Datta Bavani Lyrics
श्री दत्त यांच्या पावन चरणाने पवित्र झालेले कर्नाटक राज्याच्या गुलबर्गा जिल्ह्यातील गाणगापूर हे गाव ओळखले जाते ते श्री दत्तात्रेय यांच्या मंदिराकरिता. भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर वसलेल्या गाणगापूर या गावी श्री दत्त यांनी वास्तव्य केले होते. दत्त संप्रदायिक याठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनाकरिता येत असतात.
श्री दत्त यांच्या अवताराचे वर्णन करण्यासाठी बावन्न ओळीच्या स्तोत्राचे लिखाण केले असून, त्यास आपण दत्त बावन्नी म्हणून संबोधतो. आज आपण इथे त्याच दत्त बावन्नी चे लिखाण करणार आहोत.
श्री दत्त बावन्नी – Datta Bavani
जय योगीश्वर दत्त दयाळ। तु ज एक जगमां प्रतिपाळ ।।१।।
अत्र्यनसूया करी निमित्त। प्रगट्यो जगकारण निश्चित।।२।।
ब्रम्हाहरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार ।।३।।
अन्तर्यामि सतचितसुख। बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ।।४।।
झोळी अन्नपुर्णा करमाह्य। शान्ति कमन्डल कर सोहाय ।।५।।
क्याय चतुर्भुज षडभुज सार। अनन्तबाहु तु निर्धार ।।६।।
आव्यो शरणे बाळ अजाण। उठ दिगंबर चाल्या प्राण ।।७।।
सुणी अर्जुण केरो साद। रिझ्यो पुर्वे तु साक्शात ।।८।।
दिधी रिद्धि सिद्धि अपार। अंते मुक्ति महापद सार ।।९।।
किधो आजे केम विलम्ब। तुजविन मुजने ना आलम्ब ।।१०।।
विष्णुशर्म द्विज तार्यो एम। जम्यो श्राद्ध्मां देखि प्रेम ।।११।।
जम्भदैत्यथी त्रास्या देव। किधि म्हेर ते त्यां ततखेव ।।१२।।
विस्तारी माया दितिसुत। इन्द्र करे हणाब्यो तुर्त ।।१३।।
एवी लीला क इ क इ सर्व। किधी वर्णवे को ते शर्व ।।१४।।
दोड्यो आयु सुतने काम। किधो एने ते निष्काम ।।१५।।
बोध्या यदुने परशुराम। साध्यदेव प्रल्हाद अकाम ।।१६।।
एवी तारी कृपा अगाध। केम सुने ना मारो साद ।।१७।।
दोड अंत ना देख अनंत। मा कर अधवच शिशुनो अंत ।।१८।।
जोइ द्विज स्त्री केरो स्नेह। थयो पुत्र तु निसन्देह ।।१९।।
स्मर्तृगामि कलिकाळ कृपाळ। तार्यो धोबि छेक गमार ।।२०।।
पेट पिडथी तार्यो विप्र। ब्राम्हण शेठ उगार्यो क्षिप्र ।।२१।।
करे केम ना मारो व्हार। जो आणि गम एकज वार ।।२२।।
शुष्क काष्ठणे आंण्या पत्र। थयो केम उदासिन अत्र ।।२३।।
जर्जर वन्ध्या केरां स्वप्न। कर्या सफळ ते सुतना कृत्स्ण ।।२४।।
करि दुर ब्राम्हणनो कोढ। किधा पुरण एना कोड ।।२५।।
वन्ध्या भैंस दुझवी देव। हर्यु दारिद्र्य ते ततखेव ।।२६।।
झालर खायि रिझयो एम। दिधो सुवर्ण घट सप्रेम ।।२७।।
ब्राम्हण स्त्रिणो मृत भरतार। किधो संजीवन ते निर्धार ।।२८।।
पिशाच पिडा किधी दूर। विप्रपुत्र उठाड्यो शुर ।।२९।।
हरि विप्र मज अंत्यज हाथ। रक्षो भक्ति त्रिविक्रम तात ।।३०।।
निमेष मात्रे तंतुक एक। पहोच्याडो श्री शैल देख ।।३१।।
एकि साथे आठ स्वरूप। धरि देव बहुरूप अरूप ।।३२।।
संतोष्या निज भक्त सुजात। आपि परचाओ साक्षात ।।३३।।
यवनराजनि टाळी पीड। जातपातनि तने न चीड ।।३४।।
रामकृष्णरुपे ते एम। किधि लिलाओ कई तेम ।।३५।।
तार्या पत्थर गणिका व्याध। पशुपंखिपण तुजने साध ।।३६।।
अधम ओधारण तारु नाम। गात सरे न शा शा काम ।।३७।।
आधि व्याधि उपाधि सर्व। टळे स्मरणमात्रथी शर्व ।।३८।।
मुठ चोट ना लागे जाण। पामे नर स्मरणे निर्वाण ।।३९।।
डाकण शाकण भेंसासुर। भुत पिशाचो जंद असुर ।।४०।।
नासे मुठी दईने तुर्त। दत्त धुन सांभाळता मुर्त ।।४१।।
करी धूप गाये जे एम।दत्तबावनि आ सप्रेम ।।४२।।
सुधरे तेणा बन्ने लोक।रहे न तेने क्यांये शोक ।।४३।।
दासि सिद्धि तेनि थाय। दुःख दारिद्र्य तेना जाय ।।४४।।
बावन गुरुवारे नित नेम।करे पाठ बावन सप्रेम ।।४५।।
यथावकाशे नित्य नियम।तेणे कधि ना दंडे यम ।।४६।।
अनेक रुपे एज अभंग। भजता नडे न माया रंग ।।४७।।
सहस्त्र नामे नामि एक। दत्त दिगंबर असंग छेक ।।४८।।
वंदु तुजने वारंवार। वेद श्वास तारा निर्धार ।।४९।।
थाके वर्णवतां ज्यां शेष। कोण रांक हुं बहुकृत वेष ।।५०।।
अनुभव तृप्तिनो उद्गार। सुणि हंशे ते खाशे मार ।।५१।।
तपसि तत्वमसि ए देव। बोलो जय जय श्री गुरुदेव ।।५२।।
तसचं, मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीनिमित्त गाणगापूर येथे यात्रेचे आयोजन करण्यात येत असते. त्यानिमित्ताने दत्त सांप्रदायिक लोकांची विशेष गर्दी पाहायला मिळते. या दिवशी मंदिरात श्री दत्त यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. श्री दत्त यांच्याबाबत दत्त सांप्रदायिक लोकांची अशी आख्यायिका आहे की, श्री दत्त गुरु यांनी गाणगापूर याठिकाणी राहून दिनदलितांची सेवा केली तसचं, समाजातील लोकांची दु:ख व अज्ञान दूर करून त्यांना सकारात्मक जीवन जगण्याचा मौल्यवान सल्ला दिला.अश्या प्रकरची माहिती दत्त संप्रदायाकडून मिळते.
श्री दत्त यांचा जन्म ऋषी अत्री यांच्या पत्नी अनसूया यांच्या पोटी झाला होता. श्री दत्त यांना ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे एकरूप मानलं जात असल्याने त्यांना तीन तोंड, सहा हात, दोन पाय, असून त्यांच्या भोवताली चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनु बसली आहे.
श्री दत्त गुरु यांना हिंदू धर्मातील पहिले गुरु मानलं जाते. हिंदू धर्माची पताका आपल्या हाती घेऊन त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केले. त्यामुळे आज आपणास देशाच्या अनेक भागात दत्त संप्रदाय पाहायला मिळतो. श्री दत्त यांच्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती यांना श्री दत्त यांचे अवतार मानलं जाते.
या बावन्नीची रचना नरेश्वर निवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. या बावन्नीची रचना त्यांनी शके १९९१ माघ शु. प्रतिपदेला सन ४ फेब्रुवारी १९३५ साली सईज या गावी केली. सईज हे गाव गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्याच्या कलोल तालुक्यात आहे. या गावा बाहेरील स्मशान भूमिजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशाळेमध्ये या बावन्नी स्तोत्राची निर्मिती करण्यात आली आहे.
श्री दत्त बावन्नीची मूळ प्रतिमा गुजराती भाषेत आहे. या बावन्नीचे पठन केल्याने आपणास श्री दत्त यांच्या विविध अवतारांची माहिती मिळते. तसचं, त्यांनी आपल्या भक्तांना दिलेले उपदेश आणि त्यांचे आपल्या जीवनांत असलेले महत्व यांची माहिती मिळते. वरील लेखातील संपूर्ण माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवली असून आपणास सुद्धा श्री दत्त बावन्नी ची माहिती मिळावी याकरिता आम्ही या लेखाचे लिखाण केलं आहे.