Benefits Of Cumin Seeds
आपल्या सर्व गृहिणींना स्वयंपाकात परिचयाचे असणारी महत्त्वाची जिन्नस म्हणजे जिरे होय, जिऱ्याचे स्वयंपाकात जसे महत्त्वाचे स्थान आहे, तसेच जिरे हे औषधी म्हणूनही उपयोगात आणले जातात. जिरे याचा अनेक पदार्थामध्ये विशेष करून वापर केला जातो. तसेच याचा आणखी कोणकोणत्या प्रकारे वापर होतो, आणि औषधी मध्ये याचा कसा उपयोग केला जातो. अशी बरीच माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूया.
जिऱ्याची माहिती आणि फायदे – Jeera Benefits in Marathi
शास्त्रीय नाव : | (क्युमिन सायमिनियम) Cumin cyminium |
इंग्रजी नाव : | 3 नवंबर 1933, शांति निकेतन, कोलकता |
जिऱ्याचे झुडूप सर्वसाधारणपणे दीड ते दोन सें.मी. उंच वाढते. तसेच या झाडाला अनेक फांदया असतात व याची पाने दोऱ्यासारखी उंच उंच असतात. याची फुले पांढरट गुलाबी रंगाची असतात. आणि ती फुले छोटी छोटी असतात. ती झुपक्याने येतात, त्या झुपक्याच्या देठाला जी फळे येतात. त्यात जिरे असतात. आणि या जिऱ्याची काढणी हातानेच करावी लागते.
जिरे छोटे छोटे, मधे फुगीर व दोन्ही बाजूने अरुंद व निमुळते असतात. यांचा रंग पिवळसर राखाडी असतो. आणि तसेच याची चव तुरट व गोडसर असते. जिऱ्याची फुले उमलण्यासाठी सर्वसाधारणपणे २५ ते ३० सें.ग्रे. तापमान लागते. त्यामुळे उन्हाळ्यात ही फुले उमलतात.
तसेच या वनस्पतीची वाढ समशीतोष्ण हवामानात होते. आणि जमीन कमी कसदार स्वरूपाची असली तरी चालते. जिऱ्याचे पीक हे थोड्याश्या पाण्यावर सुद्धा काढले जाते. तुर्कस्तान, हिंदुस्थान, पाकिस्तान मध्ये याचे उत्पादन घेतले जाते.
जिऱ्याचे औषधी उपयोग – Jeera Uses
जिऱ्याचे स्वयंपाकात जसे महत्त्वाचे स्थान आहे, तसेच औषधी मध्ये सुद्धा जिरे हे फार उपयोगात आणले जातात.
- आपल्याला उष्णतेचा त्रास होत असेल तर आदल्या दिवशी रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून, त्यात जिरे घालून ते पाणी सकाळी उठून घेतल्यास आराम मिळतो.
- तसेच आणखी अपचन झाले तर बडिशेप व जिऱ्याची पूड खावी म्हणजे ज्यानेकरून हा त्रास कमी होण्यास मदत होते.
- तसेच जिऱ्याचे तेल सुद्धा काढले जाते; आणि त्याचा उपयोग औषध म्हणून केला जातो.
- त्याचप्रमाणे उष्णतेचे विकार कमी होण्यासाठी जिऱ्याचे सेवन करणे हितकारक ठरते.
- पित्तनाशक, दाहनाशक, वातनाशक म्हणून जिऱ्याचा उपयोग केला जातो.
- गरोदर स्त्रियांना उष्णतेचा त्रास होत असेल तर जिऱ्याचे पाणी पिण्यास दयावे म्हणजे ज्यानेकरून त्या स्त्रीला उष्णतेचा त्रास हा कमी होण्यास मदत होते.
- गाजराचा ज्यूस, टोमॅटो सूप, पालक सूप तयार करताना पाचक म्हणून जिऱ्याच्या पूडचा वापर केला जातो.
- तसेच अनेक पदार्थात स्वादासाठी जिरे व मिरे यांची पूड वापरतात.
इतर माहिती :
स्वयंपाकात आवश्यक असणारे जिरे हे भाजी, आमटी, पोहे, कढी, खिचडी वगैरे पदार्थ करताना फोडणीसाठी वापरतात.
तसेच धने व जिरे यांची पावडर करून ती भजी, वडे, पातळ भाजी करताना वापरली जाते. त्यामुळे पदार्थांना अतिशय सुंदर अशी चव येते. आणि पदार्थ हे रुचकर बनतात.
टोमॅटो सूप, सॅलड, कोशिंबीर वगैरे पदार्थ करताना नुसती जिऱ्याची पावडर वापरली जाते.
जिऱ्यात लोह भरपूर प्रमाणात असते. तसेच जिऱ्याचा वापर केल्यास आपणास ‘ब’ जीवनसत्त्व मिळते.
विविध प्रकारचे मसाले (कच्चा मसाला, गोडा मसाला, कांदा-लसूण मसाला) तयार करताना सुद्धा जिऱ्याचा वापर करतात. तसेच मेतकूट करताना पण जिऱ्याचा वापर केला जातो.
जिरे विषयीची विचारली जाणारी काही प्रश्न – FAQ About Jeera
1. जिऱ्याचे शास्त्रीय नाव काय आहे ?
उत्तर – जिऱ्याचे शास्त्रीय नाव (क्युमिन सायमिनम) Cumin cyminum हे आहे.
2. जिऱ्याचे उत्पादन हे कोठे केली जाते ?
उत्तर – जिऱ्याचे उत्पादन तुर्कस्तान, हिंदुस्थान, पाकिस्तान मध्ये घेतले जाते.
3. जिऱ्या मध्ये कोणकोणती पोषक घटक असतात ?
उत्तर – जिऱ्या मध्ये लोह भरपूर प्रमाणात असत, तसेच आपणास ‘ब’ जीवनसत्त्व सुद्धा मिळते.