Nachni Information in Marathi
नाचणी हे धान्य आपल्या सर्वानाच माहिती आहे. जसे ज्वारीची भाकरी होते, तसेच नाचणीची सुद्धा भाकरी होते. आणि ती खायला ही चविष्ट लागते. तुम्हाला माहिती असेल नाचणी पासून अनेक पदार्थ बनविले जातात. नाचणी हे धान्य महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू राज्यामध्ये जास्त प्रमाणात खाल्ले जाते. यामध्ये अनेक पोषणमूल्य असतात. तसेच नाचणी विषयी आणखी काही विशिष्ट माहिती आहे, आणि ते आपण समोर पहाणारच आहोत.
नाचणीचे फायदे – Nachni Benefits in Marathi
नाचणीचे विविध नाव : | ‘फिंगर मिले, ‘रागी’ |
नाचणीचे शास्त्रीय नाव : | लईकॅरिकॅना . |
धाण्याचे प्रकार : | तृणधान्य. |
हंगाम : | खरीप. |
नाचणीचे उत्पादन : | कोकण आणि डांग (गुजरात). |
नाचनीमध्ये असणारी पोषक तत्वे : | या मध्ये कॅल्शियमबरोबर लोह,नायसीन, रीबोफ्लेविन, थायमिन ही पोषकद्रव्य असतात. |
महाराष्ट्रात ज्वारी आणि बाजरीची भाकरी देशभर खाल्ली जाते तर तसेच कोकणात तांदळाची आणि नाचणीची भाकरी खाल्ली जाते. नाचणीला इंग्रजीत ‘फिंगर मिले असं नाव आहे. तसेच कर्नाटकात तिला ‘रागी’ म्हणतात.
नाचणीचा उगम पूर्व आफ्रिकेतील युगांडा येथील आहे असे मानलं जातं लईकॅरिकॅना असं शास्त्रीय नाव असलेल्या नाचणीचे ख्रिस्तपूर्व १८०० मधील अवशेष तुंगभद्रा या नदीच्या काठी सापडले आहेत. तसेच तामिळनाडूमधील पैयंमपल्ली येथेही ख्रिस्तपूर्व १४०० मधले अवशेष मिळाले आहेत.
नाचणी ही जास्त करून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आणि तामिळनाडू आंध्रप्रदेश राज्यांमध्ये खाल्ली जाते. १०० ग्रॅम नाचणीमध्ये साधारण ३२८ उष्मांक असतात. नाचणी मध्ये प्रथिने ही तांदळाएवढी म्हणजे ७ ते ८% असतात. स्निग्ध पदार्थ हे नगण्य असतात. तर तसेच ७०% कार्बोहायड्रेटस् असतात. बऱ्यापैकी तंतू, खनिजे आणि भरपूर कॅल्शियम सुद्धा असतं.
कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्याने ज्या लोकांना त्रास होतो अशांना नाचणी म्हणजे एक वरदान आहे. तांदळाप्रमाणे नाचणीसुद्धा पचण्यासाठी आणि शिजण्यासाठी सुलभ असते. या सर्व कारणासाठी आणि भरपूर कॅल्शियम व तंतूमुळे नाचणी सर्वांसाठीच हितकर समजली जाते.
नाचणीमध्ये मेथायोनिन हे अमीनो आम्ल भरपूर प्रमाणात असतं जे शरीराला अत्यावश्यक असतं म्हणून हेही त्यासाठी एक कारण आहे.
नाचणीची माहिती – Nachni Information in Marathi
नाचणीचे पीठ करून भाकरी बनविता येते. आणि चवीलाही ती छान लागते. पण ती गरम असताना खावी लागते. कारण ती भाकरी थंड झाली की कडक, होते.
नाचणीचा कोंडा काढून टाकून सत्व बनविले जाते. हे सत्व किंवा पीठ दुधात शिजवून खाल्ल्यास शरीराला पोषक असते.
नाचणीचे पीठ नुसतेच पाण्यात शिजवून त्याची आंबिल सुद्धा बनविली जाते. आणि त्यामध्ये ताक घालूनही ती खाल्ली जाते. तसेच ज्वारीप्रमाणे नाचणीचेही पापड बनविता येतात.
आजकाल बाजारात बटाट्यांच्या चिप्सप्रमाणे नाचणीचे चिप्स सुद्धा विकत मिळतात. दक्षिण भारतात नाचणी ही आंबवून त्याचे डोसे सुद्धा बनविले जातात.
कर्नाटकात नाचणीचे पीठ शिजवून त्याचे गोळे बनवितात. आणि त्यांना रागी मुड्डे असं म्हणतात. हे गोळे सांबार, चटणी, तूप याबरोबर खाल्ले जातात.
नेपाळमध्ये तसेच आफ्रिकेत या नाचणीपासून बिअर बनविली जाते. औषध म्हणून नाचणीचा उपयोग बाळंतीणीसाठी केला जातो.
हल्ली भारतातही बालरोगतज्ज्ञ लहान मुलांसाठी कॅल्शियमचा मोठा स्त्रोत म्हणून नाचणीचा उपयोग करायला सांगतात.
बेसनाच्या लाडूंप्रमाणे नाचणीचे सुद्धा लाडू बनविता येतात. नाचणी लवकर खराब होत नाही त्यामुळे तिचं पीठ बरेच दिवस टिकते.
नाचणीच्या पिठाची भाकरी बनवितांना जर त्या पीठा मध्ये गरम पानी घालून भिजविले तर त्याची चांगली भाकरी बनविता येते. नाचणी हे थंड असल्याने खास करून उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाते.
नाचणी बद्दल विचारल्या जाणारे काही प्रश्न – FAQ About Nachni
1. नाचणी कणत्या वेळेस जास्त खाल्ली जाते ?
उत्तर – नाचणी हे थंड असल्याने ती जास्त करून उन्हाळ्यात खाल्ली जाते.
2. नाचणीचे शास्त्रीय नाव काय आहे ?
उत्तर – नाचणीचे शास्त्रीय नाव लईकॅरिकॅना हे आहे.
3. नाचणीमध्ये कोणकोणते पोषक घटक आहेत?
उत्तर – नाचणी मध्ये कॅल्शियमबरोबर लोह,नायसीन, रीबोफ्लेविन, थायमिन ही पोषकद्रव्य असतात.
4. नाचणी हे कोणते धान्य आहे ?
उत्तर – नाचणी हे एक तृणधान्य धान्य आहे.
5. नाचणीचे उत्पादन हे कोठे होते?
उत्तर – नाचणीचे उत्पादन कोकण आणि खानदेशा मध्ये होते. तसेच याशिवाय तामिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, ओडिशा गोवा व बिहार या राज्यांमध्येही याचे उत्पादन होते.