Fox chi Mahiti Marathi
आपणास अनेक रानटी प्राण्यांची नावे माहीत आहेत; त्यात अनेक गोष्टींमधून भेटणारा रानटी प्राणी म्हणजे कोल्हा (Fox) होय. हा प्राणी मासाहारी आणि शाकाहारी दोन्हीप्रकारचे खाद्य खातो. तसेच याला एकटी शिकार करायला आवडते पण तो खुपदा कळपात सुधा पाहायला मिळतो. हा लांडगा यांच्या कुळातील सर्वात छोटा प्राणी आहे.
कोल्ह्याबद्दल अजून बरीच माहिती पुढे बघूया,
कोल्ह्याची माहिती – Fox Information in Marathi
कोल्ह्या ची थोडक्यात माहिती – Fox Animal Information in Marathi
हिंदी नाव : | लोमडी |
इंग्रजी नाव : | Fox |
कोल्ह्याचा रंग पिवळसर, भुरकट, पिंगट असा असतो कोल्ह्याला चार पाय, दोन डोळे व दोन कान असतात. कोल्ह्याचे तोंड डोळे हे कुत्र्यासारखेच असतात. त्याची शेपटी छान झुपकेदार असते.
कोल्ह्याचे खाद्य – Fox Food
कोल्हा हा मांसाहारी, तसेच शाकाहारीही आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसून तो ऊस, काकडी, मका, हरभरा, शेंगा खातो. तसेच कोंबड्या, ससा, शेळ्या, मेंढ्या यांसारख्या प्राण्यांचे मांस पण खातो.
कोल्ह्याची लांबी दोन-तीन फूट व उंची एक ते दीड फट असते. हा प्राणी वेगवेगळ्या रंगांचाही असतो. याचे कान नेहमी उभे असतात. कोल्ह्याची वयोमर्यादा किमान अकरा ते बारा वर्षे असते.
हा मांजरी पेक्षा मोठा आणि कुत्र्या पेक्षा लहान आहे. यांच्या मधील सर्वात मोठी कोल्हयाची प्रजाती रेड फॉक्स आहे. हा जंगलात, शेतात राहतो. कोल्ह्याच्या एकूण २० ते २५ प्रजाती आहेत. कोळ्याचे दात तीक्ष्ण असतात.
कोल्हा धूर्त, लबाड तसेच चतुर आणि आतिशय चपळ प्राणी आहे. त्याची नजर खूप तीक्ष्ण असते.
तसेच तो दिवसा लपून राहतो आणि रात्री शिकार करण्यासाठी बाहेर पडतो. हा ४० ते ४५ किलोमीटर तासाला पळू शकतो.
कोल्हा हा साधारण २ ते ३ वर्ष जगू शकता . कोल्हा हा दर ३० ते ३५ मीटर दूरचा आवाज आईकू शकतो.
हा प्राणी ‘कुँई कुँई’ असा आवाज काढतो, त्याला ‘कोल्हे-कुँई’ असे म्हणतात.
एका कोल्ह्याने आवाज काढला तर त्याच्या मागोमाग सगळे कोल्हे ओरडतात. हा प्राणी कळप किंवा टोळ्या करून राहतो.
दिवसा झाडाझुडपात निवांत झोपतो आणि रात्र झाली की हा शिकारीच्या शोधात बाहेर पडतो.
कोल्ह्याच्या मादीला कोल्हीण म्हणतात. ही जमिनीत खड्डा तयार करून त्यात एका वेळी तीन ते चार पिलांना जन्म देते. त्यांचे पालनपोषण करते.
कोल्ह्याला संस्कृतमध्ये ‘जंबूक’ असे म्हणतात. कोल्हा हा प्राणी श्रीलंका, भारत, दक्षिण-पूर्व युरोप व आशिया येथेही आढळतो.