7 May Dinvishes
मित्रांनो, आजचा दिवस हा इतिहास जगतात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला आहे. कारण, आज ७ मे १८६१ साली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला होता. गुरुदेव हे एक प्रख्यात कवी, लघुकथा लेखक, गीतकार, संगीतकार, नाटककार, निबंधकार व चित्रकार अश्या विविध विषयांमध्ये पारंगत असणाऱ्या युगपुरुषा समान त्यांना दर्जा आहे. तसचं, पश्चिमात्य देशांतील लोकांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याच श्रेय त्यांनाच जाते. विसाव्या शतकातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक होते. सन २०१३ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय नागरिक होते.
याव्यतिरिक्त आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिनी जन्मलेल्या काही महत्वपूर्ण व्यक्तीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच, त्यांचे शोध कार्य आणि निधन आदि संपूर्ण घटनांची माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
जाणून घ्या ७ मे रोजी येणारे दिनविशेष – 7 May Today Historical Events in Marathi
७ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 May Historical Event
- इ.स. १८७८ साली पुण्यात ग्रंथकाराचे पहिले संमेलन म्हणजे आताचे साहित्य संमेलन भरविण्यात आले.
- सन १९०७ साली मुंबईमध्ये विजेच्या शक्तीवर चालणारी पहिली ट्रॅम कार सुरु करण्यात आली.
- इ.स. १९२८ साली ब्रिटन देशातील मतदाराची वयोमर्यादा ही ३० वर्षावरून कमी करून २१ वर्ष करण्यात आली.
- सन १९४० साली विन्सटन चर्चिलन यांची ब्रिटनच्या पंतप्रधान पदी नियुक्ती करण्यात आली.
- इ.स. १९४६ साली जपान येथील सोनी कंपनीची स्थापना करण्यात आली.
- सन १९५५ साली भारतीय विमान सेवा एयर इंडिया ची मुंबई ते जपानची राजधानी टोकियो दरम्यान विमान सेवा सुरु करण्यात आली.
- इ.स. १९९० साली सुप्रसिद्ध भारतीय गान कोकिळा लता मंगेशकर यांना दादासाहेब पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- सन २००० साली रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदी व्लादिमिर पुतिन विराजमान झाले.
- इ.स. २००४ साली नेपालचे तत्कालीन पंतप्रधान सूर्य बहादूर थापा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- सन २०१२ साली रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी तिसऱ्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली.
७ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 7 May Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १७९२ साली युगोस्लाव्हिया सोशलिस्ट फेडरल रिपब्लिकचे माजी अध्यक्ष व क्रांतिकारक जोसेफ टिटो यांचा जन्मदिन.
- सन १८६१ साली प्रख्यात भारतीय कवी, संगीतकार तसचं, भारतीय उपखंडातील कलाकार रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८० साली भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय धर्मशास्त्राचे अभ्यासक व कायदेपंडित डॉ. पांडुरंग वामन काणे यांचा जन्मदिन.
- सन १९१२ साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भारतीय गुजराती भाषिक लेखक व साहित्यकार पन्नालाल नानालाल पटेल यांचा जन्मदिन.
- इ.स. १९२३ साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक आत्माराम भेंडे यांचा जन्मदिन.
- सन १९४८ साली हिंदुस्तानी संगीत वाद्य क्षेत्रांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय बासरी वादक व शिक्षक नित्यानंद हळदीपूर यांचा जन्मदिन.
- इ.स. १९६९ साली उत्तरप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे सदस्य केशव प्रसाद मौर्य यांचा जन्मदिन.
७ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 7 May Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १९२४ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सदस्य व आंध्रप्रदेश राज्यातील तेलगु भाषिक क्रांतिकारक अल्लुरी सीतारामा राजू यांचे निधन.
- सन १९९४ साली प्रसिद्ध भारतीय ध्रुपद गायक म्हणून लौकिक मिळविणारे श्री नासिर जाहिरुद्दिन डागर यांचे निधन.
- इ.स. १९९९ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे निधन.
- सन २००१ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी लेखिका व मराठी साहित्यातील पहिल्या नामांकित स्त्रीवादी लेखिका मालती विश्राम बेडेकर उर्फ विभावरी शिरुरकर यांचे निधन.
- इ.स. २००१ साली भारतीय चित्रपट सृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भारतीय गीतकार, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेते प्रेम धवन यांचे निधन.
- सन २००२ साली भारतीय संस्कृत आणि बौद्ध साहित्याचे अभ्यासक, समाजवादी, व लेखक दुर्गा नारायण भागवत उर्फ दुर्गा भागवत यांचे निधन.