9 November Dinvishes
९ नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशी देश-विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, याव्यतिरिक्त काही प्रसिध्द व्यक्तीचा जन्मदिवस म्हणजेच वाढदिवस असतो ज्याची आपल्याला आतुरता असते, तसेच आजच्या तारखेला काही व्यक्ती जगाचा निरोप घेऊन निघून गेल्या होत्या (निधन पावल्या होत्या). आम्ही अश्याच काही महत्वपूर्ण माहिती ला आपल्यापर्यंत पोहचवतोय दिनविशेष द्वारा चला तर मग बघूया आजचा दिनविशेष काय आहे.
जाणून घ्या 9 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 9 November Today Historical Events in Marathi
9 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 November Historical Event
- आजच्याच दिवशी १९३७ साली जपानी सेनेने चीनच्या शांघाई या शहरावर आपला ताबा घेतला होता.
- १९५३ साली आजच्याच दिवशी कंबोडिया या देशाला फ्रांस कडून स्वतंत्रता मिळाली होती.
- दार्जीलिंग या थंड हवेच्या ठिकाणी १९५४ साली हिमालय पर्वतारोहण संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
- पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आजच्याच दिवशी २००१ साली संयुक्त राष्ट्र या जागतिक संस्थेच्या महासभेला संबोधित केले होते.
- फ्रांस या देशात आजच्याच दिवशी २००५ साली आणीबाणी घोषित करण्यात आली होती.
- आजच्याच दिवशी १९४७ साली भारत सरकारने तत्कालीन जुनागढ संस्थान सैन्य कारवाई द्वारा मुक्त केले होते.
- स्पेन या देशाच्या सेनेने १५८० साली आयर्लंड देशावर आक्रमण केले होते.
- तत्कालीन रशियाच्या सेनेने १७९४ साली पोलंडची राजधानी वारसा ताब्यात घेतली होती .
- कोस्टारिका या देशाने १९४९ साली संविधानाचा अंगीकार केला होता .
- ब्रिटनने १९८९ साली मृत्यू दंडाच्या शिक्षेवर पूर्णपणे बंदी घातली होती.
9 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 9 November Birthday / Jayanti / Birth Anniversary
- प्रसिध्द उर्दू कवी मुहम्मद इकबाल यांचा १८७७ साली जन्म झाला होता.
- मार्टिन ल्युथर यांचा १४८३ साली जन्म झाला होता.
- फ्रांस येथील प्रसिध्द विदुषक रेमंड डेवोस यांचा १९२२ साली जन्म झाला होता.
- वनस्पती विज्ञानाचे प्रसिद्ध भारतीय जानकार पंचानन महेश्वरी यांचा १९०४ साली जन्म झाला होता.
- अमेरिका येथील प्रसिध्द अभिनेत्री डोरोथी डेन्द्रीज हिचा १९२२ साली जन्म झाला होता.
- प्रसिध्द अभिनेत्री पायल रोहतगी हिचा १९८० साली जन्म झाला होता.
- प्रसिध्द हिंदी कवी सुदाम पांडे यांचा १९३६ या साली जन्म झाला होता.
- प्रसिध्द भारतीय पत्रकार इंद्र विद्यावाचस्पती यांचा १८८९ साली जन्म झाला होता.
9 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 9 November Death / Punyatithi / Smrutidin
- संस्कृत भाषेचे पंडित व विद्वान गंगानाथ झा यांचे १९४१ साली निधन झाले होते.
- भारतीय वायुसेनेचे प्रथम वायुसेनाध्यक्ष सुब्रतो मुखर्जी यांचे १९६० साली निधन झाले होते.
- समाजसेवक धोंडो केशव कर्वे यांचे १९६२ साली निधन झाले होते.
- प्रसिध्द कथ्थक नृत्यकलाकार शंभू महाराज यांचे १९७० ह्या वर्षी निधन झाले होते.
- स्वाधीनता सेनानी पुरण चंद जोशी यांचे १९८० साली निधन झाले होते.
- भारताचे पूर्व राष्ट्रपती के आर नारायण यांचे २००५ साली निधन झाले होते.
- नोबेल पुरस्कार प्राप्त जीव रसायन व शरीर विज्ञान शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे २०११ साली निधन झाले होते.
- प्रसिध्द राजस्थानी साहित्यकार विजयदान देथा यांचे २०१३ साली निधन झाले होते.