9 June Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहासकाळी घडलेल्या काही ऐतिहासिक तसचं आधुनिक घटना, अणि काही महत्वपूर्ण व्यक्तीचे जन्मदिन, निधन, व त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या ९ जून रोजी येणारे दिनविशेष – 9 June Today Historical Events in Marathi
९ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 June Historical Event
- इ.स. १६६५ साली मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
- इ.स. १६५९ साली दादर येथील बलुची प्रमुख जीवन खान यांनी दारा शिकोह यांना फितुरीने औरंगजेब यांच्या हवाली केले.
- इ.स. १६९६ साली छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांना तामिळनाडू मधील जिंजीच्या किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. त्यांनी आपल्या पुत्राचे नाव ‘शिवाजी’ असे ठेवले.
- सन १७०० साली दख्खनच्या स्वारीवर असतांना मुघल बादशाहा औरंगजेब यांनी सज्जनगड चा किल्ला जिंकला.
- इ.स. १८९० साली मुंबई येथील गिरणी कामगारांची रविवारच्या दिवशी साप्ताहिक सुट्टीची मागणी मान्य करण्यात आली.
- सन १९०६ साली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लंडनला पलायन केले.
- सन १९६४ साली भारतातील दुसरे पंतप्रधान पदाचा करभार लालबहादुर शास्त्री यांनी सांभाळला.
- सन १९८६ साली मुंबई येथे पहिला एड्स रुग्ण सापडला.
- सन १९९७ साली रशियन बनावटीची सुखोई-३० ही लढाऊ विमाने भारतीय वायुदलात दाखल झाले.
- सन २००१ साली भारतीय टेनिस खेळाडू लिएंडर पेस आणि महेश भूपती यांनी फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या दुहेरी पुरुष गटाचे विजेतेपद पटकाविले.
- सन २००६ साली १८ वी फुटबॉल विश्व करंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरु झाली.
९ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –9 June Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १७८१ साली प्रसिद्ध ब्रिटीश सिव्हील इंजिनियर आणि मेकॅनिकल इंजिनिअर आणि रेल्वेचे जनक जॉर्ज स्टीव्हेन्सन (George Stephenson) यांचा जन्मदिन.
- सन १९०९ साली भारतीय राज्य छत्तीसगढचे स्वातंत्र्य सेनानी व युनानी चिकीत्सक व वैद विशारद लक्ष्मण प्रसाद दुबे यांचा जन्मदिन.
- सन १९१२ साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांचा जन्मदिन.
- सन १९१३ साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजकीय नेता चौधरी दिगंबर सिंह यांचा जन्मदिन.
- सन १९३१ साली भारतीय राजकारणी व लेखिका तसचं, ओडिशा राज्याच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी यांचा जन्मदिन.
- सन १९३३ साली सुप्रसिद्ध भारतीय कवी, कथाकार, कादंबरीकार संस्मरणीय लेखक व समालोचक अजित शंकर चौधरी यांचा जन्मदिन.
- सन १९४७ साली प्रख्यात भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस अधिकारी व पंदुचेरी येथील विद्यमान उपराज्यपाल किरण बेदी यांचा जन्मदिन.
- सन १९७५ साली भारतीय चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल यांचा जन्मदिन.
- सन १९८५ साली भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनम कपूर यांचा जन्मदिन.
९ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 9 June Death / Punyatithi /Smrutidin
- इ.स. १७१६ साली शूरवीर शीख योद्धा व खालसा सैन्यांचे सेनापती बन्दा सिंह बहादुर यांचे निधन.
- इ.स. १८३४ साली ब्रिटीश ख्रिश्चन मिशनरी, विशेष बॅपटिस्ट मंत्री, अनुवादक, समाज सुधारक आणि सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ विल्यम कॅरी(William Carey) यांचे निधन.
- सन १९०० साली भारतीय आदिवासी जमातीचे प्रमुख व भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि धार्मिक नेता बिरसा मुंडा यांचे निधन.
- सन १९३१ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी हरि किशन सरहदी यांचे निधन.
- सन १९९१ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्देशक राज खोसला यांचे निधन.
- सन १९९५ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शेतकरी नेता व भारतीय शेतकरी चळवळीचे जनक तसचं, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एन. जी. रंगा यांचे निधन.
- सन २०११ साली भारतीय पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार तसचं भारतीय राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भारतीय आंतरराष्ट्रीय पातळीचे चित्रकार व बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपचे संस्थापक सदस्य एम. एफ. हुसैन यांचे निधन.