9 August Dinvishes
मित्रांनो, आजच्या दिवशी स्वातंत्र्यपूर्व भारतात घडलेल्या दोन महत्वपूर्ण घटना म्हणजे, सन १९२५ साली देशांत इंग्रज सरकारचे देशातील नागरिकांवर होत असलेला अत्याचार पाहून हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारकांनी इंग्रज सरकारला धडा शिकविण्यासाठी व त्यांच्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी एक षड्यंत्र रचले. ते म्हणजे लखनौजवळील काकोरी येथे इंग्रज सरकारचा खजीन घेऊन जात असलेल्या रेल्वेवर दरोडा टाकून त्यांचा संपूर्ण खजिना लुटला.
याशिवाय, महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या “भारत छोडो” आंदोलनाच्या वेळी महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकार विरुद्ध “चले जाव” चा नारा दिला त्यामुळे त्यांना कैद करण्यात आलं. ब्रिटीश कालीन भारतात आजच्या दिवशी घडलेल्या या दोन महत्वपूर्ण घटना आहेत. याशिवाय, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवसाचे दिनविशेष पाहणार आहोत.
स्वातंत्र्यपूर्व भारतात घडलेल्या काकोरी या ऐतिहासिक घटनांची स्मृती म्हणून आज भारतीय क्रांती दिवस अथवा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तसचं, भारत छोडो आंदोलन दिवस देखील साजरा करण्यात येतो. शिवाय, दुसऱ्या महायुद्धा वेळी अमेरिकेने जपानच्या नागासकी शहरावर केलेल्या आण्विक बॉम्ब हल्ल्याची स्मृती म्हणून आज नागासकी दिवस देखील साजरा करण्यात येतो.
जाणून घ्या ९ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 9 August Today Historical Events in Marathi
९ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 9 August Historical Event
- सन १९२५ साली ब्रिटीश कालीन भारतात इंग्रज सरकार विरुद्ध युद्ध कण्यासाठी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या क्रांतिकारकांनी शस्त्र विकत घेण्यासाठी ब्रिटीश सरकारची तिजोरी लुटण्याचा लढा उभारला त्यातून काकोरी ही घटना घडली.
- सन १९४२ साली ब्रिटीश कालीन भारतात छोडो भारत आंदोलनाच्या वेळी चाले जाव असा नारा दिल्याप्रकरणी महात्मा गांधी यांना अटक करण्यात आलं.
- सन १९४५ साली दुसऱ्या महायुद्धा दरम्यान अमेरिकेने जपानच्या नागासकी शहरावर दुसरा आण्विक बॉम्ब टाकला.
- सन १९६५ साली मलेशिया राष्ट्रातून बाहेर काढल्यागेल्यामुळे सिंगापूर देशाला स्वातंत्र्य मिळालं. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
- सन १९९३ साली छोडो भारत आंदोलनाच्या सुवर्णजयंती सांगता समारंभानिमित्त सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशण करण्यात आलं.
- सन १९९६ साली पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार तसचं, भारतरत्न पुरस्कार सन्मानित जगप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधार पदी नियुक्ती करण्यात आली.
- सन २००५ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे डिस्कव्हरी हे मानवरहित अंतराळ यान चौदा दिवसांच्या साहसी आणि धोकादायक प्रवासानंतर कॅलिफोर्नियास्थित एअरबेसवर सुरक्षितपणे उतरले.
९ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 9 August Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १६३१ साली इंग्लंड देशांतील पहिले कवी पुरस्कार विजेते इंग्रज कवी, साहित्यिक समीक्षक, अनुवादक आणि नाटककार जॉन ड्राइडन (John Dryden) यांचा जन्मदिन.
- इ.स. १७७६ साली इटालियन रसायनशास्त्रज्ञ अमेडीओ अव्होगॅड्रो (Amedeo Avogadro) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८७६ साली ब्रिटीश कालीन भारतातील बंगाल प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड लिटन द्वितीय (Robert Bulwer-Lytton, 2nd) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९० साली महाराष्ट्रीयन मराठी नाट्यसृष्टीतील श्रेष्ठ गायक व अभिनेते केशवराव भोसले यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९१ साली सयुक्त प्रांताचे माजी राज्यपाल फ्रान्सिस वर्नर वाईली (Francis Verner Wylie) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९३ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी कादंबरीकार, संपादक आणि गद्य लेखक शिवपूजन सहाय यांचा जन्मदिन.
- सन १९०९ साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कन्नड भाषिक साहित्यकार डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जन्मदिन.
- सन १९३३ साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय हिंदी लेखक, पत्रकार आणि पटकथा लेखक व कादंबरीकार मनोहर श्याम जोशी यांचा जन्मदिन.
- सन १९३७ साली मॉरिशस येथील पसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार अभिमन्यू अनंत यांचा जन्मदिन.
- सन १९७५ साली प्रसिद्ध भारतीय तेलगु भाषिक चित्रपट अभिनेते व निर्माता तसचं जी. महेश बाबू एन्टरटेन्मेंट प्रा. लि. प्रोडक्शन हाऊसचे मालक महेश बाबू यांचा जन्मदिन.
- सन १९९१ साली भारतीय तमिळ चित्रपट अभिनेत्री हंसिका मोटवानी यांचा जन्मदिन.
९ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 9 August Death / Punyatithi /Smrutidin
- सन १९०१ साली महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमीचे जनक, मराठी नाटककार व “महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनी” म्हणून प्रसिद्ध असणारे विष्णुदास अमृत भावे यांचे निधन.
- सन १९६२ साली नोबल पारितोषिक पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध जर्मन स्विस कवी, कादंबरीकार आणि चित्रकार हर्मन कार्ल हेसे (Hermann Hesse) यांचे निधन.
- सन १९७० साली ब्रिटीश कालीन भारतात तीस वर्ष तुरुंगवास भोगणारे प्रख्यात भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते व राजकारणी त्रिलोकनाथ चक्रवर्ती यांचे निधन.
- सन २००२ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रांचे प्रख्यात अभ्यासक राम किंकर उपाध्याय यांचे निधन.
- सन २०१६ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व अरुणाचल प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचे निधन.