Vinoba Bhave Quotes in Marathi
भारतातील प्रसिद्ध समाज सुधारक विनायक नरहरी भावे ज्यांना आचार्य विनोबा भावे या नावाने ओळखल्या जाते. त्यांनी आपल संपूर्ण जीवन एका संत सारखं व्यतीत केलं. त्यामुळे ते एक महान संत म्हणून प्रसिद्धीस आले. आचार्य विनोबा भावे हे अत्यंत विद्वान आणि विचारशील व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचाराने ते सगळ्यांच प्रभावित करत असत आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी आचार्य विनोबा भावे यांचे प्रसिद्ध विचार घेवून आलो आहोत. ते तुम्हाला नक्कीच आवडतील…
आचार्य विनोबा भावे यांचे महान विचार – Vinoba Bhave Quotes in Marathi
“यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे.”
“विद्येचे चांगले फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार.”
“प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे, प्रेम नसताना जर कोणी सेवा करीत असेल, तर तो व्यापार आहे असे समजावे. “
“जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली तेव्हा त्याने मानवाला तीन पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिला तिसर्या पानावर मृत्यू लिहिला. जे दुसरे पण होते ते कोरे ठेवेले वर काय लिहायचं ते मानवाच्या हातात होत. मानव जसे कर्म करून जगतो ते पण भरत जाते. या दुसऱ्या पानाला जीवन म्हटले आहे.”
Vinoba Bhave Quotes in Marathi
“प्रेम करणे हि एक कला आहे, पण प्रेम टिकवणे हि एक साधना आहे.”
“विचारांचा चिराग विझला, तर आचार आंधळा बनेल.”
“ईश्वर गरीब मनुष्याला गरीब ठेवून त्याच्यात हिम्मत आहे कि नाही ह्याची कसोटी घेत असतो.”
Vinoba Bhave Suvichar in Marathi
“माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत – आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा”
“सेवेसाठी पैशांची आवश्यकता नसते स्व:ताचे संकुचित जीवन सोडण्याची आणि गरिबांशी एकरूप होण्याची गरज असते.”
“कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय त्या कामाला आरंभ न करणे आणि सुरु केलेले काम पूर्ण करूनच हातावेगळे करणे हे बुद्धीचे चांगले लक्षण आहे.”
Vinoba Bhave Thoughts in Marathi
“जोपर्यंत तुम्ही मनावर चांगला ताबा मिळवू शकत नाही, तोपर्यंत तुमचे राग द्वेष नष्ट होत नाही आणि तुमच्या इंद्रीयांवरही तुम्ही ताबा मिळवू शकत नाही.”
“परीश्रमातच मनुष्याची माणुसकी आहे.”
“दोन धर्मामध्ये कधीच संघर्ष होत नाही, सर्व धर्मांचा अधर्माबरोबर संघर्ष होत असतो.”