8 July Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाऊन घेणार आहोत. याच सोबत आजच्या दिवशी जन्मदिन असणाऱ्या काही महत्वपूर्ण व्यक्ती, तसचं, निधन वार्ता व कार्य आधी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या ८ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 8 July Today Historical Events in Marathi
८ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 July Historical Event
- इ.स. १८८९ साली ’द वॉल स्ट्रीट जर्नल’ चा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला.
- सन १९१० साली स्वातंत्रवीर सावरकरांनी ब्रिटीश सरकारच्या कैदेत असतांना त्यांना फ्रांस येथे जहातून नेत असतांना त्यांनी मोरिया नावाच्या जहाजातून फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी मारली.
- इ.स. १४९७ साली पोर्तुगीज खलासी वास्को द गामा हे भारताच्या सफरीवर निघाले.
- सन १९४८ साली अमेरिकेच्या वायुसेना दलात महिलांची भारती करण्यात आली.
- सन १९५४ साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जगातील सर्वात मोठ्या कालव्यावर भाकरा-नांगल जलविद्युत प्रकल्प सुरु केला.
- सन २००५ साली जलवायू परिवर्तन मुद्यावर जी-८ देशांनी आपली सहमती दर्शवली.
- सन २००६ साली तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगेसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- सन २०११ साली भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी तयार करण्यात आली.
८ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 8 July Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १७८९ साली मराठ्यांच्या इतिहासाचे लिखाण करणारे प्रख्यात ब्रिटीश इतिहासकार जेम्स ग्रांट डफ(James Grant Duff) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८३९ साली अमेरिकन व्यावसायिक व उद्योगपती तसचं, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक जॉन डी. रॉकफेलर(John D. Rockefeller) यांचा जन्मदिन.
- सन १९१४ साली भारतीय राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य तसचं,पश्चिम बंगाल राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा जन्मदिन.
- सन १९१६ साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन मराठी लेखक, इतिहासकार व कादंबरीकार गो.नी. दांडेकर यांचा जन्मदिन.
- सन १९२२ साली भारतीय राजकारणी, व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेता अहिल्याबाई रांगणेकर यांचा जन्मदिन.
- सन १९४९ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे सदस्य तसचं, आंध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री वाई॰ एस॰ राजशेखर रेड्डी यांचा जन्मदिन.
- सन १९५८ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री नितू सिंह यांचा जन्मदिन.
- सन १९७२ साली प्रख्यात माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू व कर्णधार तसचं, भारतीय क्रिकेट प्रशासक, समालोचक व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांचा जन्मदिन.
८ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 8 July Death / Punyatithi /Smrutidin
- सन १९८४ साली प्रसिद्ध गोवा राज्याचे कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार कविवर्य बा.भ. बोरकर यांचे निधन.
- सन १९९४ साली मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व ‘गोवा पुराभिलेखाचे’ संचालक डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे निधन.
- सन २००१ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन तबला वादक उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचे निधन.
- सन २००३ साली प्राचीन माराठी वाङ्मयाचे लेखन करणारे थोर मराठी लेखक व थोर संत साहित्याचे अभ्यासक ह. श्री. शेणोलीकर यांचे निधन.
- सन २००६ साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भारतीय तत्वज्ञानी प्राध्यापक व लेखक तसचं, इंग्रजी भाषिक कादंबरीकार व लघुकथा लेखक प्रा. राजा राव यांचे निधन.
- सन २००७ साली भारतीय राजकारणी व भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे निधन.