Taras Animal in Marathi
कोल्हा, लांडगा वगैरेंसारखा तरस हा जंगली प्राणी होय.
तरस प्राणी माहिती मराठी – Taras Information in Marathi
हिंदी नाव : | लकडबग्धा |
इंग्रजी नाव : | Hyena Karan |
तरसाला चार पाय, दोन डोळे असतात. मानेवर लहानसर आयाळ असते. अंगावरही केस असतात. गळ्याखाली थोडे-लांब केस असतात. त्याची शेपटी केसाळ असते.
तरस प्राण्याचे खाद्य – Taras Foods
तरस मांसाहारी आहे. तरस वाघ व सिंह या प्राण्यांनी खाऊन उरलेल्या मांसावर उपजीविका करतो.
वैशिष्ट्ये:
तरसाचे मागचे दोन पाय वाकलेले असतात; त्यामुळे तो खुरडत चालल्यासारखा वाटतो. हा प्राणी स्वत:हून कोणत्याही प्राण्याची शिकार करत नाही.
इतर माहिती :
तरस हा एक सस्तन प्राणी आहे. हा प्राणी दिसायला साधारण, रंगाने काळा असतो, भारतातील तरसाच्या अंगावर काळे पट्टे; तर आफ्रिकन तरसाच्या अंगावर गोलाकार खुणा असतात.
या प्राण्याचे मागचे पाय कमकुवत असल्यामुळे त्याला अजिबात पळता येत नाही. तरसाचा जबडा खूप भक्कम असतो त्यामुळे तो प्राण्यांची हाडेसुद्धा कडाकडा मोडून खातो. या प्राण्याला जनावराचे नासके-कुजके मांसदेखील चालते.
त्याच्या खाण्यापिण्याच्या घाणरेड्या सवयींमुळे पर्यावरण मात्र स्वच्छ राहते. तरस कोल्ह्याप्रमाणे ‘कुई कुई’ असा आवाज करतो; तर कधी खदाखदा हसतो.
हा प्राणी माणसाळलेला असेल तर विश्वासू कुत्र्याप्रमाणे घराची राखणही करता.