7 July Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती तसचं, काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन व शोध कार्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या ७ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 7 July Today Historical Events in Marathi
७ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 7 July Historical Event
- इ.स. १७६३ साली बंगालचे नवाब मीर जाफर यांना पुन्हा बंगालच्या गादीवर बसविण्यात आलं.
- इ.स. १७९९ साली महाराजा रणजित सिंह यांनी लाहोर वर ताबा केला.
- इ.स. १८५४ साली ब्रिटीश कालीन भारतात कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबई मध्ये पहिली कापडगिरणी सुरू केली. मुंबई ही कापड उद्योगाची राजधानी असली तरी भारतातील पहिली कापडगिरणी मात्र भडोच येथे तर महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी नागपुरला सुरू करण्यात आली होती.
- इ.स. १८९६ साली मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.
- सन १९१० साली पुणे शहरात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना करण्यात आली.
- सन १९४८ साली दामोदर घाटी निगम ची स्थापना करण्यात आली.
- सन १९४८ साली स्वतंत्र भारतातील पहिली बहुउद्देशीय परियोजना सुरु झाली.
- सन १९८५ साली जर्मन देशांतील व्यावसायिक टेनिसपटू बोरिस बेकर यांनी अवघ्या १७ वर्ष वय असतांना विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळविणारे सर्वात तरून खेळाडू बनले.
७ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 7 July Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १६५६ साली शीख धर्मियांचे आठवे गुरु गुरु हर किशन सिंह यांचा जन्मदिन.
- इ.स. १८५४ साली पॅन-इस्लामिक चळवळीचे कार्यकर्ता व भारतीय क्रांतिकारक अब्दुल हाफिज मोहम्मद बराकतउल्ला यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८३ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार व भारतीय हिंदी, संस्कृत, प्राकृत आणि पाली भाषेचे लेखक व अभ्यासक चंद्र्धर शर्मा गुलेरी यांचा जन्मदिन.
- सन १९०० साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि दक्षिण भारतातील राजकारणी काला वेंकट राव यांचा जन्मदिन.
- सन १९३४ साली भारतीय राजकारणी व मध्यप्रदेश राज्याचे विधानसभा सदस्य राघवजी यांचा जन्मदिन.
- सन १९३८ साली भारतीय चित्रपट, दूरदर्शन मालिका व रंगमंच नायिका पदमा चव्हाण यांचा जन्मदिन.
- सन १९८१ साली पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू व माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांचा जन्मदिन.
७ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 7 July Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १३०७ साली इंग्लंडचे पहिले राजा एडवर्ड (Edward) यांचे निधन.
- सन १९६५ साली इजराईल देशाचे द्वितीय पंतप्रधान मोशे शॅरेड (Moshe Sharett) यांचे निधन.
- सन १९९९ साली भारतातील सर्वोच्च शौर्य पराक्रम पुरस्कार परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित माजी भारतीय सैन्य दल अधिकारी कॅप्टन विक्रम बत्रा यांचे निधन.
- सन २००७ साली प्रसिद्ध ब्रिटीश सैन्य अधिकारी मेजर आयन मेलविले कॅल्व्होकॉरेसी(Major Ion Melville Calvocoressi) यांचे निधन.
- सन २०११ साली भारतीय हिंदी आणि मराठी चित्रपट व दूरदर्शन मालिका कलाकार रसिका जोशी यांचे निधन.