Vitamin B1 chi Mahiti
जीवनसत्त्व ब१, ला सर्वसाधारणपणे थायमाईन (thiamin) असे म्हणतात. जीवनसत्त्व ब१, हा एक जीवनसत्त्व ब चा भाग आहे आणि हा सर्वांत महत्त्वाचा का आहे.
जीवनसत्त्व ‘ब1’ ची माहिती – Vitamin B1 information in Marathi
इंग्रजी नाव : Vitamine B1
याचे अनेक प्रकार आहेत; ते म्हणजे ब१, ब२, ब५,ब१२..
मिळणारे अन्न घटक – Vitamin B1 Foods in Marathi
दूध, बटाटा, बकऱ्याची कलेजी, मका, गहू, बाजरी, सोयाबीन, टूना (Tuna), सूर्यफुलाच्या बिया, मटार, तीळ (Sesameseed), शतावरी (Asparagus).
जीवनसत्त्व ब१ मुळे शरीरास उपयोग – Vitamin B1 Benefits in Marathi
जीवनसत्त्व ब१, तुमच्या शरीरासाठी काय करते?
- शरीराची ऊर्जा कायम राखते,
- शरीराचा चेतासंस्थेशी योग्य तो समन्वय राखतो,
- स्नायूंना बळकटी देतो,
- हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू ठेवण्यास मदत करतो.
जीवनसत्त्व ब१ च्या उणिवेमुळे होणारे आजार – Vitamin B1 deficiency in Marathi
- सर्वप्रथम जीवनसत्त्व ब१ च्या कमतरतेमुळे तुमच्या शरीराची ऊर्जानिर्मिती ढासळते. उर्जेमुळेच शरीराचे सर्व अवयव कार्य करत असतात. ती यंत्रणा ढासळली तर त्यांच्या कार्यावर दुष्परिणाम होतात. त्याचेच पहिले लक्षण म्हणजेच मळमळणे, जेवणाची वासना न होणे; त्यामुळे शरीर मरगळून जाते आणि खूप आजारी असल्यासारखे वाटते.
- स्नायूंना ताठरता येणे. म्हणजे स्नायू घट्ट होणे,
- चेतासंस्थेचे काम व्यवस्थित न होणे, या संस्थेद्वारेच आपणास संवेदना होत असते.
- पचनसंस्था योग्य रीतीने काम करत नाही. बद्धकोष्ठता, अपचन यांसारखे आजार होतात.
- गुडघा व घोटा यांच्यामधला भाग म्हणजेच पोटऱ्यांना गोळा येणे, स्नायू घट्ट होणे हा त्रास होतो.
- चेतासंस्थेशी निगडित होणारे आजार; जसे संवेदना न होणे, बधिरता येणे, विस्मरण होणे. उदा. पिन किंवा टाचणी टोचल्यास संवेदना न होणे.
- अचानक वजन कमी होणे,
इतर माहिती:
जीवनसत्त्व ब१, म्हणजे काय? – Vitamin B1 in Marathi
जीवनसत्त्व ब१ कमतरतेमुळे बेरीबेरी (Beriberi) नावाचा आजार होतो. बेरीबेरी म्हणजे प्रचंड प्रमाणात अशक्तपणा येतो. हा आजार 19 व्या व 20 व्या शतकात आशिया खंडात पुष्कळ प्रमाणात झाला होता, असे पाहण्यास मिळते.
यामध्ये रोग्याला स्नायूमध्ये अशक्तपणा वाटणे, ऊर्जा नसणे, उत्साह न वाटणे इत्यादी लक्षणे जाणवतात. हे टाळण्यासाठी द्विदल धान्ये खावीत, दूध, बटाटा, मटार यांच्या योग्य सेवनाने जीवनसत्त्व ब, शरीराला योग्य प्रमाणात मिळते.
मद्य पिणाऱ्या लोकांमध्ये जीवनसत्त्व ब१ ची कमतरता झाल्यास किंवा त्यांना बेरीबेरी हा आजार झाल्यास खूप शारीरिक हानी होते.
जीवनसत्त्व ब१, ने ऊर्जानिर्मिती कशी होईल?
शरीरातील पेशी या ऊर्जेसाठी शरीरातील साखरेवर अवलंबून असतात. जेव्हा ऑक्सिजन त्या साखरेला ऊर्जेमध्ये रूपांतरित करतो तेव्हा ऊर्जा निर्मिती होते. यालाच विज्ञानाच्या भाषेत ‘अॅरोबिक एनर्जी प्रॉडक्शन’ (Aerobic energy production) असे म्हणतात. ही सगळी क्रिया जीवनसत्त्व ब१, शिवाय होऊच शकत नाही. म्हणूनच याला संप्रेरकाची क्रिया (Enzyme system) म्हणतात.
जीवनसत्त्व ब१, चेतासंस्थेला कशा प्रकारे मदत करते?
जीवनसत्त्व ब१, चेतासंस्थेला मदत करणारा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शरीरातील चेतापेशींना सांभाळण्याचे किंवा त्यांना संरक्षण देण्याचे किंवा कवचासारख्या असलेल्या आवरणाचे काम करते. (myelin sheaths) जीवनसत्त्व ब१, कमी असल्यास हे आवरण कमकुवत होते व तुटण्याची, फुटण्याची शक्यता असते. दुखणे, ताबडतोब होणारी संवेदना ही याच्यामुळे मिळत नाही.
2) दुसरे म्हणजे जीवनसत्त्व ब१, व चेतासंस्था यांच्यातला संबंध म्हणजे माहितीची देवाण-घेवाण करणे.(Neurotransmitter)
उदा. हाताला चटका बसला ही संवेदना मेंदूपर्यंत जाणे व तिथून हात बाजूला करणे ही प्रतिक्रिया होणे. या अतिशय पटकन होणाऱ्या क्रिया असतात. अन्न शिजवताना,साठवणूक करताना हे जीवनसत्त्व स्वयंपाकात टिकविण्यासाठी घ्यावयाची काळजी किंवा अन्नातून जीवनसत्त्व ब, कसे मिळवावे?
जीवनसत्त्व ब, हा घटक खूप काळ अन्नात टिकून राहणारा नाही, अन्न गरम केल्यास ते लवकर नाश पावत. एकदल धान्यात तो खूप प्रमाणात साठविलेले असते. हे खूप काळ फ्रिजमध्ये ठेवू नये; नाही तर ते नाश पावते.
सर्वसाधारणपणे अन्नातून मिळणारे जीवनसत्त्व ब, – Vitamin B1 Foods
शतावरी (Asparagus) | 1 वाटी (कच्चे) | 0.19 mg | 12.7% |
मटार | 1 वाटी (कच्चे) | 0.36 mg | 24% |
पालक | 1 वाटी (शिजवलेला) | 0.17 mg | 11.3% |
आळंबी (Mushrooms) | 1 वाटी | 0.08 mg | 5.3% |
सूर्यफूल बिया | 1/4 वाटी | 0.52mg | 34.7% |