4 October Dinvishes
मित्रांनो, आज ४ ऑक्टोबर, हा दिवस जागतिक प्राणी दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. या दिवसाची सुरुवात सन १९३१ साली इटली या देशांत आजच्या दिवशी करण्यात आली होती. जगात अनेक प्राणी आहेत त्यातील काही प्राण्यांचे योग्य संगोपन होते परंतु, काही प्राण्यांचे योग्य संगोपन होत नाही. शिवाय, जगात दरवर्षी लाखो प्राण्यांची कत्तल होत असते. प्राण्यांचे आपल्या मानवी जीवनात किती महत्व आहे या गोष्टीचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी दरवर्षी ४ ऑक्टोबर हा दिवस जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
तसचं, मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी असणारे दिनविशेष जाणून घेणार आहोत. ज्याप्रमाणे. आजच्या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, आणि निधन याबद्दल संपूर्ण माहिती आपण येथे पाहणार आहोत.
जाणून घ्या ४ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 4 October Today Historical Events in Marathi
४ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 October Historical Event
- सन २००६ साली ऑस्ट्रेलियन संपादक, प्रकाशक आणि कार्यकर्ते जुलियन असांजे यांनी आंतरराष्ट्रीय ना-नफा असणारी संस्था वोलो विकीलीक्सची स्थापना केली.
- सन १९३१ साली इटली देशांत पहिला जागतिक प्राणी दिवस साजरा करण्यात आला.
- सन १९५७ साली सोव्हियत संघाने स्पुटनिक -१ हा उपग्रह अंतराळात पाठविला.
- सन १९५९ साली सोविएत रशियाच्या ‘ल्युनिक–३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्या भागाची छायाचित्रे घेतली.
- सन १९७७ साली भारताचे परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीला हिंदी भाषेत संबोधित केले. हिंदी भाषेत केलं गेलेलं हे पहिलच भाषण होय.
- सन १९८३ साली नेवाडाच्या ब्लॅक रॉक वाळवंटात रिचर्ड नोबल यांनी आपली थ्रस्ट २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.
४ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 4 October Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८२२ साली अमेरिकेचे २२ राष्ट्राध्यक्ष रदरफोर्ड हेस(Rutherford B. Hayes) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८५७ साली प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य सेनानी, लेखक व पत्रकार तसचं, लंडनमध्ये इंडियन होम रुल सोसायटी, इंडिया हाउस आणि द इंडियन समाजशास्त्रज्ञांची स्थापना करणारे महान क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८४ साली विसाव्या शतकातील प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार रामचंद्र शुक्ल यांचा जन्मदिन.
- सन १९१३ साली हिंदुस्थानी शास्त्रीय शैलीतील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका व किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खान यांची मुलगी सरस्वती राणे यांचा जन्मदिन.
- सन १९२७ साली माजी भारतीय प्रशासकीय अधिकारी व मध्यप्रदेश राज्याच्या माजी राज्यपाल तसचं, राजीव गांधी यांच्या प्रधान सचिव सरला ग्रेवाल यांचा जन्मदिन.
- सन १९३१ साली पश्चिम बंगालमधील सर्वोच्च नागरी सन्मान बंगा बिभूषण पुरस्कृत प्रख्यात भरतीय बंगाली पार्श्वगायिका संध्या मुखर्जी यांचा जन्मदिन.
- सन १९३५ साली महाराष्ट्रीयन मराठी अभिनेते व गायक अरुण सरनाईक यांचा जन्मदिन.
४ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4 October Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९२१ साली महाराष्ट्रीयन मराठी नाट्य सृष्टीतील श्रेष्ठ गायक व अभिनेते संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे निधन.
- सन १९४७ साली नोबल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लँक(Max Planck) यांचे निधन.
- सन १९८२ साली ज्येष्ठ महाराष्ट्रीयन मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन.
- सन १९८९ साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट संगीत दिग्दर्शक, गायक व अभिनेते तसचं, रंगमंच कलाकार संगीतभूषण पंडित राम मराठे यांचे निधन.