Bhima Nadi
सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झाला. भीमा नदी पुढे कृष्णा नदीस मिळते. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे.
भीमा नदीची माहिती – Bhima River Information in Marathi
नदीचे नाव | भीमा |
उगमस्थान | भीमाशंकर, जि. पुणे, (महाराष्ट्र) |
उपनद्या | इंद्रायणी, मुळा, मुठा, नीरा, माण, घोड, सीन |
नदीची लांबी | 861 कि.मी. |
नदीच्या खोऱ्याचा आकार | 70614 चौरस किमी. |
नदीवरील प्रकल्प | उजनी धरण (यशवंतसागर), ता. माढा, जि. सोलापूर (महाराष्ट्र) |
सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांमध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम आहे. भीमा नदी पुढे कृष्णा नदीस मिळते. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे.
भीमाशंकर येथे एक हजार मीटर उंचीवर उगम पावल्यावर ती वाहत-वाहत सपाट प्रदेशात येते. पूर्ववाहिनी असलेली भीमा नदी महाराष्ट्रात साडेचारशे किलोमीटर वाहून पुढे कर्नाटक राज्यातील रायचूर येथे कृष्णा नदीस मिळते.
दक्षिणेकडील महादेवाचे डोंगर व उत्तरेकडील बालाघाटचे डोंगर यांच्यामधील प्रदेशात भीमा नदीचे खोरे पसरलेले आहे.
मुळा-मुठा, भामा, इंद्रायणी, माण, घोड आणि सीना या नद्या येऊन मिळाल्याने भीमेचे पात्र रुंद होत गेले आहे. उगम पावल्यापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरापर्यंत भीमा अरुंद पात्रातून वाहते. प्रथम भीमा नदी मिळाल्यानंतर तुळापूरजवळ इंद्रायणी नदी भीमेस मिळते.
मुळा-मुठा रांजणगावाजवळ मिळतात; तर पुढे घोड नदीही भीमेच्या भेटीस येऊन तिच्यात विलीन होते. भीमेचा पुढील प्रवास पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून होतो.
नंतर तिला नीरा नदी नरसिंहपूर जवळ येऊन मिळते. अनेक नद्यांचे पाणी पोटात घेऊन भीमा सोलापूर जिल्ह्यातून वाहत-वाहत पंढरपूरला येते.
पंढरपुरात या नदीचा आकार चंद्रासारखा दिसतो त्यामुळे येथे तिला चंद्रभागा असे म्हणतात.
याच भीमेच्या (चंद्रभागेच्या) तीरी विठ्ठल रुख्मिणी मंदिर आहे. या ठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रभरातून लोक दर्शनासाठी येत असतात.
सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करताना भीमा नदीला सीना नदी येऊन मिळते.
इंदापूरजवळ भीमा नदीवर ‘उजनी’ नावाचे मोठे धरण बांधण्यात आले आहे.
या धरणामुळे सिंचन, पिण्याचे व उद्योगासाठी पाणीपुरवठा या सोबतच मत्स्यपालन आणि इ. लाभ या धरणाच्या माध्यमातून मिळतात. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांना शेतीच्या सिंचनासाठी चांगलाच फायदा झालेला आहे.
या धरणाला सुमारे शंभरपेक्षा जास्त किलोमीटर लांबीचे डावा-उजवा कालवा दोन्ही तीरांवरून काढला आहे.
त्यामुळेच या परिसरात जणू समृद्धीची गंगाच भीमेच्या पाण्याच्या रूपाने येऊन शेतकऱ्यांची भाग्यदायिनी ठरली आहे.
भीमा नदी विषयी विचारले जाणारे काही प्रश्न – FAQ About Bhima River
उत्तर: भीमाशंकर, ता. आंबेगाव, जि. पुणे.
उत्तर: उजनी (यशवंतसागर), ता. माढा, जि. सोलापूर.
उत्तर: पुणे, सोलापूर, अहमदनगर.
उत्तर: चंद्रभागा.
उत्तर: कृष्णा नदी.
उत्तर: कर्नाटक.