Krishnacha Palana
नमस्कार मित्र / मैत्रिणींनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून भगवान कृष्ण यांच्या जन्मदिनी मोठ्या हर्ष उल्हासात गायल्या जाणाऱ्या पाळणा गीतांचे लिखाण करणार आहोत. तसचं, त्यासंबंधी थोडक्यात माहिती देखील वर्णीत करणार आहोत. तरी, आपण सर्वांनी या लेखात वर्णीत पाळणा गीताचे नियमित वाचन करावे.
कृष्णाचा पाळणा – Krishnacha Palana
मधुरेमध्ये अवतार धरिला ।। कृष्ण देवकीच्या गर्भासी आला ।।
तोडून बेड्या बंद सोडिला ।। चरणांच्या प्रतापे माग दाविला ।। जो बाळा जो. ।।१।।
गोकुळामध्ये श्रीकृष्ण आला ।। नंदाच्या घरी आनद झाला गुढ्या तोरणे शिखरी बांधिती ।।
कसमांचे हार देव वर्षती ।। जो बाळा जो. ।।२।।
तिसऱ्या दिवशी वाजे वाजंत्री ।। तासे नौबती उत्सव करिता ! सर्वांचा
कृष्ण हा शब्द ।। त्याचे छंदाने नाचे गाव वछंदाने नाचे गोविंद ।। जो बाळा जो. ।।३।।
चवथ्या दिवशी चवथी चौकी।। बाळबाळंतिणींची न्हाणी होती ।।
निबे डाळिबना नारळ आणिती ।। सख्या मिळोनी दृष्ट काढिती।। जो बाळा जो. ।।४।।
दिवशी पाटापूजन ।। बांधिला फुलवरा वाक्या तोरण ।।
पाचव्या बिंदली आंगडे पैरण ।। खिरी जो बाळा जो. ।।५।।
सहाव्या दिवशी सटवी पूजन ।। हळदी-कुंकवाची देताती वाणं ।।
एकमेकीसी सखया होऊन ।। पानसुपाऱ्या खोबरें वाटून ।। जो बाळा जो. ।।६।।
सातव्या दिवशी सटवीचा फेरा ।। गोपा बाळंतीण आवरून धरा ।।
सांजच्या प्रहरी अंगारा करा ।। गाई-वासरां मुला लेकरां । जो बाळा जो. ।।७।।
आठव्या दिवशी आठवी चौकी ।। गोपां बाळंतीण नवतीस न्हाती ।।
सख्या मिळोनी जाग्रण करिती ।। कृष्णाच्या लीला आनंदे गाती ।। जो बाळा जो. ।।८।।
नवव्या दिवशी नवस केला ।। खेळणे पाळणे वाहीन तुजला ।।
रत्नजडित पालख सजला ।। वरती श्रीकृष्ण मोदे पहुडला ।। जो बाळा जो. ।।९।।
दहाव्या दिवशी दहावी चौकी ।। न्हाणी बोळवून सारवल्या भिंती ।।
मूठभरल्या ओट्या दिधल्या लावूनी ।। देव स्वर्गाचे पुष्प वर्जूनी ।। जो बाळा जो. ॥१०॥
अकराव्या दिवशी अकरावी चौकी ।। येशोदा बसली मंचकावरती ।।
नयनाच्या कोरी काजळ भरी ।। वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी ।। जो बाळा जो. ।।११।।
बाराव्या दिवशी बारसें येती ।। परोपरी पक्वान्ने समय करिती ।।
लाडू मोदक पंखा वारिती।। खीर भरल्या वाट्या साखर मिळविती।। जो बाळा जो. ।।१२।।
तराव्या दिवशी तेरावी चौकी । बारीक जुनें नेसून येती ।।
मोर गर्जती चौखंडा वरती ।। गाई वासरे मोदे हंबरती ।। जो बाळा जो. ।।१३।।
चवदाव्या दिवशी चवदावी चौकी ।। नंदी महादेव परतुनी येती।
बाळ श्रीकृष्ण दर्शने मागती ।। श्रीगोपांचे मीठ बळीराम घेती ।। जो बाळा जो. ।।१४।।।
पंधराव्या दिवशी पंधरावी चौकी ।। नगरीच्या नारी मिळून येती ।।
पाळण्यामध्ये देव मुरारी ।। नांव ठेविले श्रीकृष्ण हरी ।। जो बाळा जो. ।।१५।।
सोळाव्या दिवशी सोहळा केला ।। गोपी गवळणीनें कृष्ण आळवीला ।।
त्यांच्या हृदयी आनंद झाला ।। एका जनार्दनी पाळणां गाईला ।। जो बाळा जो. ।।१६।।
Shri Krishnacha Palana Marathi
मित्र/ मैत्रिणींनो भगवान कृष्ण तर आपण सर्वांनाच परिचित आहेत. मथुरा नगरीवासी भगवान कृष्ण यांचा जन्म श्रावण वाद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला होता, असे गीतामध्ये वर्णन करण्यात आले आहे. त्यामुळे, आपण दरवर्षी त्यांचा जन्मदिन या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो.
भगवान कृष्ण यांचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने आपण सर्वजण त्यांचा जन्मदिन श्रावण वाद्य अष्टमीस मध्यरात्री साजरा करीत असतो. त्याप्रसंगी महिला आपल्या घरी दोरीच्या साह्याने पाळणा तयार करून त्यात भगवान कृष्ण यांची मूर्ती ठेवतात व दोरीच्या साह्याने पाळणा हलवत पाळणा गीत म्हणत असतात.
भगवान कृष्ण यांचा जन्मोत्सव त्यांची जन्मभूमी असलेल्या मथुरा येथील कृष्ण मंदिरात विधिवत पूजा अर्चना करून शंख घंटानादाच्या सुरात आरती करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
क्रूर कंसाच्या बंदिगृहांत । माता देवकी झाली प्रसूत ।।
पहारेकरी होते झोपेत । उघडली सारी द्वारें अवचित ।।जो.।।
वसुदेवाने संधि साधुनि । बाळास आपुल्या सवे घेऊनी ।।
यमुनेकाठी आले चालूनी । चरण स्पर्शाने फाकले पाणी ।।जो.।।
गोकुळामध्ये नंदाच्या घरी । बाळास आणूनी ठेवी सत्वरी ।।
बंदीगृहामधे आले माघारी । काय वर्णावी लिला ईश्वरी ।।जो.।।
तिसऱ्या दिवशी ढोल सनई । वाजू लागले ठायी ठायीं ।।
माया यशोदा हडून जाई । आनंदभरांत सुचेना कांहीं ।।जो।।
चौथ्या दिवशी चौथा आनंद । गोपिका नाचुनी घालती साद ।।
भरला गोकुळी नवीन छंद । पाहून सारे नाचे गोविंद ।।जो०।।
पांचव्या दिवशी पुजली पांचवीं । वेलींना फुलें नवी पालवी ।।
हर्ष मावेना गोकुळ गावीं । मूर्ति हरीची मनीं सांठवावी ।।जो.।।
सहाव्या दिवशी सटवी पूजन । साऱ्या गावात वाटणी वाण ।।
नरनारी सारे गोळा होऊन । रिझविती बाळा नाचून गाऊन ।।जो०।।
सातव्या दिवशी थाटच न्यारा । जणं सटवीच घालते फेरा।।
सायंकाळच्या शुभ प्रहरा । या ग या अंगारा करा ।।जो.।।
आठव्या दिवशीची ऐकावी रीती। थाटामाटाने बाळा सांगाती ।।
बाळतिणीला न्हाऊ घालती। गोप-गोपिका जाग्रण करिती ।।जो.।।
उगवला बाई नववा दिवस । माता यशोदा करते नवस ।।
य लाभो बाळाला । खेळणे पाळणें वाहिन खास ।।जो.।।
दिवशी दहावा शृंगार । न्हावी सारवी घर आणि दार ।।
ही सानंदे गवळ्याची पोरं । यशोदा ओढ्या भरी झरझर ।।जो.।।
अकराव्या दिवशी अकरावी चौकी। यशोदामाई बैसली मंचकी।।
आनंद मनी आणि मुखीं । घडोघडी घनश्याम देखी ।।जो.।।
बाराव्या दिवशी बारशाचा थाट। पक्वान्नांची करिती वाटाघाट ।।
दारी हजारो अंथरले पाट । गोपगोपिकांची गर्दी अफाट जो.।।
राव्या दिवशी तेरावा संग । पाळण्यांत खेळे श्रीरंग ।।
बाळाच्या हसण्याचा न्याराच ढंग । पाहून नरनारी जाहले दंग ।।जो.।।
चौदाव्या दिवशी चौदावा क्षण । दारी जेवती अवघे ब्राह्मण ।।
टकमक पाहे मनमोहन । यशोदा बाईचा जीव की प्राण ।। जो.।।
शुभदिन तो आला पंधरावा । अवध्या नारींचा भरला मेळावा ।।
गोविंद गोपाळ म्हणती ध्यावा । कानी पडावा मंजुळ पावा ।।जो.।।
सोळाव्या दिवशींचा न्यारा सोहळा । चाळा आपला थांबिव खट्याळा ।।
निद्रा करी लागूदे डोळा । दास कोकाटे वंदी घननिळा ।।जो०।।
Krishna cha Palna in Marathi
भारताच्या विविध भागात भगवान कृष्ण यांचा जन्मदिन निरनिराळ्या प्रकारे साजरा करण्यात येत असतो. त्यापैकी आपल्या महाराष्ट्रातील कृष्ण जन्मोत्सव पाहण्याजोगा असतो. आपल्या घरातील महिला मंडळ कृष्ण जन्मोत्सव निमित्त सुरेख पूजा मांडून दोरीचा पाळणा तयार करतात त्यावर भगवान कृष्ण यांची मूर्ती ठेवून त्या पाळण्यास दोरीच्या साह्याने झोका देतात व पाळणा गीते म्हणतात.
कृष्ण जन्मोत्सवा निमित्त आपल्या घरातील महिला उपवास पकडतात व रात्री भगवान कृष्ण यांचा जन्म झाल्यानंतर प्रसाद वाटप करून उपवास सोडतात. शिवाय, दुसऱ्या दिवशी पुरुष मंडळी दहीहंडी ची तयारी करून ती फोडतात.
भगवान कृष्ण यांच्या जन्मोत्सवात सर्व समुदाय जणू आपले भान विसरून जावून भगवान कृष्ण यांच्या भक्तीत मंत्रमुग्ध झालेला असतो. भगवान कृष्ण यांच्या जन्मोत्सव निमित्त महाराष्ट्र राज्यात साजरा होणारा दहीहंडी महोत्सव तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
‘बाळा जो जो रे कुलभूषण । श्रीनंदनंदना ।।
निद्रा करि बाळा मनमोहना । परमानंदा कृष्णा ।। बाळा ।।धृ।।
जन्मुनि मथुरेत यदुकुळ । आलासी वनमाळी ।।
पाळणा लांबविला गोकुळीं। धन्य केले गौळी ।। बाळा जौ।।
बंदीशाळेत अवतरूनी । द्वारे मोकलुनी ।।
जनकशृंखला तोडूनी । यमुना दुभंगोनी ।। बाळा जौ०।।
मार्गी नेतांना श्रीकृष्ण मेघनिवारणा ॥
शेष धांवला तत्क्षणी । उंचावूनी फणा ।। बाळा जो.।।
रत्नजडित पालख । झळके अमोलिक ।।
वरती पहुडले कुलतिलक । वैकंठनायक।। बाळा जो०।।
हालवी यशोदा सुन्दरी । धरूनि हाती ज्ञानदोरी ।।
पुष्ये वर्षिली सुरवरी। गर्जति जयजयकारी ।। बाळा जो.।।
विश्वव्यापक यदुराया । निद्रा करी बा सखया ।।
तुजवरी कुरवंडी करूनियां । सांडिन मी निज काया।। बाळा जो.।।
गर्ग येऊनि सत्वर । सांगे जन्मांतर ।।
कृष्ण परब्रह्म साचार । आठवा अवतार ।। बाळा जौ०।।
विश्वव्यापी हो बालक दुष्ट दैत्यांतक ।।
प्रेमळ भक्तांवा पालख । श्री लक्ष्मीनायक ।। बाळा जो.।।
विष पाजाया पूतना । येतां घेई प्राणा ।।
शकटासुराशी उताणा । पाडिले लाधे जाणा ।। बाळा जो.।।
उखळा बांधता मातेनें । रांगतां श्रीकृष्ण ।।
यमलार्जुनाचे उद्धरण । दावानळ प्राशन ।। बाळा जो.।।
गोधन पखितां आळविला । कालिया मर्दीला ।।
दावानळ वन्ही प्राशिला । दैत्यविध्वंस केला ।। बाळा जो.।।
इंद्र कोपतां धावुन । उपटी गोवर्धन ।।
गाई गोपाळां रक्षुन । केले वनभोजन ।। बाळा जो.।।
कालिंदी तीरी जगदीश । ब्रजवनितांशी राम ।।
खेळुनि मारिलें कंसास । चाणूरास ।। बाळा जौ०।।
ऐशी चरित्रे अपार । पावुनि भूमीवर ।।
पांडव रक्षिले सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ।। बाळा जो.।।
Bal Krishna cha Palna
दहीहंडी फोडण्याकरिता लोकांनी केलेली गर्दी आणि दहीहंडी फोडण्याची स्पर्धा पाहून आपल्या डोळ्याचे पारणे फिटून जाते. ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी मोठ मोठाले बक्षीस देण्यात येते. अश्या प्रकारे भगवान कृष्ण यांचा जन्मोत्सव आपण साजरा करीत असतो. असे असले तरी, भगवान कृष्ण यांच्या जन्माच्या वेळी महिला मंडळी गात असलेली पाळणा गीतांना विशेष महत्व आहे.
त्या पाळणा गीतात भगवान कृष्ण यांच्या संपूर्ण जीवनाचा उल्लेख करण्यात आलेला असतो. भगवान कृष्ण यांच्या जन्मापासून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव या पाळणा गीताच्या माध्यमातून महिला गात असतात.
यशोदेच्या तू नंदना किती विनवू तुला
झोके देतो तुला… बाळा जो जो रे जो जो रे
रत्नजडीत पाळण्याला नाना परी मी सजविला
मखमली गालीच्यात बाळा तुला मी निजविला
हाती घेऊनी रेशम दोरी झोका देते रे
बाळा जो जो रे जो जो रे, झोका देते तुला…
ऐकूण रडण्याचा सुर आला गौळणीचा मेळ
कुणी घ्यावे कडेवरती दृष्ट काढा हो लवकर
श्यामल खाना गोजरीवाणा रुसला खरा रे
बाळा जो जो रे जो जो रे, झोका देते तुला…
बाई यशोदेचा कान्हा काही केल्याने ऐकेना
नामा परी मी विनविले परी हट्ट तो सोडना
दास शंकर म्हणे गड्या रे सगुन तुझ्या न्यारे
बाळा जो जो रो जो जो रे, झोका देते तुला…
बाळा जो जो रे जो जो रे
यशोदेच्या तू नंदना किती विनवू तुला
– झोका देते तुला….
मित्रांनो, भगवान कृष्ण यांचे बालरूप इतके आकर्षक आहे की, ते आपण सर्व प्राणिमात्रांना स्वत:कडे आकर्षित करित असते. त्यांचे त्या निरागस रूपाचे वर्णन महिला पाळणा गीताच्या माध्यमातून वर्णीत करीत असतात. अनेक भक्तांची अशी धारणा आहे की, भगवान कृष्ण यांच्या जन्मदिनी पाळणा गीतांचे गायन केल्याने भगवान कृष्ण प्रसन्न होवून आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात. अनेक स्त्रिया आपल्या लहान बाळांना भगवान कृष्ण यांच्या सारखे सजवतात. अश्या प्रकारच्या धार्मिक भावना लोकांच्या भगवान कृष्ण यांच्याप्रती आहेत.