैक्य पाहुन सद्गदीत होतात हे एैक्य ही अखंडता आपण टिकवायला नको का?
गौतम बुध्द महात्मा गांधींचा हा देश, सर्वांना देतो एकतेचा संदेश.
भारत माझा देश आहे सारे भारतिय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे, ही केवळ प्रतिज्ञा न राहाता जगतांना आपली विचारसरणी असायला हवी.
एकतेची शक्ती न ओळखणारा आपल्या जीवनात कधीही प्रगती करू शकत नाही.
आपल्या भारत देशात पहायला मिळते विविधतेत एकता, सर्व धर्मियांनी पाळली आहे एकी आणि समानता.
अनेकतेत एकता ही आपल्या भारताची विशेषता.
संपुर्ण मानवजातीने एकतेचा पाठ मुंग्यांकडुन शिकावयास हवा.
जात धर्म प्रांत भाषा यातुन बाहेर पडुया, आता आपण नवा भारत घडवुया.
एकमेकांप्रती आपल्या हृदयात असलेली बंधुभावाची भावना, आपला देश सुशिक्षीत आणि सुसंस्कृत असल्याची खुण आहे.
आपल्या हितासोबत दुसऱ्याच्या हिताचा विचार करणे, म्हणजे देशाला प्रगतीच्या शिखरावर नेणे होय.
आपला भारत देश शांततेची उन्नतीची आणि पे्रमाची बाग बनायला हवा.
Read More:
लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Unity Slogans In Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्