8 November Dinvishes
८ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देशविदेशांत काही महत्वाच्या घटना घडल्या होत्या, तसेच काही प्रसिध्द व्यक्तीचे जन्म व मृत्यू ह्या दिवशी झालेले आहेत. त्या सर्व बाबींचा आढावा आपण आजच्या दिनविशेष मध्ये घेणार आहोत, चला तर मग बघूया काय आहे आजच्या तारखेला विशेष
जाणून घ्या 8 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 8 November Today Historical Events in Marathi
8 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 November Historical Event
- भौतिक शास्त्रज्ञ विल्हेम कोनार्ड रोन्टजन याने आजच्याच दिवशी १८९५ साली क्ष किरणांचा शोध लावला होता.
- भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड व सचिन तेंडुलकर यांनी आजच्याच दिवशी १९९९ साली एकदिवसीय खेळात ३३१ धावांची भागीदारी करीत जागतिक कीर्तीचा विश्वविक्रम रचला होता.
- भारताचे पहिले विनामानव यान अंतराळ मोहीम अंतर्गत चांद्रयान-१ आजच्याच दिवशी २००८ ह्यावर्षी चंद्राच्या कक्षेत पोहचले होते.
- ब्रिटन ने १९५७ साली आजच्याच दिवशी ख्रिसमस बेट समूहाजवळ परमाणु परीक्षण केले होते.
- हॉंगकॉंग या देशांत आजच्या दिवशी १९४५ साली भीषण जहाज अपघात होवून १५५० लोकांचा बळी गेला होता.
- आयर्लंड या देशात १९९० साली पहिली महिला राष्ट्रपती बनली होती.
- आजच्याच दिवशी १९५६ साली संयुक्त राष्ट्र संघाने तत्कालीन सेवियत संघाला युरोपीय देश हंगेरीतून मागे हटण्यास सांगितले.
- २०१६ साली आजच्याच दिवशी भारत सरकारने नोटबंदी केली होती, यामध्ये ५०० व १००० रुपये किंमतीच्या नोटा सरकारने अवैध घोषित केल्या होत्या.
- बांगलादेशाचे पहिले पंतप्रधान शेख मुज्जीबुर रहमान यांच्या हत्ये प्रकरणी १९९८ साली १५ जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
8 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 8 November Birthday / Jayanti / Birth Anniversary
- भारताची प्रसिद्ध कथ्थक नर्तकी सितारा देवी हिचा १९२० साली जन्म झाला होता
- दक्षिण आफ्रिकेचे शस्त्रक्रिया तज्ञ क्रिश्चियन बनार्ड ह्यांचा १९२२ साली जन्म झाला होता.
- भाजपचे वरिष्ठ नेते व पूर्व केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी ह्यांचा जन्म १९२९ साली झाला होता.
8 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 8 November Death / Punyatithi / Smrutidin
- शीख धर्मगुरू हर राय यांचे १६६१ साली निधन झाले होते.
- मुघल शासक जहांगीर याचे १६२७ साली निधन झाले होते.
- दक्षिणात्य सिनेसृष्टीचे प्रसिध्द बोमी रेड्डी नरसिम्हा रेड्डी यांचे १९७७ साली निधन झाले होते.